गोविंदाचा दुल्हेराजा मी नक्की किती वेळेस पाहिला असेल ह्याचीही नोंद ठेवणं सोडून दिलय. हा चित्रपट म्हणजे जितेंद्रचा कसा "हिम्मतवाला" हा आयकॉनिक चित्रपट होता; "ब्रँड-जितेंद्र" हा दृढमूल कलडरणारा आणि ती क्याटेगरी ठसठशीत मांडणारा होता; तसाच "ब्रँड गोविंदा" स्पष्ट, लख्ख मांडणारा म्हणजे दुल्हेराजा.
.
दुल्हेराजा म्हणजे गोविंदा -रविना नायक - नायिका असा लक्षात राहण्यापेक्षाही चटकन आठवेल तो कादर खान- गोविंदा ह्यांची जुगलबंदी म्हणूनच. "अक्खियों से गोली मारे" हे हिट्ट गाणं असेलही; पण सोबतीलाच चित्रपटात धमाल येते "सुनो ससुरजी..." गाण्याच्या आधी आणि आसपासच्या वेळात ज्या काही उचापती आणि चढाओढ कादर खान - गोविंदा ह्यांच्यात चालते ;त्यावरून.
.
आख्ख्या चित्रपटात फारसे "पाहून अंगावर काटा आला", किंवा "विचार करायला लावणारा प्रसंग आहे" असे म्हणायला लावतील असे प्रसंग जवळपास नाहितच. पण "फुटलो", "हैट आहे साली." ,"ह्ही ह्ही ह्ही ....ओ ह्हो ह्हो ह्हो..ह्ये ह्ये ह्ये" असे करुन ठो ठो हसवणारे प्रसंग मात्र चिकार. किंबहुना अशा धमाल गोष्टींची मालिका म्हणजेच दोन अडिच तासाचा हा चित्रपट. विनोदाचं "टायमिंग" हा शब्द शिकायचा असेल तर हे अडीच तास तुमच्यासाठी वस्तुपाठ असतील.
.
दिवसभर फार काम झालय; आता बराच थकवा आलाय. डोक्याला फार ताण नकोय; चार घटका थोड्या हसत्या खेळत्या वातावरणात जाव्यात म्हणून वेळ घालवण्यासाठीचं औषध म्हणून टी व्ही वर "ये ढाबा गिरा के रहूंगा" म्हणणारा कादर खान दिसला तर च्यानल बदलू नकाच. पहाच्.दोन चार तासानी थकवा कुठल्याकुठं गेल्यासारखा वाटेल. एकदम हल्क्या फुलक्या मूडमध्ये तुम्ही आलेले असाल.
.
चित्रपटात दे दणादण अशी मारामारी नाही. जी आहे तीसुद्धा विनोदी बाजानच घेतलेली; एकूणात सगळ्या मूडला साजेशी. रिक्षावाल्याशी व्हिलन मोहनिश बहलचे भांडण झाल्यावर मोहनिशचे कौतुक करत करत त्याचा गेम घेणारा गोविंदा क्लास; तो प्रसंग लिहिणारा कादर खान सुप्पर क्लास.
.
कुठल्याही क्लायमॅक्सला हिरोइन्-पळ्वणं; किडनॅप वगैरे प्रथेनुसार ह्यातही आहे; पण इथे त्यानंतरची अपेक्षित दण्णादण्णी हिरो करीत बसत नाही. तो पुन्हा डोक्यानंच काम घेतो. लोकप्रिय होण्यासाठी अजून काय हवं? पिक्चर हिट्त आहेच. पण एरव्ही गोविंदा आणि गँगवर होनारा थिल्लरपणाचा किंवा ओंगळवाणेपणाचा आरोप इथे तितका प्रखर रहात नाही."सरकायल्यो खटिया जाडा लगे" गाण्याचा आणि शक्तीकपूरच्या गेंगाण्या आवाजातला "राजाबाबू आ गये" हया विचित्र सवयीच्या राजाबाबू किंवा तत्सम इतर चित्रपटांइतकं ह्यात ओंगळ्वाणेपणा नाही.आहे तो वेळ छान जाण्यासाथी निव्वळ विनोद.
ह्याला कुणी थिल्लर, बाष्कळ म्हणतही असेल. किंवा "उच्च दर्जा नसलेलं" असं म्हणतही असेल. पण भेळ खाताना आपण "मस्त लागतिये आंबट गोड, तिखट जाळ " म्हणत खातोच की. भेळेमध्ये पोषणमूल्यं आपण शोधत नाही.
.
कित्येक कलांमध्ये "अभिजात सादरीकरण", किंवा "अभिजात कला" असा काहीतरी प्रकार असतो. पण तसाच "लोककला " हाही प्रकार असतो. तो बहुसंख्यांशी घट्ट नाळ जोडून असतो.त्याच धर्तीवर कधी "अभिजात चित्रपट" अशी कधी यादी पुन्हा बनवायची झालिच तर त्यात दुल्हेराजा येणार नाहिच; तो "लोकचित्रपट" ह्या प्रकारात नक्कीच येइल लोककलांत सारच कसं रांगडं; ठसठशीत, ठाशीव असतं; सूचक,सौम्य असा बाज त्यात नसतो. तसाच मोकळेपणा अगदि कॅरेक्टारायझेशनपासून ते चित्रीकरणापर्यंत तुम्हाला ह्यात सापडेल.
.
गोविंदा डान्सर म्हणूनही चित्रपटात मानला जातो. पण रूढार्थानं त्याचं नृत्यकौशल्य,चापल्या,लवचिकता हृतिक-प्रभुदेवा ह्यांच्या जवळपासही जात नाही. तितकी चपळता त्याच्या नृत्यात दिसत नाही. मग तो काय किंवा "मेरे पिया गये रंगून " मध्ये रमून जाणारे मास्टर भगवान काय किंवा "छोरा गंगा किनारेवाला" मध्ये नाचणारा अमिताभ काय ह्यांचा पडद्यावरचा गाण्यातला वावर इतका जनप्रिय का ठरतो. कारण तेच :- ते जे करतात त्यात समरसून करताना दिसतात. गोविंदा ड्यान्स करताना स्वतः अगदि कम्फर्टेबल असतो. नृत्याचा तो आनंद घेतो. त्यामुळे ही मंडाळी फारशा शारिरिक कवायती नृत्यात करताना दिसली नाहित तरी ते पाहताना छान वाटते. ते गाण्याच्या लयीत जणू सामावून जातात. आम पब्लिकला त्यांच्या ह्याच गोष्टी जवळच्या वाटत असाव्यात.
प्रभुदेवा किम्वा हृतिक किम्वा हल्लीच्या DID मध्ये येणार्या पब्लिकच्या मानानं त्याच्या शारिरीक कवायती तितक्या दिसत नाहित. असे आम्ही म्हणतो तेव्हा गोविंदाला ड्यान्स येत नाही असे आमचे म्हणणे नाही. लय आणि ताल त्याच्या अंगात चांगल्यापैकी भिनले आहेत हे मान्य आहे. उलट त्यामुळेच ड्यान्स करताना त्यात तो शोभून दिसतो; विजोड्,बोजड विचित्र वाटत नाही.(विजोड बोजड ड्यान्स चा नमुना पहायचे असल्यास अभिषेक बच्चन, राज बब्बर ह्यांची काही गाणी पहावीत. ताल भिनला नसल्याने ते त्यात अवघडल्यासारखे वाटतात. )
.
तुम्ही अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल तर आवर्जून पहा. एकदा पाहिला असेल; तर पुन्हा एकदा पहा आणि मूड मस्त हल्का फुल्का करुन घ्या.
टिप :- दुल्हेराजा आणि राजाबाबू हे वेगळे चित्रपट आहेत. दुल्हेराजा गोविंदा- रवीनाचा तर गोविम्दा-करिश्माचा जोडिचा राजाबाबू.
असेच फुल टू धमाल अजून काही चित्रपट म्हणजे दीवाना मस्ताना, साजन चले ससुराल , हिरो नं १ वगैरे.
पण फारसा ओम्गळवाणेपणा नसलेले दोनच सध्या आठवताहेत :- दीवाना मस्ताना व दुल्हेराजा. त्यामुळे इतरांची नावं घेतली नाहित.
--मनोबा
वाचने
9928
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोविंदाबद्दल लिहिले त्याबद्दल
गॅम्बलर....
In reply to गोविंदाबद्दल लिहिले त्याबद्दल by तुमचा अभिषेक
मी वर सांगितलेले चित्रपट हम
In reply to गॅम्बलर.... by मन१
आणखी
In reply to मी वर सांगितलेले चित्रपट हम by तुमचा अभिषेक
शोला और शबनम क्लासच...
In reply to आणखी by तुषार काळभोर
भी
In reply to मी वर सांगितलेले चित्रपट हम by तुमचा अभिषेक
दुल्हे राजा आणि दिवाना
लै भारी
:)
'कहां राजा भोज' मस्त आहे.
सर्व वाचकांचे आभार
वेळ मिळाला की सिनेमा बघण्यात
OMG
In reply to वेळ मिळाला की सिनेमा बघण्यात by रेवती
काय हो काय झालं?
In reply to OMG by तुषार काळभोर
गोविंदाचा पिच्चर नाय पाहिला??
In reply to काय हो काय झालं? by रेवती
पैलवानसाहेब, त्यावाचून माझं
In reply to गोविंदाचा पिच्चर नाय पाहिला?? by तुषार काळभोर
साजन चले ससुराल या चित्रपटात
In reply to पैलवानसाहेब, त्यावाचून माझं by रेवती
शेवटच्या वाक्यात 'नटलेला' हा
In reply to साजन चले ससुराल या चित्रपटात by प्यारे१
सॅन्डविच
In reply to शेवटच्या वाक्यात 'नटलेला' हा by प्यारे१
अभ्या, रेवती 'आज्जी' आहे रे
In reply to सॅन्डविच by अभ्या..
पण मी काय म्हणते प्यारेलालजी१
In reply to अभ्या, रेवती 'आज्जी' आहे रे by प्यारे१
नेहमीच्या बघण्यातली म्हणजे
In reply to पण मी काय म्हणते प्यारेलालजी१ by रेवती
हा हा हा
In reply to नेहमीच्या बघण्यातली म्हणजे by प्यारे१
दीवाना मस्ताना म्हणजे तर माझा
माझा आवडता आणि आदर्श हिरो डान्स मधला
हत्या +७८६
In reply to माझा आवडता आणि आदर्श हिरो डान्स मधला by भावना कल्लोळ
दुर्दैवी बायकोने
In reply to हत्या +७८६ by तुमचा अभिषेक
+१
+१
In reply to +१ by मी-सौरभ
चूक..चूक..चूक!!!!
In reply to +१ by प्रचेतस
पाहिलेत पाहिलेत.
In reply to चूक..चूक..चूक!!!! by धमाल मुलगा
अग्ग्ग्ग्ग्ग्गं!
In reply to पाहिलेत पाहिलेत. by प्रचेतस
अगग्गागगागाअगा.
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्गं! by धमाल मुलगा
हा हा हा!!!
In reply to अगग्गागगागाअगा. by प्रचेतस
अगदी अगदी.
In reply to हा हा हा!!! by धमाल मुलगा
आंटी नं.१=बटबटीत!
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
ते बाकी खरंय. हा सिनेमा तसा
In reply to आंटी नं.१=बटबटीत! by धमाल मुलगा
हौशी हो..
In reply to ते बाकी खरंय. हा सिनेमा तसा by प्रचेतस
आई आई ग . .
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्गं! by धमाल मुलगा
एक नंबर..
गोंद्या...
हा शिनेमा बघायचा प्रयत्न केला
चालायचच...
In reply to हा शिनेमा बघायचा प्रयत्न केला by रेवती
खुप छान
जिम कॅरी च्या लायर लायर चा
'हिरो नं १'
In reply to जिम कॅरी च्या लायर लायर चा by मालोजीराव
माझाही आवडता चित्रपट
दुल्हेराजा - अवीट गोडीचा मसाला
विसरु म्हणता न विसरता