डॉ. खरे ह्यांचे मिसळपावावरील लिखाण वाचून पदवीदरम्यान असलेल्या principles of ethics and cyber laws ह्या विषयाची आठवण झाली. त्यात चित्रविचित्र किस्से, निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारे प्रश्न असत. त्यातली आमची उत्तरे व्यक्तिसापेक्ष बदलत. आम्ही उत्तरे काहीही दिली तरी चालत; पण योग्य ते जस्टिफिकेशन आम्हाला देता येते आहे की नाही; हे पाहिले जात.(वाद विवाद स्पर्धेप्रमाणे; कुठलीही बाजू मांडा; बक्षीस मिळू शकेल; पण तुमचा त्यातला अभ्यास दिसायला हवा.)
.
त्यासंदर्भात टेक्स्टबुक बाह्य वाचन करताना पडलेला प्रश्न. "ग्रामर्थं कुटुंबम् त्यजेत् | राष्ट्रार्थम् ग्रामम् त्यजेत ||" असे म्हणे चाणक्य म्हणून गेलाय. हे इतकं सोपं आहे का? कुटुंब आणि गाव हे दुसर्याचं असेल तर निर्णय घेणं तेवढं त्रासदायक नाही वाटणार हो. पण तुमच्याच गावातील एक कुटुंब गावाच्या भल्यासाठी बळी दिलं जातय तेव्हा तुम्ही समर्थन देणार का? "हो" म्हणत असाल तर लागलिच दुसरा प्रश्न :- ठीक. देउया त्यांचा बळी. पुढचा बळी तुमच्या कुटुंबाचा. आता चालेल? (झक मारुन ह्यालाही " हो " म्हणायची वेळ येते.) समजा "नाही" म्हणालात तर "सर्वांनीच असे केले तर आख्खे गाव बुडेल. सारेच नष्ट होइल" असा धाक घातला जातो.
मग? मग काय करावे?
आपल्या पूर्वजांनी ह्यामुळेच स्वखुशीने बळी जाणार्यांचा हुतात्मा/शहीद म्हणून गौरवीकरण केलय ते ह्यामुळेच का काय? कुणी स्वतःहून इतरांच्या भल्यासाठी बळी जात असेल तर कोण कशाला नाही म्हणेल.
पण मूळ प्रश्न राहतोच "बळी कुणी जायचं?" ???
.
सामान्य किंवा संसारी म्हणवल्या जाणर्यांनी ह्याच्यावर सोप्पं उत्तर शोधलय "शिवाजी/भगतसिंग शेजार्याच्या घरात व्हावा" आम्ही त्याचे स्तवन करु.स्तुतीगायन करु. चिंताच नाही.
.
डॉक्टर असताना येणारी नैतिक -कायदेशीर विचारांच्या झगड्याचं त्रांगडं खर्यांनी मांडलय. तसच हे त्रांगडं अधिक ठळक रूप घेउन येतं ते सैनिकी व्यवसायात. "ऑर्डर" हा तिथे अंतिम शब्द मानला जातो. त्यावेळी तुमच्या विवेकानं उलट कौल दिला तर काय करायचं? समजा एका झोपडीच्या आश्रयाने काही अतिरेकी लपले आहेत.त्यांना वेळिच आवरले नाही तर मोठी गोची अगदि राष्ट्रिय पातळीवर होणार आहे; त्यांना मारणे अत्यंत अगत्याचे आहे. तुम्ही सामान्य सैनिक आहात. आणि तुम्हाला तुमचा वरिष्ठ सरळ "फायर" अशी आज्ञा देतो. आता सरळ गोळ्यांच्या फैरी झडणं अपेक्षित आहे; पण इतक्यात तुम्हाला लक्षात येतं की झोपडित अतिरेक्यांशिवाय काही निरपराध बंधकही आहेत. झोपडिजवळून जाणारे काही जनसामान्यही आहेत; ज्यांना अजून ह्या प्रकरणाचा पत्ताच नाही. चालवाल बेछूट गोळी? आज्ञा पाळाल? की छोट्या कच्च्याबच्च्यांना पाहून पाघळून जाल? पाघळलात तर गैरवर्तनाचा ठपक येउ शकतो. आणि देशद्रोहाचाही ठपका येण्याची शक्यता आहे. "देशद्रोहाचा आरोप स्वीकाराल की निरपराधावर गोळ्या चालवण्याची हिंमत दाखवाल?"
पुन्हा वास्तवातल्या अडचणी वेगळयच.(पुरावे, स्वतःच्याच सहकार्यांचा रोष स्वीकारून त्याच दुनियेत राहणे हे कर्मकठीण. साइडलाइन होण्याची भीती.)
.
मोदक वगैरे मंडळी लिहितात तशा टिपिकल बंधक /होस्टेज ठेवल्या जाणार्या सीनमध्येही ही अशीच समस्या आडवी येते. पाच पन्नास जणांना बंधक केले गेलेले असते. त्याबदल्यात काही गुन्हेगारांच्या मुक्ततेची मागणी होते. हे गुन्हेगार शेकडो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले असू शकतात; किंवा सुटल्यावर तर नक्कीच ठरणार अशी खात्री असते.
आता? आता म्हणाल सोडा गुन्हेगारांना म्हणून? त्यांना सोडलं तर ते नंतर जे मुडदे पाडणार आहेत त्याचे जिम्मेदार कोण? एक उदाहरण :- १९९९ला भारतीय विमानचे अपहरण केल्यामुळे मौलाना मसूद अझहर ह्याला सोडावे लागले. त्याने नंतर जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबा ह्या संघटनांना सुसूत्र करून भारतात आख्खे दशकभर बॉम्बस्फोटांचे, हिंसेचे सत्र सुरु केले. त्याला सोडले हे बरोबर केले का? त्याने नंतर ज्यांचा जीव घेतला; त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? त्याला जिवंत सोडणारी व्यवस्था नाही का जबाबदार? समजा हे लोक मरतील म्हणून त्या मसूद अझरला सोडायचे नाही म्हणता मग? ठीक. पण त्याला सोडलं नाही तर विमानातले शंभरेक प्रवासी मरणार हे निश्चित. घ्याल त्यांच्या मृत्यूचं ओझं आपल्या भाळी?
.
होतं काय , की तात्विक चर्चा करायला सोपं पडतही असेल "तमक्यांनी त्याग करावा " वगैरे म्हणायला जमतही असेल . पण जेव्हा एखाद्याचा त्या त्याग कराव्या लागणार्या मंडळित समावेश केला की लागलिच त्याची मतंही बदलताना दिसतात्.सार्यांचीच नाहीत बदलत; पण मग मतं बदलणारी मंडळीही असतात. "त्याग आवश्यक आहे. तो इतरांनी माझ्यासाठी करणं त्याहून आवश्यक आहे. मला करावा न लागणं हे तर अत्यावश्यक आहे." अशी ती भूमिका.
.
असो. हा असा एक तिढा झाला. बंधक्-समस्या हा निव्वळ एक भाग आहे. अशा नैतिक - अनैतिकच्या निर्णयांना आव्हान देणारे कित्येक प्रसंग असू शकतात.
लष्करात असलात तरच हे धर्मसंकट येइल असं नाही. अगदि सामान्य माणसालाही अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागू शकतं. "किती महिन्यांचा गर्भ झाला म्हणजे त्याच्या हत्येस सदोष मनुष्यवध(खून, हत्या) म्हणता येइल; किती महिन्यापर्यंत तो निव्वळ साधासाच गर्भपात ठरेल?" हा जगभर देशोदेशी वेगवेगळे नियम असलेला प्रश्नांचा प्रांत. "नक्की कोणत्या कारणासाठी गर्भाला मारणं क्षम्य आहे?" हा त्याच्याच जवळ जाणारा अजून एक प्रश्न. "मातेच्या जीवाल धोका असेल तर गर्भाला मारले तर चालेल" असे सर्वसाधारण उत्तर ऐकू येते. पण "मातेच्या जीवास धोका नाही, पण मातेला मूल नकोसे आहे, आणि चांगले वाढलेले आहे पोटात" अशा केसमध्ये काय करणार?
.
किंवा कुणी केलेल्या कृत्याबद्दल माफी मागत असेल तर? माफ करावे का? कुणी करावे? कुणाच्या वतीने करावे? नुसतेच माफ करावे की इस्लामिक देशांमध्ये करतात तसे काही "मोबदला"(ब्लड मनी) वा तत्सम प्रकार घेउन करावे? त्यास माफी म्हणावे की देवाणघेवाण? पण मग ती सरळसरळ "अमुक पैसे मोजा अन वाटेल त्याचा खून करा" किंवा "पुरेसे पैसे मोजा आणी वाटेल तो गुन्हा करा" असा प्रकार बनल्याचा कुणी आरोप केला तर? तो आरोप चुकीचा म्हणता येइल का?
मुळात "माफी" ही तुम्ही "चुकी"साठी करणार की "गुन्ह्या"साठी?
कोणत्या गुन्ह्याला कोणती/किती शिक्षा योग्य?
शिक्षेचे उद्दिष्ट गुन्हेगारास सुधरवणे, गुन्हेगारास समजापासून दूर ठेवणे, गुन्हेगारावर सूड घेणे ह्यापैकी नक्की काय असावे? की ह्यापेक्षाही काही वेगळे असावे?(ह्यावर जालावर गविंनी एक धागाही काढला होता.)
.
फाशी असावी की नसावी? असलीच तर ती rarest of rare केसमध्येच का असावी? गुनेह घडण्याच्या वारंवारितेचा संबंध शिक्षेशी लावावा की गुन्ह्याच्या तीव्रतेचा लावावा.(दिल्लीमध्ये ज्याप्रकारे हिडिस गुन्हा डिसेम्बर २०१२ मध्ये घडला तसे गुन्हा पुन्हा पुन्हा होउ लागले तर ते rarest of rare राहतील का? राहिले नाहित तर त्यास फाशी देउ नये का काय??) सज्ञान व्हायला एखाद दोन दिवसच बाकी असताना कुणी अतिभयानक(दिल्लीस्टाइल) गुन्हा केला तर निव्वळ "अठरा वर्षाला दोन दिवस कमी आहेत" असे म्हणून चक्क सोडून द्यावे का काय? तुमच्या आप्तांबाबतही असे गुन्हे घडले तर तुमची हीच भूमिका राहणार का?
.
ह्यासर्वांवर उपाय म्हणून एक मस्त ओळ ऐकली होती. golden rule for ethics ह्या नावाची. "जे तुम्ही स्वत्ळ्साठी निवडू इच्छित नाही, ते तुम्ही इतरांवर लादू नका." ह्या अर्थाची. "इतरांनी तुम्हाला जसे वगवावे असे अपेक्षित असेल, तसे तुम्ही इतरांना वागवा" असे तेव्हा म्हटले गेले. अब्राहम लिंकनचे ह्यात संदर्भात प्रसिद्ध वाक्य ऐकले आहे "मला स्वतःला कुणाचाही गुलाम होणे आवडणार नाही. म्हणून मीसुद्धा इतर कुणाला गुलाम करणार नाही."
.
वॉव. म्हणजे माझ्या गोंधळाचे शेवटी निराकरण झाले तर. मी सुटकेचा निश्वास टाकला. पन एवढ्यात कानावर प्रश्न आदळला " समजा हिंबोपा नावाच्या देवाला मी स्वत: बळी जाउन माझे भले होइल असे मानतो. तो मार्ग मी स्वतःसाठी निवडतो. माग मी इतरांनाही त्याची जबरदस्ती करु का? मरणोत्तर त्यांना स्वर्ग मिळावा म्हणून त्यांच्या भल्यासाठी त्यांना मी मारुन टाकू का " असे एखादा "झबोका" ह्या काल्पनिक धर्मातील धर्मवेडा म्हणाला तर? इथे तर तो स्वतःला जे चालेल तेच इतरांना लागू करतोय आता?
आता बसली का पुन्हा वाचा मनोबा? बोला ना. गप्प का?
.
हरकत नाही. ह्यावरही उत्तर मिळाले. "कुणीच कुणाला कसलीच जबरदस्ती करु नये. व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य." हुर्रे. मनोबा आनंदले. शेवटी त्यांना उत्तर मिळाले. पण छट्.पुन्हा गोची झालिच. कारण हे मूल्य मनले तर "राजीखुशीने जे काही होते ते सर्व मान्य करावे" असा अर्थ होतो. वरवर हा फार सोपा वाटतो.
पण समजा वर उल्लेख केलेल्या "झबोका " धर्माच्या धर्मगुरुनी समजा एखाद्या धर्मानुयायाला "स्वतःचा हात कापून हिंबोपा नावाच्या देवाला अर्पण केल्यास देव कसा खुश होणार आहे" हे पटवून दिले आणि तो शहाणा "राजीखुशीने" आत्मघात करुन घ्यायला निघाला तर ? तर मानणार का "व्यक्तीस्वातंत्र्य " हे मूल्य सर्वोच्च?
गप्प का मनोबा? बोला. बोला काहीतरी.
गोंधळून चालणार नाही.
.
सर्वच कायदेशीर गोष्टी नैतिक असतीलच असे नाही. सर्वच नैतिक गोष्टी कायदेशीर असतील असेही नाही.
कधी काय करावे हा जो तो कधी कळत, कधी स्वतःच्याही नकळत ठरवून टाकत असतो.
कित्येकदा कायदेशीर वागण्याच्या नादात नैतिकता सोडल्याबद्दल टोचणी लागते.
तर कधी नैतिकता पाळण्याच्या नादात व्यवहारात तुफान नुकसान होते; कायदेशीर अडचणीही येउ शकतात. तेव्हा अडचणींनी माणूस फार वैतागतो. कित्येकदा नैत्कता पाळल्याबद्दल स्वतःवर चरफडतोसुद्धा.
.
ह्यातल्या बहुतांश प्रश्नांवर बहुतांश पब्लिक सोप्पा अल्गोरिदम वापरते "दृष्टीआड सृष्टी". फार विचार करायचा नाही. आपल्या पुढ्यात पडेल तेवढच पहायचं नि चालू लागायचं. व्यवहारात तेच आचरायला सोपं आहे; हे ही खरच.
उर्वरित प्रतिसादातून लिहीत जाइन. सध्या घाइत आहे.
--मनोबा
वाचने
17314
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
समजा हिंबोपा नावाच्या देवाला
काय बोलु धन्या काका ??
In reply to समजा हिंबोपा नावाच्या देवाला by धन्या
पूजातैशी पूर्ण सहमत. असले हे
In reply to काय बोलु धन्या काका ?? by जेनी...
मी तत्वा साठी जीव देणार नाही, कारण माझी तत्व जसा काळ जाईल तशी बद
In reply to समजा हिंबोपा नावाच्या देवाला by धन्या
तुम्हाला कश्याचा तरी त्रास
In reply to मी तत्वा साठी जीव देणार नाही, कारण माझी तत्व जसा काळ जाईल तशी बद by प्रसाद१९७१
आमच्याकडे कुठलीच फी नाही.
In reply to तुम्हाला कश्याचा तरी त्रास by धन्या
हाहा..
In reply to आमच्याकडे कुठलीच फी नाही. by प्यारे१
ह्या भल्या मोठ्या जमिनी
In reply to हाहा.. by उपास
@मी म्हटलं माझे ५ गरीब मित्र
In reply to हाहा.. by उपास
हे पटण्यासारखे आहे
In reply to तुम्हाला कश्याचा तरी त्रास by धन्या
सर्वात महत्वाची गोष्ट ही की
In reply to तुम्हाला कश्याचा तरी त्रास by धन्या
हे करून पहा...
In reply to समजा हिंबोपा नावाच्या देवाला by धन्या
मी त्याला सांगून सांगून थकलो आहे की बाबा रे मी नास्तिक आहेआस्तीक-नास्तीक अशा भानगडीत पडण्यापेक्षा अज्ञेयवादी (agnostic) होऊन बघा... समतोल विचार करून निर्णय घ्यायला बरं पडतं आणि आस्तीकपणा व नास्तीकपणा दोघांमध्ये जो दंभ होण्याचा प्रकार बहुदा होतोच तोही टळतो.आस्तीक-नास्तीक अशा भानगडीत
In reply to हे करून पहा... by डॉ सुहास म्हात्रे
धन्य रे धन्या
In reply to आस्तीक-नास्तीक अशा भानगडीत by धन्या
+१११११११
In reply to धन्य रे धन्या by चौकटराजा
तुमचं म्हणणं खरं आहे. इथे
In reply to +१११११११ by प्यारे१
शेवटी आपल्या विवेकबुद्धीला
In reply to तुमचं म्हणणं खरं आहे. इथे by धन्या
अच्छा अज्ञेयवादी शब्द आहे काय
In reply to हे करून पहा... by डॉ सुहास म्हात्रे
'आर्ट ऑफ डेटिंग'
In reply to समजा हिंबोपा नावाच्या देवाला by धन्या
आम्ही भारतात राहतो.
In reply to 'आर्ट ऑफ डेटिंग' by मालोजीराव
आम्हीपण !
In reply to आम्ही भारतात राहतो. by धन्या
जगण्याची कला
In reply to समजा हिंबोपा नावाच्या देवाला by धन्या
आजकाल बाबा लोकांना नावे
In reply to जगण्याची कला by आशु जोग
तेच
हा वाद
In reply to तेच by श्रावण मोडक
हा
In reply to हा वाद by राही
हम्म्म
In reply to तेच by श्रावण मोडक
अवांतर
In reply to हम्म्म by नगरीनिरंजन
अतिअवांतर
In reply to हम्म्म by नगरीनिरंजन
:)
In reply to तेच by श्रावण मोडक
फार विचार करायचा नाही. आपल्या
दुविधामें दोऊ गये, माया मिली न राम.
स्वसंपादन
In reply to दुविधामें दोऊ गये, माया मिली न राम. by राही
सुटले ते तरले, अडकले ते बुडले
In reply to दुविधामें दोऊ गये, माया मिली न राम. by राही
रोचक पण आव्हानात्मक विषय
याला उत्तर आहे.
+ १
In reply to याला उत्तर आहे. by अर्धवटराव
बोला पुंडलिक वरदा हाऽऽऽऽऽऽरी
In reply to याला उत्तर आहे. by अर्धवटराव
तुमचेच आशिर्वाद फळाला आलेत माऊबाई :)
In reply to बोला पुंडलिक वरदा हाऽऽऽऽऽऽरी by कवितानागेश
हो का?
In reply to याला उत्तर आहे. by अर्धवटराव
कै च्या कै!!
In reply to हो का? by स्पंदना
काय झेपलं नाय.
In reply to हो का? by स्पंदना
सिंपल आहे. परिणामांचा विचार
In reply to काय झेपलं नाय. by प्यारे१
इथे परत सरसकट बोलताय असे नाही
In reply to सिंपल आहे. परिणामांचा विचार by स्पंदना
सरळ आहे परिणाम पहावे.
In reply to इथे परत सरसकट बोलताय असे नाही by बॅटमॅन
परिणाम स्वतः ऐवजी दुसर्यावर
In reply to सरळ आहे परिणाम पहावे. by स्पंदना
विठठलपंतांनी गृहस्थाश्रम
In reply to परिणाम स्वतः ऐवजी दुसर्यावर by बॅटमॅन
>>म्हणून पत्नीची परवानगी घेऊन
In reply to विठठलपंतांनी गृहस्थाश्रम by प्यारे१
बरोबर!
In reply to >>म्हणून पत्नीची परवानगी घेऊन by यशोधरा
त्याबाबत दुमत नाही.
In reply to बरोबर! by प्यारे१
कथेबद्दल धन्यवाद. थोडे तपशील
In reply to विठठलपंतांनी गृहस्थाश्रम by प्यारे१
समय से पहले नाहीत होत काही
In reply to कथेबद्दल धन्यवाद. थोडे तपशील by बॅटमॅन
हम्म हे बरोबर.
In reply to समय से पहले नाहीत होत काही by प्यारे१
अपर्णा, तू कोणत्या भावनेने
In reply to सरळ आहे परिणाम पहावे. by स्पंदना
या सर्व भानगडींचं मुळ कारण काय?
In reply to सरळ आहे परिणाम पहावे. by स्पंदना
शमत हाय. लॉजिकमध्ये मुळातूनच
In reply to या सर्व भानगडींचं मुळ कारण काय? by अर्धवटराव
ती 'येडपट' भावंडं उगाचच
In reply to काय झेपलं नाय. by प्यारे१
काहीही....बाजीरावाची शेंडी
In reply to हो का? by स्पंदना
:)
In reply to हो का? by स्पंदना
अॅम आय कफ्युज्ड?
वेट वेट....
In reply to अॅम आय कफ्युज्ड? by प्यारे१
अरे काय चाललेय काय.....?
माझीया मना
वा ! मस्तच !
In reply to माझीया मना by स्पंदना
बरंच किचकट आहे, पहिल्या
फेसबुकावर समस्त आंतरजालीय
In reply to बरंच किचकट आहे, पहिल्या by स्पा
अहो ५०, ते बुद्धाच तत्वग्यान
In reply to फेसबुकावर समस्त आंतरजालीय by ५० फक्त
अच्छा म्हंजे हाच लेख मनोबानं
In reply to अहो ५०, ते बुद्धाच तत्वग्यान by स्पा
पूर्ण विषय असा असेल का?
In reply to अच्छा म्हंजे हाच लेख मनोबानं by ५० फक्त
केळ्याची नैतिकता
In reply to अच्छा म्हंजे हाच लेख मनोबानं by ५० फक्त
भांडे का लपविता
In reply to केळ्याची नैतिकता by बॅटमॅन
@बुवा एक मोठं विडंबन लिहिणार
In reply to अच्छा म्हंजे हाच लेख मनोबानं by ५० फक्त
इथिक्स आणि केळी---दोन्ही
In reply to @बुवा एक मोठं विडंबन लिहिणार by अत्रुप्त आत्मा
स्पांडुरंग ठांगवीकर, मनोबाला
In reply to अहो ५०, ते बुद्धाच तत्वग्यान by स्पा
असो
In reply to स्पांडुरंग ठांगवीकर, मनोबाला by धन्या
आम्हास तुमच्यासारखी वांझोटी
In reply to स्पांडुरंग ठांगवीकर, मनोबाला by धन्या
तुमचेच खरे तुमची लाल
In reply to आम्हास तुमच्यासारखी वांझोटी by स्पा
(No subject)
In reply to तुमचेच खरे तुमची लाल by बॅटमॅन
तुमचेच खरे तुमची लाल
In reply to (No subject) by स्पा
ओक्के तुम्ही म्हणता तसचं खुश?
In reply to तुमचेच खरे तुमची लाल by धन्या
तुम्ही काय किंवा मी काय,
In reply to ओक्के तुम्ही म्हणता तसचं खुश? by स्पा
धनोबा
In reply to तुम्ही काय किंवा मी काय, by धन्या
हल्ली मी सरळ दुसर्याशी सहमत
In reply to धनोबा by स्पा
एकदम बरोबर तुमचे म्हणणे खरेय
In reply to हल्ली मी सरळ दुसर्याशी सहमत by धन्या
धनोबा..
In reply to धनोबा by स्पा
चित्राची गरज म्हणून.
In reply to धनोबा.. by चौकटराजा
दुविधामें दोऊ गये, माया मिली न राम.
कठीण आहे..
याला जीवन ऐसे नाव!
सहमत!
In reply to याला जीवन ऐसे नाव! by बाळ सप्रे