Skip to main content

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

लेखक सुहास झेले यांनी शुक्रवार, 23/11/2012 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!

वाचने 448122
प्रतिक्रिया 716

प्रतिक्रिया

In reply to by गणपा

टीनटीन गेमची अ‍ॅन्ड्रॉईडसाठी..लिंक आहे का कोणाकडे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्याकडे आहे ,पण फ्री पायजे का इकत

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

http://www.androidgamesroom.com/stand-alone-games/82367.htm हे घ्या फ्री https://play.google.com/store/apps/details?id=com.gameloft.android.ANMP… आणी हे इकत कस वाटल ते बी कळवा नाय आवडल तरी बी कळवा

In reply to by श्री गावसेना प्रमुख

दुव्याबद्दल धन्स. सिंबियनफोनवर माझ्याकडे हा गेम होता. प्रवासात या गेमने माझी चांगली सोबत केली आहे. लेकराचा तर हा गेम जीव की प्राण आहे. असो, खरं तर क्रॅक व्हर्जन असतं तर.... बरं राहीलं असतं. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा डॉ , कालेजात खेळायला वेळ मिळतो वाट्ट. ;-)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

अर्रर्र...या व्हिडोच्या टाईपमधे पाहिजे होता मला. आणि ते विकतचे असावे. http://www.youtube.com/watch?v=P76f7hnollA -दिलीप बिरुटे

माताय... मिपचे अ‍ॅप आहे?? लईच भारी की ! बाकी २० पैसे टाकूच काही वेळात ! जे.पी.

छान माहितीपूर्ण लिहिलेत एकदम. धन्यवाद.

सुहासराव लयं भारी लिवलं हाय ! :) माझ्या फोन मधली अ‍ॅप्स इथे देतो :- १)Dictionary - Merriam-Webster शब्दकोश २)Any.DO To Do List | Task List & Life Reminders काय काय काम करायचे आहे याची नोंद ठेवण्यासाठी ही दोन झकास अ‍ॅप्स आहेत. ३)Tiny Flashlight + LED फ्लॅश लाईट... वीज जाण्याचा प्रसंग बर्‍याच वेळा येत असल्याने रात्रीच्या वेळी बर्‍याचदा या अ‍ॅपचा मला फायदा झाला आहे.विविध रंगाचा प्रकाश्,टच प्रमाणे कमी जास्त करणारा बल्बचा प्रकाश ,फ्लॅश लाईट इं या अ‍ॅप मधे आहेत. :) ४)ES File Explorer File Manager अ‍ॅन्ड्रॉईड फोनसाठी एक सोप्पा आणि मस्त फाईल एक्सप्लोरर आणि अ‍ॅप्लिकेशन मॅनेजर. ५)ShaPlus Caller Info (India) कॉलर आयडी.कोणता कॉल कुठल्या देशातुन आला, नेटवर्क मधुन आला याची माहिती या अ‍ॅपमुळे मिळते. ६)Free Unit Converter किलोमिटर, मिटर इं इं कन्व्हर्ट करण्यासाठी असलेले एक सोप्पे अ‍ॅप. ७)JuiceDefender - battery saver अ‍ॅन्ड्रॉईड फोनची बॅटरी सेव्ह करण्यासाठीचे एक उत्तम अ‍ॅप. ८) Hindu Calendar & Hindu Calendar & Panchanga कॅलेंडर आणि पंचांग (कॅलेंडर मधे सुद्धा पंचांगातली माहिती आहे.) गेम्स बद्धल नंतर...

In reply to by मदनबाण

धन्स बाणा... गेम्स मी जास्त वापरत नाही. तरी टेंम्पल रन, बुद्धिबळ, मोटोरेस, स्टिक क्रिकेट हेच गेम्स इंस्टॉल केलेत आणि हो तू कुठला फोन वापरतोस ते पण कळू देत.... :) :)

In reply to by सुहास झेले

मी सध्या सॅमसंग गॅलॅक्सी वाय वापरतो आहे. एक वर्ष झाले घेउन अजुन मस्त चालतो आहे. ;) गेम्स म्हणशील तर... उगाच काही डाउनलोड मारुन ठेवले आहेत. १) Tic Tac Toe मध्यंतरी असेच एकदा मनात विचार आला की लहानपणी फुल्ली-गोळा हा टिपी खेळ खेळायचो,तो मिळेल काय ? तर मिळाला. या फुल्ली-गोळा खेळाचे फिरंगी नाव Tic Tac Toe २)NinJump डाव्या बाजुला -उजव्या बाजुला असे उड्या मारत-मारत वर जाणारा हा खेळ ठीक-ठाक आहे. ३)Aliens Invasion एक टिपी एलियन गेम. ४)Bubble Blast 2 एक मस्त खेळ ५)Drop सगळ्यात सोप्पा पण अ‍ॅडिक्टीव गेम. ६)Air Control Lite मला सगळ्यात जास्त आवडलेला हा खेळ आहे, विमानांना धावपट्टीवर उतरवायचे काम म्हणजे हा खेळ. :) ७)aTilt 3D Labyrinth Free कुठल्याही वयोगटाला आवडेल असा मोशन सेंसर गेम. ८) Abduction! एकदम टिपी गेम.:) ९)PapiJump हा वरच्या खेळाचाच जुळा भाऊ पण जरा जास्त व्हरायटी असलेला. १०)Flow Free आत्ता पर्यंत मी पाहिलेला सगळ्यात आगळा वेगळा आणि सुंदर खेळ. एकदा तरी प्रत्येकाने याचा आनंद घ्यावा असे मला वाटते. हा अजुन एक गेम सांगायचा राहिला, तो म्हणजे Fruit Sorter एकदम झकास गेम पण हा माझ्या ऑफिसमधल्या सहकार्‍याच्या मोबल्यावरती हाय ! :( माझ्या फोनवर हा काही चालत नाही ! :( पण तुम्ही नक्कीच ट्राय मारा,नक्की आवडेल. :) अजुन काही गेम्स आहेत पण ते सर्व इथे देत बसत नाही... जाता जाता :--- नाशिकच्या मानस गाजरे याने बनवलेला Balloon, Bow & Arrow हा गेम सध्या अँग्री बर्ड पेक्षा जास्त भाव खात आहे अशी बातमी आहे. संदर्भ :--- http://alturl.com/66g73

In reply to by मदनबाण

तुमचा प्रतिसाद वाचून . 'बबोए' हा गेम डाऊनलोडवला आणि पस्तावलो, राव.. लै बोर गेम आहे, यार.. म्हणजे मराठी माणसाने गेम बनवला ह्याचं कौतुक आहे, पण 'अॅंग्री बर्ड्स पेक्षाभारीबिरी जरा जास्तच होतंय.. श्री. मांडवगणे ह्यांनी बनवलेले 'हिंदू कॅलेंडर' मात्र खरेच सुंदर आहे..

In reply to by चिगो

ण 'अॅंग्री बर्ड्स पेक्षाभारीबिरी जरा जास्तच होतंय.. असं मी म्हणत नाहीये,तर एबीपी माझावाले सांगत आहेत.त्यांच्या बातमीचा दुवा मी माझ्या प्रतिसादात दिला आहे. मी स्वतः हा गेम अजुन खेळलो नाही त्यामुळे त्या बद्धल माझे मत नोंदवले नाही.

अ‍ॅन्ड्रॉईडला अलविदा करून विंडोज कडे चाललोय ...फॉर अ चेंज म्हणून...नव्या वर्षाच्या सुरवातीस लाखभर नवीन ऍप्लिकेशन्स असतील अशी अपेक्षा आहे !

In reply to by मालोजीराव

चला विंडोज वापरणारं दुसरं कुणीतरी आहे म्हणायचं. मला वाटलं मीच च्यु.... आपलं चूक केली की काय! :) विंडोजच्या अ‍ॅप्लिकेशनचा पण धागा येउ द्या मग.

१. SMS blocker by Optinno. पुण्याच्या कंपनीचे अ‍ॅप. फ्री आहे. नको ते स्पॅम एसेमेस आपोआप कटवते. २. Audio Manager ;) नावासारखे काम करतेच, पण कुछ एक्स्ट्रा भी. फायली, फोल्डर्स लपवणे हे मेन काम. रिव्ह्यूज वाचा. मी वापरतो आहे, छान काम करते. ३. Color Dict ऑफलाईण डिक्शनरी आहे. इन्स्टॉल करायला जरा किचकट आहे, पण एकदा टाकली की नेट न वापरता शब्दार्थ देते. ४. iReader अतीशय सुंदर अ‍ॅप, ईबुक्स वाचण्यासाठी. याच कामासाठी सर्वप्रथम अँड्रॉईड फोन घेतला होता. त्याआधी चायना मोबाईल होता ;) ५. Offline Hindi Dictionary ६. Photo Art ७. Kalnirnay. बाकी माझ्या प्रोफेशनल कामाचे अ‍ॅप्स आहेत. जसे पल्स मोजणारे, स्टेथो, ईसीजी रेकॉर्ड करणारे इ. (फोनः ग्यालेक्षी ३ व टॅब२ P3100

अर्रे वा. माहितीपूर्ण लेख आहे, आवडला. Symbian प्रणालीवर अजून जीव असल्यामुळे अ‍ॅन्ड्रॉईड ला स्पर्श केला नाही. पण अ‍ॅपल आय फोर घेईन (कधी ना कधी) तेव्हा घेईन मजा तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडवर चालणा-या अ‍ॅप्लीकेशनची. मराठी संदेश आणि मिपावर नेटावरुन लिहिण्यासाठी बैडू. बातम्यांसाठी न्युज हंट, पंचाग, टीव्हीसाठी नेक्सजीटीव्ही, कॉल रेकॉर्डिंगसाठी बोल्डबिष्ट, ऑपेरा तर आहेच. आणि गेम म्हणजे अवतार, टीनटीन. :) " -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अ‍ॅपल आय फोर घेईन (कधी ना कधी) तेव्हा घेईन मजा तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडवर चालणा-या अ‍ॅप्लीकेशनची.
हाण्ण... पिडांकाका कुठं आहेत? डब्बल बॅरल हे भाकीत तुम्ही खूप पूर्वीच केले होते. दोन्ही कंपन्यांचा बाजार एका झटक्यात उठवला इथं गुर्जींनी. गुर्जी, हे जेव्हा कराल तेव्हा तुम्ही असाच एक लेख लिहा. आम्ही त्याची मजा घेणार. ;-) (प्रतिसाद हलके घ्यावा. ही केवळ गडबड आहे हे माहितीये.)

In reply to by श्रावण मोडक

गुर्जी लै हुस्शार आहेत. भविष्यात विंडॉज ८ ला टक्कर देण्यासाठी आयओएस आणि अ‍ॅड्राईड अ‍ॅप्लिकेशन्स क्रॉस कॉम्पॅटिबल होतील असे त्यांनी हळूच सुचवले आहे. अर्थात मोसिंकचा अभ्यास सुद्धा त्यांनी केला असावाच ;) गुर्जींचा मर्जर अ‍ॅक्विझिशनचा लिक्विडेशन ब्रँडीग इ चा अभ्यास दांडगा आहे हे त्यांच्या सर्व मसंवरील हुकुमी वाटचालीवरुन लक्षात येतेच. ;)

In reply to by श्रावण मोडक

प्रहघेआ. :) -दिलीप बिरुटे

शामसुंग कंपणी सोताचा मर्हाटी कीबोर्ड देते. तो आहे की नाही ते फोनवर आधी शोधावे. मग त्या बाकी कीबोर्ड अ‍ॅप्सची गरज पडत नाही. हा पर्तिसाद ट्याबवरून टायप्ला आहे. शामसुंगचा कीबोर्ड वापरून

In reply to by सुहास झेले

सेटिंग्ज->locale & Text -> samsung keypad - > writing language. जुन्या फोन मधे ऑप्शन नसेल, नव्यात हिंदी/मराठी दिसते. एकापेक्षा अधिक भाषा सिलेक्ट करता येतात.

सुझे, अ‍ॅंड्रॉईड प्रणालीवर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद! वर उल्लेख केलेली बरीचशी अ‍ॅप्स मी वापरलेली आहेत आणि पुन्हा काढूनही टाकलेली आहेत. याचं कारण म्हणजे हे अ‍ॅप्स डाऊनलोड होताना बायडिफॉल्ट फोन मेमरीमध्ये जातात आणि त्याने फोनची इंटरनल मेमरी कमी होते व त्याचा ऑपरेटींग सिस्टमवर परिणाम होतो. लेख वाचताना नीलकांतची आठवत येतेय. :)

In reply to by किसन शिंदे

किसन, फोन मेमरीमध्ये इन्स्टॉल झालेले अ‍ॅप्स मेमरी कार्डावर टाकणारं App 2 SD अ‍ॅप आहे. ते वापरून सगळे अ‍ॅप्स मेमरी कार्डावर घेऊन फोन मेमरी रिकामी ठेवता येते.

In reply to by नानबा

>>>>>फोन मेमरीमध्ये इन्स्टॉल झालेले अ‍ॅप्स मेमरी कार्डावर टाकणारं App 2 SD अ‍ॅप आहे. ते वापरून सगळे अ‍ॅप्स मेमरी कार्डावर घेऊन फोन मेमरी रिकामी ठेवता येते. फोन मेमरीतील अप्लीकेशन्स मेमरी कार्डावर टाकता येतात हे खरं आहे, परंतु काही अप्लीकेशन्स इंटरनल मेमरीवरच चालतात आणि दुसरी गोष्ट मेमरी कार्डावर जेव्हा अप्लीकेशन्स मुव्ह करतो तेव्हा काही फायली या इंटरनल मेमरीत जाऊनच पडतात. उदा. फायरफॉक्स ब्राऊजर हे वीस एमबीचे आहे. जेव्हा आपण या अप्लीकेशन्सला मेमरी कार्डावर टाकतो त्यातली पाच एमबी फायली या इंटरनल मेमरीवर येऊन पडतातच. कोणी एक्सपर्ट जर अशा इंटरनल मेमरीवरचा लोड कमी करु शकण्याचा उपाय सोप्या पद्धतीने सांगणार असेल तर त्यांचे प्रतिसादाचे मनःपूर्वक स्वागत आहे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर साहेब माझ्याकड एच टी ची चा वाईल्ड फायर होता,त्यात ह्या असल्या फायली उडवायची सोय होती, तशी ती बहुतेक मोबाईल ला सोय असतेच्,नसेलही तर बॅकअप घेउन मोबाइल फॉरमॅट करावा.५ मिनटात खेळ खल्लास. नाहीतर net qin नावाच अँटीव्हायरस जे की फ्री आहे,ते वापरा त्यात अशी सोय असते.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

अँटीव्हायरस हा त्यावरचा उपाय नाही, असे माझे मत आहे. सिष्टीमसाठी त्या फायली आवश्यक असतात त्या फायली उडवल्या तर अप्लीकेशन्स चालत नाही त्यामुळे त्या फायली उडवून उपयोगाचे नाही. (फोनला रुट केल्यानंतर लिंक टू एसडी मार्गे अशा फायली मेमरीकार्डला पार्टीशन (पार्टीशन कसे करायचे त्याची माहिती) करुन पर्यायी इंटरनल मेमरीमधे त्यात अशा फायली परस्पर जातात) पण, असे करुनही अशा फायली इंटरनल मेमरीत येतातच त्यावरचा उपाय हवा होता. असो, माहितीबद्दल आभारी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इंटरनल मेमरीचा लोचा मला सुद्धा सतावतो आहे ! :( आता कुठले नविन अ‍ॅप टाकायचे असल्यास दुसरे एखादे अ‍ॅप अनइनस्टॉल करावे लागेल अशी स्थिती आली आहे. अ‍ॅप टू एसडी याचे नाव आता APPMGRIII{अ‍ॅप मॅनेजर} असे झाले आहे पण च्यामारी फालतुची कॅश उडवण्या पलिकडे याचा काही पण उपयोग नाही. फोनवर बिल्टइन येणारे कंपनी सॉफ्टवेअर सगळ्यात जास्त मेमरी घेउन बसलाय आणि त्याला अनइस्टॉल ही करता येत नाही,याला पर्याय फोन रुट करणे हा आहे पण मला माझ्या फोनचा दगड करण्याची इच्छा नसल्याने त्याला रुट करण्याच्या नादाला अजुन लागलो नाही. अ‍ॅन्टीव्ह्यायरस देखील इंटर्नल मेमरीतच जाउन बसतो असे माझे निरिक्षण आहे.बिल्टइन मेमरी देण्यात ह्या फोन कंपन्या इतका चिंगुसपणा करतात त्याचा लयं लयं राग आला आहे मला.एक्स्टर्नल मेमरी वाढवुन देखील मोबल्या इंटरर्नल मेमरी कमी पडल्याने मंदावतो किंवा सारखा लो स्पेस म्हणुन कोकलत राहतो ! :(

In reply to by मदनबाण

याला पर्याय फोन रुट करणे हा आहे पण मला माझ्या फोनचा दगड करण्याची इच्छा नसल्याने त्याला रुट करण्याच्या नादाला अजुन लागलो नाही.
कंपनी रॉम पेक्षा कस्टम रॉम लय वेळा भारी असतात…३-४ वर्षांचा वैयक्तिक अनुभव आहे…windows आणि android दोन्हीचा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंपनी रॉम पेक्षा कस्टम रॉम लय वेळा भारी असतात हे मला देखील मान्य आहे,पण तू-नळीवर जितके पण फोन रुट करण्याचे व्हिडीयो पाहिलेत त्यात अनेकांच्या प्रतिसादात फोन गंडल्याचे वाचले आहे.फोन डब्बा होण्यापेक्षा आहे. हापिसातल्या एकाने असाच फोन रुट केला होता,पण त्या फोन मधे काही त्रुटी निर्माण झाल्या आहेत.उदा आलेला फोन डायरेक्ट स्पीकर फोनवर ऐकाला येणे.इं. फोन रुट करण्याची सोप्पी समजवुन सांगितलेली पद्धत अजुन तरी माझ्या पाहण्यात आली नाही. :(

In reply to by मदनबाण

मला माझ्या फोनसाठी सहजपणे रन होणारी स्क्रीप्ट मिळाली आणि फोन सहज रुट करता आला, फोन रुट केल्यामुळे इंटरनल मेमरीची जागा (कंपनीने दिलेल्या मेमरीपेक्षा कितीतरी अधिक) मला वाढवता आली आहे. (वरच्या दुव्याप्रमाणे) screenshot(3) माझ्या फोनची इंटरनल मेमरी फक्त वापरायला मिळते १३० एमबी. फोन रुट केला आणि लिंकटू एसडी आणि मेमरीकार्डाचे पार्टीशन केल्यामुळे मला (एसडीकार्ड २ पार्ट दिसतंय ना ) तिथे जवळ जवळ दीड जीबीचा वापर करता आला आहे. इंटरनल मेमरीचा लोड एस्डीकार्ड २ पार्ट इथे येऊन पडतो. (अर्थात ही मेमरीही मला कमीच पडते) ;) -दिलीप बिरुटे (खटपट्या)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ताच हा लेख वाचला,आणि अजुन गोंधळात पडलो आहे. http://www.androidcentral.com/rooting-it-me-some-qa

In reply to by मदनबाण

फ़्लैश मारताना battery ५०% पेक्षा जास्त पाहिजे कारण मध्येच battery संपली तर खरच मोबाईल चा दगड होतो. कस्टम रॉम टाकताना स्टेबल असलेली रॉम टाकावी म्हणजे काही इश्यू येत नाहीत. मी कॅनव्हास घेतल्यावर तिसर्या दिवशीच जेलीबीन कस्टम रॉम टाकली...बेंचमार्क पण वाढला आणि इंटरनल मेमरी पण १.४८ वरून २.६० जीबी झाली.आणि कॅनव्हास च्या रॉम मध्ये इंटरनल मेमरी चे apps एस डी कार्ड वर टाकता येत नव्हते...तो पण प्रश्न नवीन रॉम मुळे मिटला. कस्टम रॉम मुळे warranty गन्डते त्यामुळे महागड्या मोबाईल धारकांनी आधी विचार करावा. - कॅनव्हासधारी मालोजी

In reply to by मालोजीराव

शेवटी एकदाचा माझा अ‍ॅन्ड्रॉइड "रुट" केलाच ! :) LIND2SD टाकले तसेच Root App Delete (uninstaller) टाकले आणि बाय डिफॉल्ट {बोल्टवेअर} येणारी अ‍ॅप्स डिलीट मारली...च्यामारी फुकटची जागा अडवुन बसली होती,नंतर लक्षात आले की LIND2SD ने सुद्धा हेच काम करता येते. त्याचा सुद्धा वापर केला,अजुन एसडी कार्डची पार्टीशन मारली नाहीये... गरज वाटलीच तरच हा पर्याय वापरीन.

In reply to by मालोजीराव

मालोजीराव तुमचा कस्टम रॉमवर हात बसलेला दिसतो,जरा आम्हा गरिबांसाठी लिवा की त्याच्या बद्धल,लयं उपकार होतील बघा. म्या फकस्त रुट केला हाय,कस्टम रॉम टाकण्यास अजुन भ्या वाटतया ! :( अन् जास्त काय बी ठाव नाय त्या बद्धक, कधी तरी ती किडाकांडी सुद्धा करुन पाहिन म्हणतो,सध्या हाय त्या ओएसवर गप्प हाय म्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरूटे सर, मी माझा फोन रूट केला आणि तुम्ही वर सांगितलेलं अ‍ॅपसुद्धा टाकलं. पण माझ्या फोनमध्ये एसडी कार्ड पार्ट २ नॉट फाउंड असा मेसेज येतोय. माझ्या मते आधी पार्टीशन न केल्यामुळे असं झालं असेल. पण मेमेरी कार्डावर पार्टिशन कसं करायचं?? जरा मदत करा ना.

In reply to by नानबा

मिनी टूल्स डाऊनलोड करुन घ्या त्यानंतर मेमरी कार्ड पूर्णतः फॉर्मेट मारा. मिनीटूल्स पार्टीशन विजर्ड अप्लीकेशन संगणकावर उतरवून घ्या. मेमरी कार्ड संगणकावरच फॉर्मेट मारा. मेमरी कार्ड मोबाईलमधे टाकून कॉड लावल्यानंतर डिबंग ऑप्शन मधे जाऊन मासस्टोअर मोडमधे आल्यावर मेमरी कार्ड मिनीटूल्स मधे दिसू लागेल. क्रियेशन सेकंड पार्टीशन या दुव्यावरील छायाचित्रावरुन मग पुढे पार्टीशन करणे सोपे जाईल. मेमरी कार्ड एकदा दोनदा फॉर्मेट करा. मेमरी कार्ड पहिल्यांदाच यशस्वी होत नाही हा प्रयोग. तुम्ही आता अगदी जवळ आला आहात. काही घाबरु नका. प्रयोग यशस्वी होईल. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद. मिनीटूल्स डाऊनलोडिंगला लावलंय. ते झालं की पुढे सरकेन. आणि प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सांगेनच. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरूटे सर, तुम्ही वर दिलेल्या क्रिएशन सेकंड पार्टिशन मध्ये सांगितल्याप्रमाणे मी केलं खरं, पण लिंक २ एसडी अजूनही सेकंड पार्ट नॉट फाउंड असाच मेसेज दाखवतोय.. :(

In reply to by नानबा

:( दुव्यावरील स्टेप्स प्रमाणे केले असते तर जमले असते असे वाटते काही तरी चूक होत आहे. बाय द वे, मोबाइल वर लिंक टू एसडी अप्लिकेशन ओपन करा त्यातील ऑप्शन मधे जाऊन More वर क्लिक करा तिथ रिक्रिएट माऊंट स्क्रिप्ट वर क्लिक करा तिथे ext2 सलेक्ट करा. होईल बहुतेक(नेट बंद अस्ल्यामुले लगेच रिप्लाय करता आल नही आताह मोबी वरुन)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरूटे सर, लफडा कळला. मेमरी कार्डावर पार्टिशन्स झालेच नाहीयेत. पण दुव्यातल्या फोटोंप्रमाणे सगळं झालं तर होतं. परत करून बघावं लागेल. :(

In reply to by मदनबाण

बाण राव्,आपण जे अ‍ॅप वापरतो त्यात आपल्याला सगळेच कामाचे असतातच असे नाही,त्यामुळे जुने अ‍ॅप उडविणे व नवीन टाकणे हे उत्तम,आणी फोन फॉरमॅट करायला अगदी १० ते २०% बॅटरी शिल्लक असली तरी चालते,फारतर ५ १० मिनटाच्यावर वेळ नाही लागत,व फोन डेड झाला तरी एखाद्या मोबाइल शॉपीतुन त्याला सॉफ्टवेअर टाकता येत,जर गॅरंटीत असेल तर उत्तम, अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर ते अ‍ॅप मेमरी कार्डात मुव करु घ्या,

In reply to by श्री गावसेना प्रमुख

श्री साहेब्,जुने अ‍ॅप काढणं आणि नविन टाकण हे चालुच असतं,पण काही अ‍ॅप्स नेहमी वापरली जात नाहीत्,पण ती डिलीट मारावी सुद्धा वाटत नाहीत... रुट केल्याने बोल्टवेअर काढुन टाकल्याने थोडी जागा आता मिळाली आहे,शिवाय एसडीकार्डवर सुद्धा पाढवण्याची सोय झाली आहे,पण हे कस्टम रॉम प्रकरण जरा वेगळ दिसतं. उदा. आता माझा मोबल्या रुट केल्यावर त्याच्यात avast! Mobile Security टाकले,का तर त्यात तुम्हाला रुट अ‍ॅक्सेस असेल तर फायरवॉल इनेबल करता येते,तेच करायला गेलो तेव्हा मला समजले की जरी माझ्या फोनला रुट अ‍ॅक्सेस असला तरी ओएसचा कर्नल सपोर्ट करत नाही,त्याच्यासाठी कस्टम रॉम हवी. आपल्याला जर या कस्टम रॉम बद्धल ठावुक असेल तर या धाग्यावर जरुर लिहा, मला आणि इतर वाचकांना या बद्धल अजुन कळेल.

In reply to by मदनबाण

आपल्याला जर या कस्टम रॉम बद्धल ठावुक असेल तर या धाग्यावर जरुर लिहा
मालक प्रत्येक मोबाईल च्या रॉम वेगळ्या असतात तुमचा मोबाईल चा ब्रान्ड आणि मॉडेल कंचा ?

In reply to by मालोजीराव

कष्टम रोमला मी इच्छूक. पहिलं माझं नाव घ्या. माझा फोन मॉडेल LAVA N400 Android version 4.0.4 Based version - MAUI.11AMD.W11.50.SP.V13.P2 KERNEL VERSION 3.0.13 स्टेबल असलेली रॉम सुचवावी. वर काही माहितीही द्यावी. -दिलीप बिरुटे

In reply to by मदनबाण

तुमच्यासाठी remix-v2 हि एक झक्कास रॉम आहे, बिरुटे सर तुमच्या लावा मोबाईल साठी अद्याप रॉम उपलब्ध झाली नाही :( 'लावा' च जुळ भावंड भेटला तर त्याची रॉम चालू शकेल जशी मी कॅनव्हास ला Mobistel Cynus T2 या जर्मन जुळ्या भावंडाची रॉम वापरली.

In reply to by मालोजीराव

>>>तुमच्यासाठी remix-v2 हि एक झक्कास रॉम आहे, धन्स. लग्गेच लागतो कामाला. >>>तुमच्या लावा मोबाईल साठी अद्याप रॉम उपलब्ध झाली नाही :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर remix-v2 मदनबाण साठी आहे ! तुमच्या लावा च जुळ भावंड शोधाव लागेल जे लय फ़ेमस आहे… म्हणजे त्याची रॉम तुम्हाला चालवता येईल

In reply to by मालोजीराव

ok तरी मला वाटत होतं चित्र जी दिसत होती ती लहान होती. माझ्या मोबिसाठी सेम चालणारी रोम मिळाली तर लिहायला विसरु नका :)

In reply to by मालोजीराव

मी पण कस्ट्म रॉमसाठी प्रचंड इच्छुक. मला बी थोडं सांगा.. सॅमसंग गॅलेक्सी वाय प्रो Model number : GT-B5512 Android Version : 2.3.6 Baseband Version : B5512DDLG1 Kernel Version : 2.6.35.7 dpi@DELL154 #1

In reply to by नानबा

तुमच्यासाठी remix-v2 हि एक झक्कास रॉम आहे ठांकु. पण एक समस्या आहे cwm च्या रिकव्हरी सेटअप मधे माझ्या मॉडेलचे नाव दिसत नाही,मग मी cwm फ्लॅश कसे मारणार ? जर cwm माझ्या मोबल्यात फ्लॅश झाला तरच कस्टम रॉम फ्लॅश मारण्याचा विचार करेन. यावर काय उपाय आहे का ?

In reply to by मदनबाण

XDA फोरम वरुन CWM चा जुगाड केला,CWM फ्लॅश मारले,फोनचा बॅकपण घेतला.remix-v2 डाउनलोड मारले,त्याचा अपडेट पण डाउमलोड केला. इतक सर्व केल्या नंतर लक्षात आले की XDA फोरमवर जिथे CWM डाउनलोड ला दिले होतते तिथे असेही लिहले होते की समजा फ्लॅश मारताना काही झोल झाला तर बॅकअपचा पर्याय निवडु नका,कारण त्या नंतर फोन सॉफ्टब्रीक स्टेटस मधे जाईल कारण फोरमवरचे CWM तितकेसे स्टेबल नाही.:( त्यामुळे सध्या कस्टम रॉमचा नाद सोडुन दिला आहे. नविन फॉट जालावरुन डाउनलोड केले आहेत,त्यातल्या त्यात काही तरी फोनवर बदल्याचे समाधान ! ;) http://www.galaxyyarchive.info/2012/06/7-new-fonts.html (गॅलेक्सी वाय साठी फॉन्ट)

Advanced Task Killer : चालू असलेली अ‍ॅप किल करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो, काहीवेळा अ‍ॅप आपल्याला गंडीवते आणि मोबाईल हॅंगतो तेव्हा सरळ होम वर क्लिक करून डेस्कस्टोप ला यायचे आणि ह्याचा आयकॉन तिथे ठेऊन द्यायचा, एक क्लिक झाला कि काम तमाम. File Manager : एक अतिशय उपयुक्त फाईल मॅनेजर : ह्यात फाईल मॅनिप्युलेशन एकदम व्यवस्थित होतेच, रार फाईल्स अनरार करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो, शिवाय ह्यातून drop-box, Google drive, SkyDrive, LAN connection साठी पूल बनवता येतो. App2SD : ह्याचा उपयोग काय तर वर किसन भाऊंनी म्हटल्याप्रमाणे " हे अ‍ॅप डाऊनलोड होताना बायडिफॉल्ट फोन मेमरीमध्ये जातात आणि त्याने फोनची इंटरनल मेमरी कमी होते व त्याचा ऑपरेटींग सिस्टमवर परिणाम होतो." तर अश्यावेळी हे अ‍ॅप कामाला येते, ह्यातून इंटर्नल मेमरीमधली बहुंतांशी अ‍ॅप्स मेमरी कार्डमध्ये हलवता येतात. MX player : जबरी व्हीडीओ प्लेयर. सहा महिन्यांची विश्वसनीय परंपरा : almost सगळ्या फाईल फॉर्म्याट सपोर्ट करतो. अरे बघताय काय डाऊनलोड करा. Paytm : आजघडीचे मोबाईल रिचार्जसाठीचे विश्वसनीय आणि किचकट नसलेले दर्जेदार अ‍ॅप. Current Caller ID : ह्याच्या कॉलर आयडी वर अजिबात विश्वास ठेवता उपयोगाचा नाही, काहीच्याकाही लोकेशन दाखवतो. पण त्यात एक चांगली गोष्ट आहे म्हणजे एखाद्याचा फोन आला आणि त्याने ह्यापूर्वी फोन केलेला असेल तर तिथे स्टेटस दाखवतो, कि 15 minutes ago, 1 hour ago वगैरे वगैरे, मग तेव्हा अंदाज बांधता येतो कि फोन उचलायचा कि नाही, त्याशिवाय तो फोन मधून कॉल किती गेले, किती आले, कोणाला केले, कोणाचे आले, मेसेज इत्यादींचा छान पाय चार्ट काढून दाखवतो. गेम बद्दल म्हणत असाल तर मला आवडणारे गेम्स : Airport XP free, Stickman base, stick cricket, mouse, Air control Lite, Glow Hockey, Rope'n'FLy 3, Bridge Architect, Stick Tennis. बाकी माझ्याकडे Sony Xperia Mini Pro SK17i हा मोबाईल आहे. :)

धन्स रे सुझे, माहितीपूर्ण लेख. मी वापरत असलेली काही अ‍ॅप्स १) आयएमओ मेसेंजरः या एकाच अ‍ॅपवरून एकाच वेळी बहुतेक सर्व मेसेंजर अ‍ॅप्लिकेशन्स वापरता येतात. २) कन्वर्ट पॅड: बहुतेक सर्व एकके यात कन्वर्ट करता येतात ३) एव्हरनोट: सिंक्रोनाईझ्ड नोट्ससाठी उत्कृष्ट अ‍ॅप ४) विकीपेडिया: विकीपेडीयाच्या वेगवान अ‍ॅक्सेससाठी उपयुक्त ५) एमएक्स प्लेयर अ‍ॅन्ड्रॉइडवराचा सर्वोत्तम व्हिडियो प्लेयर ६) पीएनआर स्टॅटस अ‍ॅन्ड ट्रेन: पीएनआर स्टॅटस तपासण्यासाठी उपयुक्त ७) स्विस आर्मी नाईफः अनेक उपयुक्त अ‍ॅप्सचा एकत्रित संच याशिवाय गेम्स मध्ये अँग्री बर्डसचे सर्व व्हर्जन्स लेटॅस्ट अँग्री बर्डस-स्टारवॉर्स सहित, स्टिकमन गोल्फ, स्टिक क्रिकेट, स्टिक टेनिस, पूल मेनिया, बीएमएक्स बॉय, स्केटर बॉय हे गेम्स लै भारी. मोशन सेन्सर गेमिंगसाठी बाईक रेस हा गेम मस्त आहे. ब्राउझर मध्ये डॉल्फिन एचडी आणि युसी फास्ट आहेत तर ए-बुक वाचण्यासाठी किंडल अ‍ॅप मस्त आहे. मी सॅमसंगचा गॅलेक्सी एस प्लस वापरतो.

अतिशय महितीपुर्ण लेख आणि प्रतिसाद देखिल महितीपुर्ण. धन्यवाद

फिनॅनसिस्टो हे माझे सर्वात आवडते अ‍ॅप आहे. पण ते अ‍ॅप एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. - (फिनॅन्स सॅव्ही)सोकाजी

स्मार्ट मेझर अ‍ॅपल शुट चेस वन टच ड्रॉइंग स्मार्ट कंपास ट्रॅक माय ट्रेन

मोबाईल ही आता गरज राहिलेली नसून ते एक व्यसन झालय... :) एवढी अ‍ॅप्स का काय वापरणे आम्च्या बालबुद्धीला झेपणारे नसल्याने आम्ही MicroMax X256 हा फोने वापर्तो (फकस्त फोन/समस करणे-घेणेसाठी आणि गाणी वाजवण्यासाठी) :P - चिर्कुट

cam scanner-काढलेले फोटो पी डी एफ मध्ये सहजपणे convert करते आणि कॉन्ट्रास वगैरे गोष्टी text साठी सुटेबल बनवते,१०-१५ पाने स्केन करण्यापेक्षा फोटो काढायचे ,पी डी एफ बनवणे सोपे पडते, addi-and addi plot mobile matlab ग्राफ पण प्लॉट होतात,मोठ्या गणितांना वेळ घेते पण चांगलाय, एम फाईल्स डायरेक्ट रन होतात.मला आवडल,भरपूर इंगीनिअरिंग ऍपस् पण आहेत आवडी नुसार शोधावी. TFTPad या ऍप वर कटिया,सॉलिड वर्क्स वगैरे वर केलेली ३ डी drawings बघता येतात GPS speedometer speedview-जी पी एस वापरून आपला वेग सांगते,प्रवासात चांगला टाईम पास आहे , photowrap , face changer -फोटोवर मस्त प्रोसेसिंग करता येते,याच टाईपचे फोटोला भुताळी बनवणारे पण एक ऍप आहे , चिडके पक्षिगण अर्थात angry birds बोलायलाच नको ,प्रचंड लोकप्रिय खेळ आहे unicorn dash,talking cat,NFS most wanted मध्ये असे ऐकले होते की MAP डाउनलोड करायचा ,जी पी एस वर पोझिशन इंटरनेटशिवाय दिसते,सध्या जे गुगल माप्स वापरतो ते नेट शिवाय चालत नाहीत, कोणी तसे केलंय का???

In reply to by लॉरी टांगटूंगकर

नोकिया एन ९०० वर एक अ‍ॅप: मोबाईल मॅप्स-९ वापरतोय. मॅप्स एकदमच डाउनलोडवलेत. आता इंटरनेट शिवाय पण जीपीएस चालतं.