Skip to main content

मनुवादी कारस्थान आणि संभाजीमहाराज

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 12/03/2013 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' बर्‍याच दिवसांनी एक असे नाटक पहायला मिळाले जे नाटक काही ऐतिहासिक सत्याचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करते. त्याची नव्याने मांडणी करते. पण त्यापूर्वी... या नाटकातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकाची भाषा. सध्या मराठीमधे ग्रामीणच्या नावाखाली प्रेक्षकांच्या माथी काहीच्या बाही मारलं जातंय. ग्रामीण चित्रपटात शहरी कलाकार 'ग्रामीण'च्या नावाखाली चित्रविचित्र हेल काढून बोलत राहतात . सगळी सोंगं आणता येतात पण भाषेचं सोंग नाही आणता येत त्यामुळे जी भाषा आपली नाही ती बोलायच्या फंदात पडा कशाला ? या नाटकातले सगळे कलाकार स्वतःची ओरिजीनल भाषा बोलतात त्यामुळे भाषेत सहजता आहे. त्यांच्या जीभेवर ती भाषा लादल्यासारखी वाटत नाही. यातले पोवाडे खड्या आवाजात आहेत. कलाकार आपापली भूमिका नीटपणे वठवतात. यातले काही शब्द पहा मधात - मधे नटाएला - नटाला कामून रे - का म्हणून रे असे अनेक खास शब्द ऐकायला मिळतात. ही भाषा नुसती शब्दात नाही मांडता येणार. उदा. "काही बी बोलssतो". लांबवलेला ल. जे त्या भागातले असतील त्यांना हे लक्षात येइल. मेल्या मुडद्या टकुरं डोसकं, आत्ता ग बया याशिवायही ग्रामीण असू शकते ही कल्पना अनेकांसठी नवीन असेल. असो. काय आहे या नाटकात - इ. स. १६८०. स्वर्गात इंद्रदेव यमाला बोलवून घेतो आणि सांगतो. पृथ्वीवर जा आणि शिवाजीमहाराजांना त्यांच्या विचारांसकट घेऊन ये. पण शिवाजीमहाराज यमाच्या तावडीतून निसटतात आणि त्यानंतर कित्येक शतके यम महाराजांचा शोध घेतच राहतो. ३५० वर्षानंतर महाराजांचा विचार यमाला भीमनगर मोहल्ल्यांमधे 'मिलिंद कांबळे' याच्या रुपाने सापडतो. पण हा शोध घेताना नाटककार राजकुमार तांगडे(दलपतसिंग येता गावाचे लेखक) काही नवे शोध मांडतात. १> "शके १५८१ विकारीनाम संवत्सर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमी, गुरुवार दुपारी आठवे तासी स्थळ - प्रतापगड " असे तपशील एका दमात घडाघडा म्हणून दाखवणे म्हणजे शिवचरीत्र नव्हे. (आपल्या लक्षात आले असेल हा टोला कोणाला ते) २> गोब्राह्मणप्रतिपालक - यावर नाटककाराचे भाष्य असे - "खरेतर ब्राह्मणांपासून रक्षण करा गायींचे असे म्हणायला हवे" ३> महाराज गोब्राह्मणप्रतिपालक असते तर त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याला का ठार केले असते ? ४> महाराजांचे ३३ पैकी ११ म्हणजे ३३% अंगरक्षक मुस्लिम होते. मग महाराजांचा संघर्ष मुसलमानांविरुद्ध कसा. ५> महाराज धर्मासाठी लढले नाहीत . ६> महाराजांना गरजच नाही वाटली धर्माची. उलट धर्मालाच मोठे होण्यासाठी महाराजांची गरज वाटली. ७> त्यांच्या सैन्यात ३५ % मुसलमान होते. ८> हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर हे त्यांच्या सेवेत होते. अति विश्वासू होते. तर ते मुसलमानाविरुद्ध कसे ? ९> अफजलखानाचे पोट फाडले, शायिस्तेखानाची बोटे तोडली एवढेच सांगितले जाते. त्यांनी अनेक मराठा सरदारांनाही शासन केले हे सांगितले जात नाही. १०> नगरचा निजामशहा मूळचा कुलकर्णी होता, हसन गंगू बहामनी लहानपणी एका भटाच्या घरी वाढला म्हणून त्याने नाव घेतले बहामनी किंवा ब्राह्मणी. तर हे मुस्लिम बादशहा हिंदूविरोधी कसे ? ते हिंदूविरोधी नव्हतेच. ११> विजापूरच्या आदिलशाहाची बायको मराठी. आदिलशाहाचा कसा असेल विरोध हिंदूंना ? १२> शिवाजी महाराजांच्या वडीलांचे व काकांचे नाव शहाजी, शरीफजी. ते शहाशरीफ या दर्ग्यावरून ठेवले होते. महाराज तुकाराम व याकूतबाबा यांना गुरु मानत असत. तर ते मुस्लिमविरोधी कसे ? १३> अफजलखानाच्या वधानंतर त्यांनी त्याची कबर बांधली. तर ते मुस्लिमविरोधी कसे ? १४> हा संघर्ष हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हताच. १५> ही दलितांची आणि शोषितांची शोषणाविरुद्धची लढाई होती. १६> महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून काशीहून गागाभट्ट नावाच्या ब्राह्मणाला धाक दाखवून आणि भरपूर लाच देवून राज्याभिषेकासाठी आणावे लागले. १७> संभाजी महाराजही अतिशय विद्वान, शूरवीर होते. बुधभूषण या ग्रंथाची रचना त्यांनी केली. अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांना औरंगजेबाने पकडल्यावर त्यांना शिक्षा स्वतः औरंगजेबाने दिल्यासारखी वाटत नाही. ती शिक्षा मनुवाद्यांनी दिल्यासारखी वाटते. संस्कृत शिकल्याबद्दल जीभ छाटणे, स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिल्याबद्दल डोळे काढणे. या सगळ्या शिक्षा मनुवाद्यांच्या आहेत. मनुस्मृतीला अनुसरून आहेत. १८> महाराजांनंतर आलेल्या 'पेशवाई' मुळे खरा इतिहास बाहेर आला नाही. मनुस्मृती का जाळली हे समजून घेतले पाहीजे. 'संभाजी महाराजांचा शेवट' याबाबत एका थोर संशोधकाने मांडलेले विचारही या लिंकवर आवर्जून पहावेत, समजून घ्यावेत. या नाटकात पोवाडे सादर करणार्‍या मंडळामधे पाशा नावाचा एक मुस्लिम युवक आहे. तोही आपले विचार, वेदना मांडतो. तो म्हणतो "आम्हा मुस्लिमांनाही नेहमी बदनाम केलं जातं. खतरे में है. खतरे में है. असं म्हणून धार्मिक संघर्षात ओढलं जातं. ज्यापासून आम्ही दूर राहायला हवं." "आम्ही इथे ९०० वर्षे राज्य केले हेही आमच्या मनावर सतत बिंबवले जाते." या चर्चेनंतर मिलिंद कांबळे आणि पाशा एक होतात. असे दाखवले आहे इथे खतरे में है. पण काय खतरे में है ? हे मात्र नाटककार तांगडे स्पष्टपणे उच्चारत नाहीत. तर एकूण असे महान संशोधन नाटककाराने आपल्यापुढे मांडल्यावर सर्वसामान्य प्रेक्षक चकीत होऊन जातो. (स्तिमित झालेला) जोग
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 30005
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

In reply to by अवतार

अवतार तुमचा काहीतरी गोंधळ होतोय >इतरांचे धर्मांतर करण्यासाठी मुळात आपली स्वत:ची धार्मिक ओळख आक्रमकांच्या मनात सुस्पष्ट असावी लागते > कालांतराने ज्यांच्यावर "हिंदू" ही ओळख लादली गेली स्वतःची ओळख नसताना ती इतरांवर लादता कशी येइल

In reply to by आशु जोग

ते एकदा म्हणत्तात हिंदु धर्माची स्वतःची अशी ओळखच नाही अन नंतर म्हणतात हिंदुनीही अत्याचार केलेच ... सगळाच घोळ . जाऊ द्या . सोडुन देवु . सर्वच जगाचा इतिहास कत्तली, लुटालूट, अत्याचार, धर्मांधता असल्या गोष्टींनी भरलेला आहे. कोणत्याही एका जातीला, पंथाला किंवा धर्माला त्यातून हात झटकता येणार नाहीत. हिंदु धर्माच्या प्रोअ‍ॅक्टीव्ह हिंसेचे उदाहरण न देता आल्याने , हिंदु धर्माच्या वतीने किमान मी तरी हात झटकुन घेत आहे >>> ज्द्ग्फेव्ज्फव्म्फेव्,व्द्न्व्व्न्व्फ्द्ग्ज्;चिव्ह्निच्घ्ल्द्क्फ्पिचि इओह्ग्विउच्न्फ्ग्ज्फ्ह्ग्र्जोज्त ह्फ्देच्ज्फ्क्ष्हुच्म्;ज्फ्च्म्ध्चोउव्क्ग्ल्चिम्व्च =))

सर्वांनी न चुकता बघावे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

पण एक सुचना. गरळ ओकायला महाराजांचे प्यादे बनवु नका.

In reply to by चिंतामणी

नंदू माधव नावाचे अतिशय प्रतिभावान कलाकार या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. ते आपले आडनाव काही कारणाने लपवतात पण अशा नाटकामुळे त्यांच्याबाबत काही अंदाज बांधता येतात

सगळे बादशहा एवढे छान होते तर शिवाजी महाराजांना नेमके काय काम शिल्लक होते ? आणि मग महाराणा प्रताप, गुरु गोविन्दसिंग यांचे नेमके योगदान काय ?

In reply to by आशु जोग

असं कसं ? काही वाह्यात हिंदूंना वठणीवर आणण्याच काम त्यांनी केलं ना ! थांबा जरा नवा इतिहास लवकरच सर्व बाबींवर प्रकाश टाकेल ;)

तांगडेचे आधीचे नाटक पाहीले तेव्हा वाटले हा चळवळीतला माणूस आहे. काही चांगला विचार लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण या नाटकात सुरुवात छान होते पण नंतर मात्र २०१४ च्या निवडणूकीच्या मतांची जुळणी सुरू आहे असा संशय येऊ लागतो कुठलीतरी अर्धवट माहितीवर आधारीत निष्कर्ष पात्रांच्या तोंडी आहेत. शिवाजीमहाराजांच्या नावाचा जातीय राजकारणासाठी वापर करणारे लोक संभाजी महाराजांच्या हत्येपाशी आल्यावर क्लीन बोल्ड होतात.

त्याचं काय आहे ना. कि ब्राम्हणांवर टिका करण्याइतकी सोप्पी गोष्ट नाही. गेल्या अनेक वर्षांपासुन टिका सुरु आहे. काय मिळालं ? ब्राम्हणांनी आपली वाटचाल अशीच चालु ठेवली आणि बौद्धिक क्षेत्रात व्यवस्थित स्थान मिळवले. कुळकायद्यात ब्राम्हणांच्या जमिनी गेल्या, गांधीहत्येत घरे जाळली, अनेक ब्राम्हणांना मरेपर्यंत बेदम मारलं (आमच्या ओळखीतल्यांना एकांना डोक्यावर इतकं मारलं की ते वेडे झाले आणि तसेच काही वर्षांनी वारले) पण पुर्वी रामदास काकांनी एका ठिकाणी म्हणाल्याप्रमाणे जे कुळ कायद्यात गमावलं ते सिलिकॉन व्हॅलीने परत मिळवुन दिलं. एव्हरी ब्लडी डॉग हॅज हिज डे. ब्राम्हणांवर कितीही टिका केली तरी आम्हाला आधीही फरक पडत नव्हता, आताही पडत नाही, पुढे पडेल असं वाटतही नाही. एके ठिकाणी वाचलं होतं (बहुदा मिपावरच) की कै. श्रीकांत जिचकरांना विचारलं होतं की ब्राम्हण अत्याचार करतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ? तेव्हा ते म्हणाले होते की गावात या आणि बघा की अत्याचार कोण करत ? ब्राम्हण का बाकीचे उच्चवर्णीय ? पण त्यांच्यावर टिका केली की त्यांचे गुंड नाटकात काम करणा-या चोपुन काढतील. त्यापेक्षा ब्राम्हणांवर टिका केली की विचारवंत म्हणुन कौतुक होते, बाकीचे पण टिका करायला पुढे येतात, म्हणुन हे सर्व चालतं. वर म्हणाल्याप्रमाणे अशी कितीही नाटकं आली तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. हा प्रतिसाद पण दिला नसता, पण ह्या लेखाला मिपावर इतके प्रतिसाद मिळाले ते पाहुन नवल वाटलं.

In reply to by अमोल खरे

आता मला कळलं की इतकी वर्षं होऊन हा प्रकार कसा चालू आहे. अजूनही असा विचार करणारे ब्राम्हण आहेत आणि ते तसं वागून दाखवतात म्हणून या सर्व ब्रिगेडी आणि तत्सम मंडळींचं फावतं किंवा त्यांना कोलीत मिळत राहतं. फक्त एका मुद्द्याशी असहमत नाही -- "बाकीचे उच्चवर्णीय ? पण त्यांच्यावर टिका केली की त्यांचे गुंड नाटकात काम करणा-या चोपुन काढतील. त्यापेक्षा ब्राम्हणांवर टिका केली की विचारवंत म्हणुन कौतुक होते"

In reply to by मैत्र

अजूनही असा विचार करणारे ब्राम्हण आहेत आणि ते तसं वागून दाखवतात म्हणून या सर्व ब्रिगेडी आणि तत्सम मंडळींचं फावतं किंवा त्यांना कोलीत मिळत राहतं.
असा विचार म्हणजे नक्की कसा आणि तसे वागतात म्हणजे नक्की कसे वागतात ते जर एकदा विशद करून सांगता का?? अमोल च्या प्रतिसादात नक्की काय खटकले ते सांगितलेत तर उपकार होतील साहेब.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यावर पूर्वी दुसर्‍या एका लेखात चर्चा झाली होती त्याची आठवण आली. मिपावर सध्या शोध घेता येत नाहीये म्हणून दुवा देऊ शकत नाही. "कि ब्राम्हणांवर टिका करण्याइतकी सोप्पी गोष्ट नाही. गेल्या अनेक वर्षांपासुन टिका सुरु आहे. काय मिळालं ? ब्राम्हणांनी आपली वाटचाल अशीच चालु ठेवली आणि बौद्धिक क्षेत्रात व्यवस्थित स्थान मिळवले. " "ब्राम्हणांवर कितीही टिका केली तरी आम्हाला आधीही फरक पडत नव्हता, आताही पडत नाही, पुढे पडेल असं वाटतही नाही. " या मागचा विचार / वृत्ती काय दिसते मेहेंदळे साहेब. वरवर सहज दिसणार्‍या या वाक्यांमागे मला तरी ब्राम्हण असल्याची आढ्यता दिसते. असा विचार असला तर तो वागण्यात येतो आणि समोरच्यालाही समजतं ते वर्तन. मग अशी आढ्यता दाखवणारे ब्राम्हण आणि बिनडोकपणे सरसकट ब्राम्हणद्वेष करणारे ब्रिगेडी यात फरक तो काय?

In reply to by मैत्र

मैत्र यांचे म्हणणे पटले त्यांचे खोटे आरोप कुणीही आपल्या वर्तनाने खरे करून दाखवू नयेत. कुणीही आपल्या हाताने दुसर्‍यांना कोलीत देऊ नये.

नाटकाच्या शेवटी पाशा, मिलिंद कांबळे, गरीबदास हे एकत्र येतात. पण ही सहज घडणारी घटना न वाटता केवळ मतांची बेरीज वाटते. महात्मा ज्योतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, औरंगझेब यांची भलामण कशासाठी तर त्यांच्या अनुयायांच्या मतांसाठी. फुले, आंबेडकर यांच्याबद्दल प्रेम नसून त्यांच्या अनुयायांच्या मतांमधे रस आहे

गर सिवाजी न होते तो ..... हे … कविराज भूषण यांनी जे म्हटले आहे त्यात कितपत तथ्य आहे.

काही वर्षांपूर्वी एका साहेबांनी निरनिराळ्या पत्रकार, साहीत्यिक, इतिहास अभ्यासक यांची बैठक बोलाविली होती. हे साहेब म्हणजे राजकारणातले साहेब नव्हेत. हे साहेब म्हणजे या सगळ्या चळवळीचे नेते किंवा पितॄत्व असलेले साहेब. (यांची ग्रंथसंपदा अफाट आहे) असो तर या साहेबांनी एक बैठक बोलाविली होती. त्यामधे त्यांनी सुरुवातीलाच हेतू स्पष्ट केला की या पुढे संशोधन करताना कोणतीही ब्राह्मणविरोधी गोष्ट दिसली की ती लोकांसमोर आणायची आणि विशेषत: ब्राह्मण समाजातील संतांची जर काही निगेटीव्ह गोष्ट दिसली तर त्याला मोठी प्रसिद्धी द्यायची. यात सहभागी एकाने विचारले, "साहेब, तुमची आई केव्हातरी तरुण असेल, तरुणपणी तिने काही चूक, अपराध केला असेल प्रत्यक्ष कृती नाही पण तसा विचार तरी केला असेल" साहेब भडकले, म्हणाले, "ए कोणाच्या आईबद्दल बोलतो आहेस रे तू" यावर उत्तर आले, " तुमच्या आईबद्दल बोलले तर इतका राग येतो मग हे संत म्हणजे आमची आईच आहेत त्यांच्याबद्दल बोललेले आम्ही कसे सहन करू" बैठक तिथेच आटोपली.

In reply to by आशु जोग

हे साहेब नक्कीच पश्चिम महाराष्ट्रातले असणार ... आजकाल हे लोक फॉर्मात आहेत ...परवाच परेळ स्टेशन वर मी पुस्तक पाहिले " मी दासबोध जाळणार आहे "( लेखकाचे नाव टाळलेलेच बरे ) =)) अवांतर : अशीच एक घटना मीही ऐकुन आहे ...

काही काही प्रतिसादांमध्ये क्रौर्याची जी वर्णने आहेत ती बघून त्याकाळी माणसांचेच राज्य होते ना अशी शंका येते. अर्थात ही सगळी माहिती खरी आणि बिनचूक असेल तर. बाकी इतिहासाची थडगी उकरावीत तेवढी भूतकाळाची निर्जीव मातीच हाती लागते. आपण इतिहासातून शिकतो कमी पण वर्तमानकाळ मात्र नक्कीच खराब करतो. भारतीयांची ती खास ओळख आहे. असो.

In reply to by समीरसूर

काही काही प्रतिसादांमध्ये क्रौर्याची जी वर्णने आहेत ती बघून त्याकाळी माणसांचेच राज्य होते ना अशी शंका येते.
26/11,9/11,1993 चे स्फोट आणि दंगली ,आसाम आणि म्यानमार च्या दंगली,हिटलर ,हिरोशिमा नागासाकी हे वाचूनसुद्धा 300 वर्षा नंतरचा माणूस हेच म्हणेल ;)

कोकाटे नाही त्यांचेही साहेब आहेत हे आणि राजकारणातले साहेब नाहीत. मनोरंजनासाठी यांच्या पुस्तकाची नावे एकदा देइन इथे.

चित्रपटासारखी माध्यमेदेखील काही विचार पेरताना दिसतात . काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता. त्यात एक मंत्री गद्दार, देशद्रोही असतो. त्याचे नाव देवधर आणि डॉ. अन्सारी प्रखर देशभक्त. असे दाखवून काय साध्य झाले. अहो देवधरला देश सोडावा लागला तर जगात दुसरा कोणताच देश त्याला घ्यायला तयार होणार नाही पण अन्सारीला मात्र ५० देश आहेत. आमच्या मराठवाड्यातली औरंगबाद, नांदेडची उदाहरणे पहा. तिथली मुले दहशतवादाचे ट्रेनिंग घेण्यासाठी सौदीला चकरा मारतात. पानिपतावर लढणार्‍या मराठ्यांकडे काही अफगाणांची पगारी फौज होती. ऐन युद्धाच्या वेळी मात्र त्यांच्या तलवारी मराठ्यांच्याच विरुद्ध उलटल्या. गद्दारी केल्यास स्वर्गात स्थान मिळेल असे तत्त्वज्ञान डोक्यात भरवले असणार या अफगाणांच्या.

> सर्वच जगाचा इतिहास कत्तली, लुटालूट, अत्याचार, धर्मांधता असल्या गोष्टींनी भरलेला आहे. कोणत्याही एका जातीला, पंथाला किंवा धर्माला त्यातून हात झटकता येणार नाहीत काहीतरी जनरल टाकला म्हणजे २ मिनिटे विचारवंताचा फील येतो हे खरे आहे पण आपण ज्या हवेतल्या अ‍ॅबस्ट्रॅक्ट गोष्टी बोललात त्याचा व्यवहारात नेमका अर्थ काय

In reply to by आशु जोग

शब्दांत जे लिहिले आहे त्याला जनरल आणि अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणणे ही विचारवंत होण्याची लक्षणे आहेत असे आजवर उगाचच वाटत होते. त्यासाठी स्पष्ट लिहिणे पुरेसे असते हे नवलच म्हणायचे! वर जे काही लिहिले आहे तोच त्या शब्दांचा नेमका अर्थ आहे. ज्यांना त्या गोष्टी हवेतल्या वाटत असतील त्यांनी व्यवहारातील कठोर सत्ये स्वीकारण्याची सवय लावून घेतली तर तो अर्थ आपोआप स्पष्ट होईल.

नगरचा निजामशहा मूळचा कुलकर्णी होता, तरीच म्हणतो आमच्यात हे राजेशाही गुण , रुबाब , तोरा , कुठून आला आता उत्तर सापडले . आतच माझ्या पत्नीला सांगतो , आमचे पूर्वज राज्यकर्ते होते. पुढे ते डोंबिवलीत स्थायिक झाले.

छत्रपती संभाजी महाराज यांची उद्या पुण्यतिथी. चला वढूला, संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण करायला

महाराज रमझानमधे रोझे पाळत होते. त्यांना पूर्ण कुराण मुखोद्गत होते. आणि अर्थातच संभाजीराजांनाही! प्रत्येक शुभ कार्याची नव्हे पाक कामाची शुरुआत ते बिस्मिल्ला उर्रहमानउर्रहीम ह्या पवित्र प्रार्थनेने करायचे. हर हर महादेव वगैरे साफ झूठ! मुळात हे राजघराणे हिंदू नव्हतेच. अस्सल मुस्लिम घराणे होते हे म्हणूनच इतके न्यायी, नि:स्वार्थी, नेतृत्वकुशल होते ते. हिंदू धर्मात काहीतरी खोट आहे ज्यामुळे तिथे इतका थोर पुरुष जन्माला येणे शक्यच नाही. मुळात गोब्राह्मणसंहारक अशी पदवी भटी कावा करुन गोब्राह्मणप्रतिपालक अशी बदलली तिथेच सगळे पितळ उघडकीस आले. शिवाजी झिंदाबाद! अल्लाहु अकबर!

In reply to by हुप्प्या

मित्रा, असे प्रतिसाद नको देत जाऊ रे. तुला ज्यांना खरच मॅसेज द्यायचा आहे त्यांच्यापर्यंत असे लोक मिपावर (बहुदा) येत नाहि. बाकिच्यांची मने मात्र दुखावली जातात. अशाने हे संस्थळ अनेक चांगल्या सभासदांपासुन वंचीत राहील. काहि अगोदरच येण्याचे टाळतात, काहि नविन जोडायचे थांबतात. (सामाजीक सद्भावनेबद्दल वगैरे भाषण देत नाहि. आपण सध्या मिपापुरता विचार करुया) अर्धवटराव