Skip to main content

रक्तरंग

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 25/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
12 मार्च 1993 ला मुंबईतील साखळी बाँबस्फोटां नंतरच्या होळीच्या दिनी .......................... रक्तरंग सांजराती पेटली होळी भिडल्या ज्वाला गगनाला, याद जाहली विस्फ़ोटाचि भड़कत होत्या अशाच ज्वाला ! एक एक त्यांत तनू कोसळल्या आयुश्याशी तोडून नाती, पति-पत्नी अन आई बाबा जाहली पोरकी सगळी नाती ! आज रंगाच्या पिचकाऱ्या भासती रुधिराच्या चिळकांड्या परी, भळभळणारे रक्त आठवून आतंकाची तिडिक अंतरी ! रक्तरंग पाहून स्फ़ोटातिल अगणित जाहल्या ह्रदय यातना, आज नको उधळण रंगांची द्विगुणित होण्या पुन्हा यातना ! ! !
लेखनविषय:

वाचने 986
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

हो खुप दिवसानी आलो.अपर्णाजी धन्यवाद. फिजाजी धन्यवाद.