Skip to main content

कूस-कूस -ब्रोकोली सलाड

लेखक कच्ची कैरी यांनी मंगळवार, 02/04/2013 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
couscous salad >साहित्य- १) कूस कूस (couscous )-१/२ कप २) चिकन स्टॉक किंवा पाणी - १/२ कप ३) उकडलेली ब्रोकोली-१ कप ४) बारीक चिरलेले गजर- १/२ कप ५) बारीक चिरलेली काकडी- १/२ कप ६) सुकलेल्या क्रेनबेरीज (dried craneberries )-१ ते २ टेबल स्पून ७) बेसिलची पाने - ४ ते ५ ८) लिंबाचा रस - २ टेबल स्पून ९) ऑलिव ओईल -२ टेबल स्पून १०) मिरपूड-१/४ टी स्पून ११) मीठ चवीनुसार १२) बारीक चिरलेला लसुन-१ टी स्पून कृती - १) एका बाउलमध्ये कूसकूस घेऊन त्यावर उकळता चिकन स्टॉक किंवा उकळते पाणी घालावे व ५ ते ६ मिनिट झाकून ठेवावे २) एका पॅनमध्ये १ टी स्पून ऑलिव्ह ऑईल गरम करावे त्यात बारीक चिरलेला लसुन घालून परतावा व त्यात उकडलेली ब्रोकोली घालून टॉस करावी त्यावर थोडे मीठ भुरभुरावे . ३) कूसकूसला एका काटेरी चमच्याने खरडून घ्यावे . त्यात तयार ब्रोकोली, गाजर, काकडी व क्रेनबेरीज घालावेत . बेसिलची पाने चुरडून घालावीत ४) एका छोट्या बाउलमध्ये लिंबाचा रस,बाकी ऑलिव्ह ऑईल,मिरपूड व मीठ एकत्र करून हलकेसे फेटून घ्यावे . हे मिश्रण वरील कूसकूसमध्ये घालावे व हलक्या हाताने काट्यानेच एकजीव करून घ्यावे . ५) तयार कूसकूस सलाड आपल्या आवडत्या डीशसोबत सर्व्ह करावे . couscous salad टीप- १) वरील रेसेपिमध्ये मी चिकन स्टॉक वापरला आहे त्याएवजी व्हेज स्टॉक किंवा साधे पाणी वापरले तरी चालेल . २) या रेसेपित ब्रोकोलीएवजी झुक्कीनी वापरू शकतात

वाचने 5452
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

हे कूसकूस म्हण्जे असतं तरी काय नक्की? दिसायला भगरीसारखं दिसतंय.

In reply to by सूड

कूसकूस म्हण्जे एक प्रकारचा पास्ताच भगर्/वरईसारखा दिसणारा :) कच्चीकैरी पाकृ आवडली , फोटो ही छानच आलायः) कूसकूस आवडता प्रकार आहे :)

कसला क्लास फोटो आलाय. फोटो पाहुनच भुक चाळवली. माझ्या मते हे नुसत खाल्लं तरि पोट भरत असेल नाहि?

ब्रोकोली, झुक्किनी, कूसकूस हे काही मिळत नाही इथे! पाहिलेही नाही.

In reply to by अनन्न्या

कुठल्या देशात हे सर्व मिळत नाही म्हणता आहात?

In reply to by प्रभाकर पेठकर

आमची बाजारपेठ फार मोठी नाही. जास्त प्रमाण इथे पिकणाय्रा भाज्याचे, काही भाज्या येतात कोल्हापूरहून!!

In reply to by अनन्न्या

वर सांगितलेल्या भाज्याच घातल्या पाहीजेत असं नाही. टॉमेटो, काकडी, गोडे मटार असं घालुन सुद्धा चव छान येते. गव्हाचं कुसकुस हा हेल्दी पर्याय अन चिकन स्टॉक ऐवजी व्हेजी स्टॉक किंवा साधं पाणि सुद्धा वाईट लागत नाही कारण अगदी थोडंच वापरायचं असतं.

फोटो तर एकदम मस्त.. पण हे कुसकुस खायला मन धजावतच नाहीये.... काय माहित काय प्रॉब्लेम आहे माझा ह्या कुसकुस सोबत... :D

कुस कुस पुण्यात दोराबजी मधे मिळते . चविला थोडेसे भगरि सारखेच लागते . जी-याची फोडणी करुन उकडलेला बटाटा घालुनहि छान लागते. हि रेसीपि छानच आहे. करुन बघण्यात येईल .

कुस कुस पुण्यात दोराबजी मधे मिळते . चविला थोडेसे भगरि सारखेच लागते . जी-याची फोडणी करुन उकडलेला बटाटा घालुनहि छान लागते. हि रेसीपि छानच आहे. करुन बघण्यात येईल .

परवाच कुसकुस खाल्लं. एक चमचा तोंडात घातला नि बास्स केलं. चवीला होतं बरं पण...इकडची 'ॐ सहनाववतु' पद्धत! एक्कीच परात में पांच लोगा ;)

In reply to by प्यारे१

"सहनाववतु' पद्धत! व्वा! हा विचार कधी केलाच नव्हता. तरीही एक उपाय सांगते, एक बाऊल मागवायचा अन त्यात घेउन खात रहायच, दाखवताना खाताना सांडु नये म्हणुन बाऊल पकडला आहे अस दाखवायच. एकुण 'स्टील" आहे तर!

सर्वांचे मनापासुन आभार :) @मृणालिणी अगं एकदा खाऊन बघ तुला नक्की आवडेल अशी आशा आहे @ शिल्पा चुकीची दुरुस्ती केली जाईल

पहिला फोटो आवडला... मस्त रंगबेरंगी आहे.

जाड सु़जीच्या उपम्या सारखा पदार्थ दिसतोय.