साहित्यः
१ वाटी डार्क चॉकलेट तुकडे करुन घेणे
१/२ वाटी श्रेडेड व्हिट (तुम्ही कॉर्नफ्लेक्स्,ओट्सचा वापर पण करु शकता)
१/४ वाटी डेसीकेटेड कोकोनट (हलके भाजून घेतलेले)
रेडीमेड चॉकलेट एग्ज्(बाजारात मिळतात)
मफिन फॉईल केसेस/कप्स/पेपर कप्स/ट्रे (मी सिलिकॉन कप्स व मोल्ड वापरले आहे)
पाकृ:
एका बाऊलमध्ये श्रेडेड व्हिट घेऊन हाताने चुरडून घ्या.
त्यात डेसीकेटेड कोकोनट घालून एकत्र करा.
मायक्रोव्हेव सेफ बाऊलमध्ये तुकडे केलेले चॉकलेट घालून मिडियम पॉवर वर २०-३० सेकंद गरम करुन घ्या (हलके गरम झाले असताना बाहेर काढून मिक्स करा म्हणजे ते वितळायला लागेल).
गरज वाटल्यास आणखीन १० सेकंद गरम करुन घ्या.
चॉकलेट २ मिनिटे गार होऊ द्या म्हणजे ते चांगले पसरेल.
आता २ चमचे वितळलेले चॉकलेट मफिन कपमध्ये घालून कप सगळीकढून फिरवून घ्या,म्हणजे चॉकलेट सारखे लागेल.
असे सगळे कप्स तयार करुन घ्यावे व फ्रिजमध्ये ३० मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे.
मफिन ट्रे/मोल्ड ल ग्रीज करुन घ्यावे.
उरलेले, वितळलेले चॉकलेटच्या बाऊलमध्ये श्रेडेड व्हिट व डेसीकेटेड कोकोनटचे मिश्रण घालून एकत्र करावे.
हे मिश्रण ग्रीज केलेल्या मोल्डमध्ये चमच्याने घालून, दाबून पसरवावे. मध्ये जरा अंगठ्याने किंवा चमच्याने दाबून घ्यावे.
हे ही फ्रिजमध्ये सेट कोण्यासाठी ठेवावे.
सेट झालेले चॉकलेट कप्स हलक्या हाताने सोडवून घ्यावे तसेच सेट झालेले चॉकलेट्चे घरटे कडेला सुरी फिरवून सोडवणे.
चॉकलेट कप्समध्ये चॉकलेटचे घरटे ठेवून त्यावर चॉकलेटचीच अंडी लावावी.
गार करून सर्व्ह करावे.
लहान मुलांसाठी मस्त खाऊ होऊ शकतो.
तुम्ही चॉकलेट कप्सचा वापर डेझर्ट्ससाठी करु शकता.

वाचने
4876
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप सुंदर.... Happy Easter
पाकॄ छान आणि फोटो पाहुनच खल्लास
एक शंका...
हो गार सर्व्ह करावे
In reply to एक शंका... by दिपक.कुवेत
भारी आयडीया! ईस्टरच्या
फोटो मी रिसाइझ केले. विडथ
धन्यवाद अपर्णाताई
In reply to फोटो मी रिसाइझ केले. विडथ by स्पंदना
(No subject)
एकदम सुपर रेसिपी!
सुंदर
सानिका काय एकेक आयडिया असतात गं!!
ऑमॉमॉम.... छॉने!
खुप सुंदर.
सह्ही !!!!!
व्वाह!
तुमची ईस्टर पार्टी छानच रंगली
उम्म्म्म्म