Skip to main content

गाय द मोपासा - "The Will"

लेखक शुचि
Published on बुधवार, 27/03/2013
गाय द मोपासाच्या "The Will" या उत्कट कथेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न मी परवाच केला. प्रयत्न फसला. मूळ कथेची कारुण्याची झालर जाऊन त्या कथेला सुमार व विनोदी ठीगळ लावल्यासारखी ती दिसू लागली. स्वतःच्या लेखनसीमा शोधायच्या असतील तर अशा अभिजात लिखाणाचे भाषांतर करण्याचा प्रयत्न जरुर करावा. या थोर लेखकांना विशेषतः लहान कथा लिहीणार्‍या कथाकारांना इवलेसे कथाबीज किती सुंदर व नेमक्या शब्दात फुलवता येते त्याचा "The Wil"" ही कथा वस्तुपाठच आहे. अचूक , प्रभावी शब्दरचना, सुसंगत वाक्य व वातावरणनिर्मीती. असे साहीत्य वाचले की भाषाप्रभू, शब्दब्रह्म, सरस्वतीपुत्र आदि शब्दांचा अर्थ लागतो. मोपासाचीच "The necklac" हे अशीच मोहक पण करुण कथा. मिपावर जयंत कुलकर्णी यांनी फार सुंदर अनुवाद केला आहे. सांगायचा मुद्दा हाच की सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीत काही औरच जादू असते. ते येर्‍यागबाळ्याचे काम नोहे. वाचकांना असीम आणि बौद्धीक आनंद देण्याचे सामर्थ्य - जे मोपासाच्या लेखणीत आहे. अर्थात प्रत्येकाला लेखन जमलेच पाहीजे असा हट्ट नाही. शेवटी कला उपभोगणारी रसिकताही महत्त्वाची. आरती प्रभूंचेच शब्द आहेत - ही निकामी आढ्यता का? दाद द्या आणि शुद्ध व्हा सूर आम्ही चोरीतो का? चोरीता का वाहवा? "The Will"" कथेचे कथासूत्र लहान पण उत्कट आहे. एका स्त्रीची, तिच्या नवर्‍याच्या दुष्ट स्वभावामुळे झालेली फरफट ही पार्श्वभूमी आहे. मरणोत्तर त्याच्या जुलमाविरुद्ध तिने केलेला बंड हा मूळ गाभा आहे. ईश्वराच्या दारात गेल्यावर आपल्या मृत्यूपत्राद्वारे त्याला धडा शिकवण्याची एक संधीच जणू तिला मिळालेली आहे.नवर्‍याल व त्याच्या तितक्याच दुष्ट मुलांना वगळून, इस्टेट आपल्या प्रियकरास व त्याच्यापासून झालेल्या मुलास सोपविणे हा गाभा आहे या कथेचा. तिने लिहीलेल्या मृत्यूपत्रातील भाव व भाषा अतिशय हृदयस्पर्शी आहेत. मला ही कथा खूप आवडली. मिपाकरांनी मिळाल्यास जरुर वाचावी ही शिफारस.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3504
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

हिच ती कथा का? या लेखातल्या विचारांशी पूर्णपणे सहमत. माझी मजल तर श्रीमती लिली काळे यांच्याच लेखनाच्या स्वैर रुपांतरापर्यंत पोचते बुवा.

पहिल्या परिच्छेदामधील शब्दाशब्दाशी सहमत. छोटेसे आस्वादात्मक लेख आवडला. दाद द्यायलाच आपण आहोत निर्माण करायला नाही ही मर्यादा उमगल्या मुळे कलाकृती जीवन समृद्ध करून जावू राहिल्या आहेत. मोपासा व ओ हेनरी ह्यांच्या कथेचा चाहता.

पण... कथानायक असे कसे म्हणत असे - "प्रामाणिक माणूस असा कोणी नसतो; असल्यास त्याच्याहून नीच लोकांच्या तुलनेत प्रामाणिक असेल, इतकेच." कथानायकाच्या आईचे मृत्युपत्र म्हणजे "बाई करू शकते अशी सर्वात सुंदर, सर्वात निष्ठेची, सर्वात भव्य गोष्ट" होती ना? शिवाय त्याच्या खर्‍या बापाबद्दलही कथानायक चांगलेच काय ते सांगतो. तर मग हा कथानायक इतका नकारवादी का असावा?

In reply to by धनंजय

धनंजय हा अगदी हाच प्रश्न मलादेखील पडला आहे. आईचा अनन्वित छळ झाल्याने ही नकारात्मक छटा आलेली असावी असे म्हणावे तर नायकाच्या खर्‍या वडीलांचे व्यक्तीमत्व उदात्त दाखविले आहे. असा "सिनीकल" (मराठी शबद?) स्वभाव होण्याचे कारण सापडत नाही.

In reply to by शुचि

I should have already slapped your ugly face and challenged you long since if I had not, before everything else, thought of the peace of mind during her lifetime of that poor woman whom you caused to suffer so greatly
या वाक्यात त्याच्या वडिलांच्या उदात्तपणाचे पितळ थोडे उघडे पडते असे मला वाटले.

In reply to by नगरीनिरंजन

का बरं ननि? कथेतील आईच्या प्रियकराचा तो सात्विक संताप आहे. आईने तिचा छळ व मानसिक कोंडमारा नक्कीच त्याच्या कानावर घातला आहे. केवळ तिचा अधिक छळ होऊ नये म्हणून त्याने त्या दुष्ट नवर्‍याला "कन्फ्रंट" केले नाही असे त्याचे म्हणणे आहे. यात त्याच्या उदात्तपणास उणे येण्याचे काय कारण?

In reply to by शुचि

त्या मुलाच्या नजरेतून पाहिल्यावर ही एक अत्यंत लंगडी सबब वाटते. तिच्या नवर्‍याला विरोध केला म्हणजे तिचा अधिक छळ होणार हे गृहीत धरल्यासारखे वाटते. एखादा प्रेम करणारा, "सोड सगळी संपत्ती आणि चल माझ्याबरोबर" असे म्हणू शकला असता पण त्याने तसे केले नाही आणि तिला आयुष्यभर छळ सहन करावा लागला. तिच्या मृत्युपश्चातही मी तिच्यासाठी काहीही करू शकलो नाही याची बोच न राहता उलट तिची संपत्ती स्वीकारून काही न करण्याचे स्पष्टीकरण देणे मलातरी उदात्त वाटले नाही.

मूळ कथेची कारुण्याची झालर जाऊन त्या कथेला सुमार व विनोदी ठीगळ लावल्यासारखी ती दिसू लागली. स्वतःच्या लेखनसीमा शोधायच्या असतील तर अशा अभिजात लिखाणाचे भाषांतर करण्याचा प्रयत्न जरुर करावा. असे का? जरुर प्रयत्न करा. फार फार तर काय, प्रयत्न फसेल. राजहंसाचे चालणे, जगिया जाहले शहाणे वगैरे...

काय सुंदर लिखाण आहे. शुची तू तुझ्या प्रांजळ कबुलीने खरच खूप सुंदर भासते आहेस.

In reply to by स्पंदना

बोललो नाही, तर सुंदर दिसतो की नै ठाउक नै; पण अज्ञान लपून राहतं(बुद्धीमत्तेचा भास निर्माण करता येतो) बघा. ;) *च्यामारी हे तरी कशाला बोललो*

स्वतंत्र लिहिणे आणि अनुवाद करणे या दोन्ही प्रक्रियांत काही साम्य आहे; जमल्या तर दोन्ही गोष्टी तितक्याच सोप्या होतात नाही तर तितक्याच अवघड!! प्रयत्न करुन पाहायला हवा :-)

द विल का काय ते वाचून पाहिन म्हणतो. वरती संजोपरावांशी सहमत.

कथा वाचली, पण खुप परिणामकारक , उत्कट वै. वाटली नाही. कदाचीत समजण्यास कमी पडलो असेन. कोणी ह्यातील सौंदर्यस्थळे उलगडुन दाखवील काय.