'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'
बर्याच दिवसांनी एक असे नाटक पहायला मिळाले जे नाटक काही ऐतिहासिक सत्याचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करते. त्याची नव्याने मांडणी करते.
पण त्यापूर्वी...
या नाटकातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकाची भाषा.
सध्या मराठीमधे ग्रामीणच्या नावाखाली प्रेक्षकांच्या माथी काहीच्या बाही मारलं जातंय.
ग्रामीण चित्रपटात शहरी कलाकार 'ग्रामीण'च्या नावाखाली चित्रविचित्र हेल काढून बोलत राहतात .
सगळी सोंगं आणता येतात पण भाषेचं सोंग नाही आणता येत त्यामुळे जी भाषा आपली नाही
ती बोलायच्या फंदात पडा कशाला ?
या नाटकातले सगळे कलाकार स्वतःची ओरिजीनल भाषा बोलतात त्यामुळे भाषेत सहजता आहे.
त्यांच्या जीभेवर ती भाषा लादल्यासारखी वाटत नाही.
यातले पोवाडे खड्या आवाजात आहेत. कलाकार आपापली भूमिका नीटपणे वठवतात.
यातले काही शब्द पहा
मधात - मधे
नटाएला - नटाला
कामून रे - का म्हणून रे
असे अनेक खास शब्द ऐकायला मिळतात. ही भाषा नुसती शब्दात नाही मांडता येणार.
उदा. "काही बी बोलssतो". लांबवलेला ल. जे त्या भागातले असतील त्यांना हे लक्षात येइल.
मेल्या मुडद्या टकुरं डोसकं, आत्ता ग बया याशिवायही ग्रामीण असू शकते ही कल्पना अनेकांसठी नवीन असेल.
असो.
काय आहे या नाटकात -
इ. स. १६८०. स्वर्गात इंद्रदेव यमाला बोलवून घेतो आणि सांगतो.
पृथ्वीवर जा आणि शिवाजीमहाराजांना त्यांच्या विचारांसकट घेऊन ये. पण शिवाजीमहाराज यमाच्या तावडीतून निसटतात आणि त्यानंतर कित्येक शतके यम महाराजांचा शोध घेतच राहतो. ३५० वर्षानंतर महाराजांचा विचार यमाला भीमनगर मोहल्ल्यांमधे 'मिलिंद कांबळे' याच्या रुपाने सापडतो.
पण हा शोध घेताना नाटककार राजकुमार तांगडे(दलपतसिंग येता गावाचे लेखक) काही नवे शोध मांडतात.
१> "शके १५८१ विकारीनाम संवत्सर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमी, गुरुवार दुपारी आठवे तासी
स्थळ - प्रतापगड "
असे तपशील एका दमात घडाघडा म्हणून दाखवणे म्हणजे शिवचरीत्र नव्हे.
(आपल्या लक्षात आले असेल हा टोला कोणाला ते)
२> गोब्राह्मणप्रतिपालक - यावर नाटककाराचे भाष्य असे - "खरेतर ब्राह्मणांपासून रक्षण करा गायींचे असे म्हणायला हवे"
३> महाराज गोब्राह्मणप्रतिपालक असते तर त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याला का ठार केले असते ?
४> महाराजांचे ३३ पैकी ११ म्हणजे ३३% अंगरक्षक मुस्लिम होते. मग महाराजांचा संघर्ष मुसलमानांविरुद्ध कसा.
५> महाराज धर्मासाठी लढले नाहीत .
६> महाराजांना गरजच नाही वाटली धर्माची. उलट धर्मालाच मोठे होण्यासाठी महाराजांची गरज वाटली.
७> त्यांच्या सैन्यात ३५ % मुसलमान होते.
८> हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर हे त्यांच्या सेवेत होते. अति विश्वासू होते.
तर ते मुसलमानाविरुद्ध कसे ?
९> अफजलखानाचे पोट फाडले, शायिस्तेखानाची बोटे तोडली एवढेच सांगितले जाते. त्यांनी अनेक मराठा सरदारांनाही शासन केले हे सांगितले जात नाही.
१०> नगरचा निजामशहा मूळचा कुलकर्णी होता, हसन गंगू बहामनी लहानपणी एका भटाच्या
घरी वाढला म्हणून त्याने नाव घेतले बहामनी किंवा ब्राह्मणी.
तर हे मुस्लिम बादशहा हिंदूविरोधी कसे ? ते हिंदूविरोधी नव्हतेच.
११> विजापूरच्या आदिलशाहाची बायको मराठी. आदिलशाहाचा कसा असेल विरोध हिंदूंना ?
१२> शिवाजी महाराजांच्या वडीलांचे व काकांचे नाव शहाजी, शरीफजी. ते शहाशरीफ या दर्ग्यावरून ठेवले होते. महाराज तुकाराम व याकूतबाबा यांना गुरु मानत असत. तर ते मुस्लिमविरोधी कसे ?
१३> अफजलखानाच्या वधानंतर त्यांनी त्याची कबर बांधली. तर ते मुस्लिमविरोधी कसे ?
१४> हा संघर्ष हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हताच.
१५> ही दलितांची आणि शोषितांची शोषणाविरुद्धची लढाई होती.
१६> महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून काशीहून
गागाभट्ट नावाच्या ब्राह्मणाला धाक दाखवून आणि भरपूर लाच देवून राज्याभिषेकासाठी आणावे लागले.
१७> संभाजी महाराजही अतिशय विद्वान, शूरवीर होते. बुधभूषण या ग्रंथाची रचना त्यांनी केली.
अनेक भाषा त्यांना अवगत होत्या.
त्यांना औरंगजेबाने पकडल्यावर त्यांना शिक्षा स्वतः औरंगजेबाने दिल्यासारखी वाटत नाही.
ती शिक्षा मनुवाद्यांनी दिल्यासारखी वाटते. संस्कृत शिकल्याबद्दल जीभ छाटणे,
स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिल्याबद्दल डोळे काढणे.
या सगळ्या शिक्षा मनुवाद्यांच्या आहेत. मनुस्मृतीला अनुसरून आहेत.
१८> महाराजांनंतर आलेल्या 'पेशवाई' मुळे खरा इतिहास बाहेर आला नाही.
मनुस्मृती का जाळली हे समजून घेतले पाहीजे.
'संभाजी महाराजांचा शेवट' याबाबत एका थोर संशोधकाने
मांडलेले विचारही
या लिंकवर
आवर्जून पहावेत, समजून घ्यावेत.
या नाटकात पोवाडे सादर करणार्या मंडळामधे पाशा नावाचा एक मुस्लिम युवक आहे.
तोही आपले विचार, वेदना मांडतो. तो म्हणतो "आम्हा मुस्लिमांनाही नेहमी बदनाम केलं जातं.
खतरे में है. खतरे में है. असं म्हणून धार्मिक संघर्षात ओढलं जातं. ज्यापासून आम्ही दूर राहायला हवं."
"आम्ही इथे ९०० वर्षे राज्य केले हेही आमच्या मनावर सतत बिंबवले जाते."
या चर्चेनंतर मिलिंद कांबळे आणि पाशा एक होतात. असे दाखवले आहे
इथे खतरे में है. पण काय खतरे में है ?
हे मात्र नाटककार तांगडे स्पष्टपणे उच्चारत नाहीत.
तर एकूण असे महान संशोधन नाटककाराने आपल्यापुढे मांडल्यावर सर्वसामान्य प्रेक्षक चकीत होऊन जातो.
(स्तिमित झालेला) जोग
वाचने
30005
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवतार
In reply to जबरदस्तीने धर्मप्रचार by अवतार
जाउन द्या ...
In reply to अवतार by आशु जोग
http://dc177.4shared.com/img
नाटक छान आहे.
लगे रहो.
नंदू माधव नावाचे अतिशय
In reply to लगे रहो. by चिंतामणी
हरिश्चंद्राची फॅक्टरी - फाळके
In reply to नंदू माधव नावाचे अतिशय by आशु जोग
हे कारस्थान अजून सुरूच आहे का
सगळे बादशहा एवढे छान होते तर
असं कसं ? काही वाह्यात
In reply to सगळे बादशहा एवढे छान होते तर by आशु जोग
. .
विषयांतर
In reply to . . by आशु जोग
महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ
त्याचं काय आहे ना. कि
आत्ता समजलं..
In reply to त्याचं काय आहे ना. कि by अमोल खरे
अजूनही असा विचार करणारे
In reply to आत्ता समजलं.. by मैत्र
वृत्ती
In reply to अजूनही असा विचार करणारे by विश्वनाथ मेहेंदळे
मैत्र यांचे म्हणणे पटले
In reply to वृत्ती by मैत्र
मतांची बेरीज
कवि भूषण
बर्याच अंशी तथ्य आहे.
In reply to कवि भूषण by आशु जोग
काही वर्षांपूर्वी एका
हा हा हा
In reply to काही वर्षांपूर्वी एका by आशु जोग
गरीब कोकटे आपलं कोकलणारे
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
इतिहास
काही काही प्रतिसादांमध्ये
In reply to इतिहास by समीरसूर
इंडीड!!!
In reply to काही काही प्रतिसादांमध्ये by मालोजीराव
कोकाटे नाही त्यांचेही साहेब
खेडेकर नैतर साळुंखे नैतर अजून
In reply to कोकाटे नाही त्यांचेही साहेब by आशु जोग
साळुंखेंना सोडा सध्या.
चित्रपटासारखी माध्यमेदेखील
या नाटकातल्यासारखाच प्रचार
Endless !
> सर्वच जगाचा इतिहास कत्तली,
अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ
In reply to > सर्वच जगाचा इतिहास कत्तली, by आशु जोग
हे राम !
In reply to अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ by अवतार
नगरचा निजामशहा मूळचा कुलकर्णी
हा हा हा
In reply to नगरचा निजामशहा मूळचा कुलकर्णी by निनाद मुक्काम …
चलो वढू !
नवे संशोधन
एक विनंती
In reply to नवे संशोधन by हुप्प्या