__/\__
स्सही !! ऊद गं अम्बे ऊद !!
तुळजापुरचा असाच काहीसा अनुभव ..पण स्साल देवळाच्या बाहेर अक्षरश : दुकानदारी करून ठेवलीय लोकांनी, एखाद्या जनमाणसात पवित्र म्हणुन असलेल्या प्रतिमेची पार वाट लावुन टाकतात...लवकर दर्शनासाठी देखील पैसै ?
_/\_
काय जब्बरदस्त लिहिलयस! अप्रतिम.
तुळजाभवानीच्या मंदीरात शिरल्यापासून ते तिथून बाहेर पडेपर्यंत जे काही भारलेपण अनुभवतो ते मला शब्दात नाही सांगता येत.
अगदीच मनापासून लिहिलंयस. खूप आवडलं.
मस्त.
देवळात जायचा अमेरिकेतला अनुभव फारच वेगळा आहे, फार कष्ट न घेता, न ताटकळता इ..त्यामुळे मनात श्रद्धा असली तरी परीक्षा द्यावी लागत नाही असे वाटते!
लहानपणी अमरावतीची अंबामाता आणि माहुरच्या देवीचे दर्शन घेतले आहे त्याच्या आठवणी मुलांना सांगते, ते आई काय सांगते असा चेहरा करून पहात असतात. ..
धन्यवाद. लेख टाकताना थोडी साशंक होते की कुणी उठुन याला दांभिक म्हणेल पण मिपाकर भावना समजुन घ्यायला कधीच कमी पडलेले दिसत नाहीत.
बस एकच मागण लोकांच्या बाजारुपणान देवाला कमीपणा न येवो. आपण मोडीत काढल तर हा बाजार नक्की कमी होइल.
कोणासाठी म्हणून तरी लिहीलं ... शेअर करते आहे कारण परदेशातील लोकांची बोंब असते स्तोत्रांची विशेषतः हे स्तोत्र नेट वर मिळत नाही -
श्री गणेशाय नमः| नगरी प्रवेशले पंडुनंदन|तो देखिले दुर्गास्थान|धर्मराजा करी स्तवन्|जगदंबेचे तेधवा||१||
जय जय दुर्गे भुवनेश्वरी| यशोदागर्भसंभवकुमारी|इंदिरारमणसहोदरी|नारायणी चंडीकेंबिके||२||
जय जय जगदंबे भवानी |मूळप्रकृति प्रणवरूपिणी|ब्रम्हानंदपददायिनी|चिद्विलासिनी जगदंबे||३||
जयजय धराधरकुमारी | सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी| हेरंबजननी अंतरी| प्रवेश तु अमुचिया||४||
भक्ताहृदयारविन्दभ्रमरी |तुझिया कृपावलोकने निर्धारी|अतिमूढ तो निगमार्थ करी|काव्य रचना अद्भुत||५||
तुझिया आपंगते करून्|जन्मांधासी येती नयन्|पांगुळ धावे पवनाहून्|करी गमन त्वरेने||६||
जन्माधाराभ्य जो मुका|होय वाचस्पतिसम बोलका|तू स्वानंदसरोवरमराळिका|होसी भाविका सुप्रसन्न||७||
ब्रम्हानंदे आदि जननी| तव कृपेची नौका करूनी|दुस्तर भवसिंधू लंघोनी|निवृत्ती तटा नेईजे||८||
जय जय आदि कुमारिके| जय जय मूळपीठनायिके| सकल सौभाग्यदायिके| जगदंबिके मूळप्रकृती||९||
जय जय भर्गप्रियभवानी|भवनाशके भक्तवरदायिनी| समुद्रकारके हिमनगनंदिनी|त्रिपुरसुंदरी महामाये||१०||
जय आनंदकासारमराळिके| पद्मनयन दुरितकाननपावके|त्रिविधताप भवमोचके|सर्व व्यापके मृडानी||११||
शिवमानस कनकलतिके|जय चातुर्य चंपककलिके| शुंभनिशुंभ दैत्यांतके|निजजनपालके अपर्णे||१२||
तव मुखकमल शोभा देखोनि|इंदुबिंब गेले गळोनि|ब्रम्हादिके बाळे तान्ही|स्वानंदसदनी निजवीसी||१३||
जीव शिव दोन्ही बालके| अंबे तुवा निर्मीली कौतुके|जीव तुझे स्वरूप नोळखे|म्हणोनी पडला आवर्ती||१४||
शिव तुझे स्मरणी सावचित्त|म्हणोनी अंबे तो नित्य मुक्त|स्वनंदपद हातासी येत्|कृपे तुझ्या जननीये||१५||
मेळवुनि पंचभूतांचा मेळ्|तुवा रचिला ब्रम्हांडगोळ|इच्छा परतता तात्काळ|क्षणात निर्मूळ करिसी तू||१६||
अनंत बालसूर्य श्रेणी| तव प्रभेमाजी गेल्या विरोनी| सकलसौभाग्य शुभकल्याणी|रमा रमण वरप्रदे||१७||
शंबरारि रिपुवल्लभे| त्रैलोक्यनगरारंभस्तंभे|आदिमाये आदिप्रभे|सकळारंभे मूळप्रकृति||१८||
जय जय करुणामृतसरिते|निजभक्तपालकगुणभरिते|अनंतब्रम्हांडपालके कृपावंते|आदिमाये अपर्णे||१९||
सच्चिदानंद प्रणवरुपिणी| चराचरजीव सकल व्यापिणी|सर्गस्थित्यंतकारिणी|भवमोचनी महामाये||२०||
ऐकोनी धर्मराजाचे स्तवन्|दुर्गादेवी झाली प्रसन्न|म्हणे तव शत्रु संहारून्|राज्यी स्थापीन धर्मा तूते||२१||
तुम्ही वास करावा येथे|प्रकटो नेदि जनाते|शत्रू क्षय पावती तुमचे हाते|सुख अद्भुत तुम्हा होय||२२||
तुवा जे केले स्तोत्र पठण| हे जो करील पठण श्रवण|त्यासी सर्वदा रक्षीन्|अंतरबाह्य निजांगे||२३||
तुम्ही ज्याला भोंडला म्हणता त्याला आम्ही रानची माणस 'हादगा' म्हणतो.
हे काय पटलं नै बा. मिरजेत असताना, रानात न राहता अगदी बंगल्यात राहणार्यांच्या तोंडीसुद्धा हादगा हाच शब्द होता. तो खास दक्षिण महाराष्ट्रीय शब्द असण्याची शक्यता जास्त आहे. बायदवे भोंडला हा शब्द कोकणीछाप आहे का?
ओक्के धन्यवाद. कोकणीछाप आहे की नाही असे विचारायचे कारण म्हंजे मला वाटले (अजूनही वाटते) की भोंडला हा शब्द ब्राह्मणी बोलीत जास्त आढळतो तोही पुणेकरछाप बोलीत. आता पुणेकर ब्राह्मणी बोली म्हंजे परिणामी कोकणस्थांचीच, त्यामुळे त्यांच्या बोलीतले शब्द आसपास पसरले, त्यांची स्थलांतरे जशी झाली तशी.
किमानपक्षी दक्षिण महाराष्ट्रात तरी हादगा हाच शब्द नेहमी ऐकलेला आहे (ब्राह्मण-ब्राह्मणेतर दोघांच्याही बोलीत) म्हणून आपलं कुतूहल, बाकी काही नाही.
दुकानदारी आन भोप्याची मस्ती आम्ही बघत पण नाही.(पुण्यामुंबैच्या लोकानीच लाडावून ठेवलय त्यांना)
गाभार्यात आई असते आमची. तिच्यासाठीच जातो. मग कितीका येळ लागंना.
खूपच मस्त लिहील आहे...
खेडेगावातील देवळं आणि तिथले देवांचे उत्सव ह्या गोष्ठी खरच अनुभवण्यासारख्या असतात......तिथे कुठलाही भपका नसतो असते ती निव्वळ श्रद्धा आणि देवाप्रतीचे प्रेम.
माझ्या आजोळी कोकणात देखील असाच छान उत्सव होतो दरवर्षी तो अनुभवलांय म्हणून लिहील असं.
कोल्हापुर आणि तुळजापुर, दोन्ही ठिकाणी दोन वेळेस गेलो आहे. कोल्हापुरातका अनुभव खुपच छान , शांतपणे दर्शन आणी आईचा तो प्रसन्न अनुभव काय सांगु.....
तुळजापुर बद्द्ल मात्र लिहायला सुद्धा धजत नाही. बाहेर जे कल्लोळ तिर्थ आहे तिथ पासुनच सुरुवात. आई भक्तांना सदबुद्धि देवो..
प्रतिक्रिया
__/\__ स्सही !! ऊद गं अम्बे
मस्त लिहिलं आहे!
सुरेख प्रकटन !!
सहमत..! तात्या. -- तात्या-धर्
उत्तम प्रकटन. भारावून
खूप आवडले.
मस्त अनुभव! वर्णन फार भावुक
+१
आई भवानीचा उदे उदे....
मस्त
सुरेख..
एकदम छान अनुभवकथन.
धन्यवाद. लेख टाकताना थोडी
खूप छान स्मृतीचित्र रंगवले आहे
चांगला लेख. चांगल्या शब्दांत
खूप सुरेख अप्रतिम!!
दुर्गास्तोत्र
सुंदरच!
ऊद गं अम्बे ऊद !!
मस्त
भावोत्कटता हा तुमच्या लेखनात
धागा वर आणते आहे.
लेख उत्तमच-अस्मादिक इतके
कोकणीछाप नसावा. नगरकडच्या
ओक्के धन्यवाद. कोकणीछाप आहे
ह्म्म !!
ब्येस्ट अपरणातै
खूपच मस्त लिहील आहे...
दोन देवस्थाने
छान लिहीलंय!
सह्हीच लिहलंय.