गाय द मोपासाच्या "The Will" या उत्कट कथेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न मी परवाच केला. प्रयत्न फसला. मूळ कथेची कारुण्याची झालर जाऊन त्या कथेला सुमार व विनोदी ठीगळ लावल्यासारखी ती दिसू लागली. स्वतःच्या लेखनसीमा शोधायच्या असतील तर अशा अभिजात लिखाणाचे भाषांतर करण्याचा प्रयत्न जरुर करावा.
या थोर लेखकांना विशेषतः लहान कथा लिहीणार्या कथाकारांना इवलेसे कथाबीज किती सुंदर व नेमक्या शब्दात फुलवता येते त्याचा "The Wil"" ही कथा वस्तुपाठच आहे. अचूक , प्रभावी शब्दरचना, सुसंगत वाक्य व वातावरणनिर्मीती. असे साहीत्य वाचले की भाषाप्रभू, शब्दब्रह्म, सरस्वतीपुत्र आदि शब्दांचा अर्थ लागतो.
मोपासाचीच "The necklac" हे अशीच मोहक पण करुण कथा. मिपावर जयंत कुलकर्णी यांनी फार सुंदर अनुवाद केला आहे. सांगायचा मुद्दा हाच की सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीत काही औरच जादू असते. ते येर्यागबाळ्याचे काम नोहे. वाचकांना असीम आणि बौद्धीक आनंद देण्याचे सामर्थ्य - जे मोपासाच्या लेखणीत आहे.
अर्थात प्रत्येकाला लेखन जमलेच पाहीजे असा हट्ट नाही. शेवटी कला उपभोगणारी रसिकताही महत्त्वाची. आरती प्रभूंचेच शब्द आहेत -
ही निकामी आढ्यता का? दाद द्या आणि शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरीतो का? चोरीता का वाहवा?
"The Will"" कथेचे कथासूत्र लहान पण उत्कट आहे. एका स्त्रीची, तिच्या नवर्याच्या दुष्ट स्वभावामुळे झालेली फरफट ही पार्श्वभूमी आहे. मरणोत्तर त्याच्या जुलमाविरुद्ध तिने केलेला बंड हा मूळ गाभा आहे. ईश्वराच्या दारात गेल्यावर आपल्या मृत्यूपत्राद्वारे त्याला धडा शिकवण्याची एक संधीच जणू तिला मिळालेली आहे.नवर्याल व त्याच्या तितक्याच दुष्ट मुलांना वगळून, इस्टेट आपल्या प्रियकरास व त्याच्यापासून झालेल्या मुलास सोपविणे हा गाभा आहे या कथेचा.
तिने लिहीलेल्या मृत्यूपत्रातील भाव व भाषा अतिशय हृदयस्पर्शी आहेत. मला ही कथा खूप आवडली. मिपाकरांनी मिळाल्यास जरुर वाचावी ही शिफारस.
याद्या
3504
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
विचारांशी सहमत
होय होय. ती इथे दिल्याबद्दल
In reply to विचारांशी सहमत by श्रीरंग_जोशी
पहिल्या परिच्छेदामधील शब्दाशब्दाशी सहमत.
पण...
धनंजय हा अगदी हाच प्रश्न
In reply to पण... by धनंजय
I should have already slapped
In reply to धनंजय हा अगदी हाच प्रश्न by शुचि
का बरं ननि? कथेतील आईच्या
In reply to I should have already slapped by नगरीनिरंजन
त्या मुलाच्या नजरेतून
In reply to का बरं ननि? कथेतील आईच्या by शुचि
असे का?
धन्यवाद सन्जोपराव. आपले
In reply to असे का? by सन्जोप राव
काय सुंदर लिखाण आहे.
काय बोलू? : )
In reply to काय सुंदर लिखाण आहे. by स्पंदना
काही माणस न बोलतापण छान
In reply to काय बोलू? : ) by शुचि
म्हणूनच मी बोलत नै....
In reply to काही माणस न बोलतापण छान by स्पंदना
+१
In reply to काय सुंदर लिखाण आहे. by स्पंदना
स्वतंत्र लिहिणे आणि अनुवाद
हा कयास/ निष्कर्ष बरोबर वाटतो
In reply to स्वतंत्र लिहिणे आणि अनुवाद by आतिवास
the will
कथा वाचली, पण खुप परिणामकारक