Skip to main content

ईस्टर स्पेशल- चॉकलेट एग नेस्ट

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 31/03/2013 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी डार्क चॉकलेट तुकडे करुन घेणे १/२ वाटी श्रेडेड व्हिट (तुम्ही कॉर्नफ्लेक्स्,ओट्सचा वापर पण करु शकता) १/४ वाटी डेसीकेटेड कोकोनट (हलके भाजून घेतलेले) रेडीमेड चॉकलेट एग्ज्(बाजारात मिळतात) मफिन फॉईल केसेस/कप्स/पेपर कप्स/ट्रे (मी सिलिकॉन कप्स व मोल्ड वापरले आहे) . पाकृ: एका बाऊलमध्ये श्रेडेड व्हिट घेऊन हाताने चुरडून घ्या. त्यात डेसीकेटेड कोकोनट घालून एकत्र करा. मायक्रोव्हेव सेफ बाऊलमध्ये तुकडे केलेले चॉकलेट घालून मिडियम पॉवर वर २०-३० सेकंद गरम करुन घ्या (हलके गरम झाले असताना बाहेर काढून मिक्स करा म्हणजे ते वितळायला लागेल). गरज वाटल्यास आणखीन १० सेकंद गरम करुन घ्या. चॉकलेट २ मिनिटे गार होऊ द्या म्हणजे ते चांगले पसरेल. आता २ चमचे वितळलेले चॉकलेट मफिन कपमध्ये घालून कप सगळीकढून फिरवून घ्या,म्हणजे चॉकलेट सारखे लागेल. असे सगळे कप्स तयार करुन घ्यावे व फ्रिजमध्ये ३० मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे. . मफिन ट्रे/मोल्ड ल ग्रीज करुन घ्यावे. उरलेले, वितळलेले चॉकलेटच्या बाऊलमध्ये श्रेडेड व्हिट व डेसीकेटेड कोकोनटचे मिश्रण घालून एकत्र करावे. हे मिश्रण ग्रीज केलेल्या मोल्डमध्ये चमच्याने घालून, दाबून पसरवावे. मध्ये जरा अंगठ्याने किंवा चमच्याने दाबून घ्यावे. हे ही फ्रिजमध्ये सेट कोण्यासाठी ठेवावे. सेट झालेले चॉकलेट कप्स हलक्या हाताने सोडवून घ्यावे तसेच सेट झालेले चॉकलेट्चे घरटे कडेला सुरी फिरवून सोडवणे. चॉकलेट कप्समध्ये चॉकलेटचे घरटे ठेवून त्यावर चॉकलेटचीच अंडी लावावी. गार करून सर्व्ह करावे. . लहान मुलांसाठी मस्त खाऊ होऊ शकतो. तुम्ही चॉकलेट कप्सचा वापर डेझर्ट्ससाठी करु शकता. .

वाचने 4876
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

हे चॉकलेट कप्स/नेस्ट हे नेहमीच गार सर्व करावे लागत असतील ना? नाहितर रुम टेंपरेचरला आल्यावर मेल्ट होतील ना?

In reply to by दिपक.कुवेत

हो गारच सर्व्ह करावे. चॉकलेट कप्सचा वापर शक्यतो डेझर्ट्समध्ये केला जातो म्हणून थंड सर्व्ह करावे :)

फोटो मी रिसाइझ केले. विडथ साधारण ७००च्या आत ठेवली तर फोटोज मावतात बरोबर. फार छान आहेत नेस्टस. आवडली.

इस्टरसाठी परफेक्ट रेसेपी :) खूपच आवडली .

मस्तच! खास ईस्टर स्पेशल पाकृ खूपच गोड आणि सुरेख!!

मॉऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑम कॅन आय हॅव दॅट लव्हेंडर एग प्लीज..........!