
>
साहित्य-
१) कूस कूस (couscous )-१/२ कप
२) चिकन स्टॉक किंवा पाणी - १/२ कप
३) उकडलेली ब्रोकोली-१ कप
४) बारीक चिरलेले गजर- १/२ कप
५) बारीक चिरलेली काकडी- १/२ कप
६) सुकलेल्या क्रेनबेरीज (dried craneberries )-१ ते २ टेबल स्पून
७) बेसिलची पाने - ४ ते ५
८) लिंबाचा रस - २ टेबल स्पून
९) ऑलिव ओईल -२ टेबल स्पून
१०) मिरपूड-१/४ टी स्पून
११) मीठ चवीनुसार
१२) बारीक चिरलेला लसुन-१ टी स्पून
कृती -
१) एका बाउलमध्ये कूसकूस घेऊन त्यावर उकळता चिकन स्टॉक किंवा उकळते पाणी घालावे व ५ ते ६ मिनिट झाकून ठेवावे
२) एका पॅनमध्ये १ टी स्पून ऑलिव्ह ऑईल गरम करावे त्यात बारीक चिरलेला लसुन घालून परतावा व त्यात उकडलेली ब्रोकोली घालून टॉस करावी त्यावर थोडे मीठ भुरभुरावे .
३) कूसकूसला एका काटेरी चमच्याने खरडून घ्यावे . त्यात तयार ब्रोकोली, गाजर, काकडी व क्रेनबेरीज घालावेत . बेसिलची पाने चुरडून घालावीत
४) एका छोट्या बाउलमध्ये लिंबाचा रस,बाकी ऑलिव्ह ऑईल,मिरपूड व मीठ एकत्र करून हलकेसे फेटून घ्यावे . हे मिश्रण वरील कूसकूसमध्ये घालावे व हलक्या हाताने काट्यानेच एकजीव करून घ्यावे .
५) तयार कूसकूस सलाड आपल्या आवडत्या डीशसोबत सर्व्ह करावे .
टीप-
१) वरील रेसेपिमध्ये मी चिकन स्टॉक वापरला आहे त्याएवजी व्हेज स्टॉक किंवा साधे पाणी वापरले तरी चालेल .
२) या रेसेपित ब्रोकोलीएवजी झुक्कीनी वापरू शकतात
प्रतिक्रिया
कूसकूस म्हण्जे??
कूसकूस म्हण्जे
In reply to कूसकूस म्हण्जे?? by सूड
आई गं....
मस्त आलाय फोटो!!
??
In reply to मस्त आलाय फोटो!! by अनन्न्या
भारतातच रत्नागिरीत!!
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
वर सांगितलेल्या भाज्याच
In reply to भारतातच रत्नागिरीत!! by अनन्न्या
फोटो तर एकदम मस्त.. पण हे
मस्त रंगीबेरंगी फोटू आलाय.
कुस कुस पुण्यात दोराबजी मधे
कुस कुस पुण्यात दोराबजी मधे
परवाच कुसकुस खाल्लं.
एक्कीच बरतन मे खानेसे प्यार
In reply to परवाच कुसकुस खाल्लं. by प्यारे१
"सहनाववतु' पद्धत!
In reply to परवाच कुसकुस खाल्लं. by प्यारे१
नानवेज खात नाय ना म्हून. बाकी
In reply to "सहनाववतु' पद्धत! by स्पंदना
सलाड काय असतं बॉ? सॅलड
फोटो बघुन तर बुवांची रांगोळी
धन्यवाद
छान
हो फोटो फार सुरेख आहे. अन
सलाद ?
कुस कुस आवडत नै