अशीही आणि तशीही
जन्म देता देता जन्म घेणारी
शब्द नि अर्थ जुळवणारी
उंचच उंच गर्दीमध्ये
बोट घट्ट धरणारी
चिंचा, बोरं, भोवरे, चेंडू
गिरगिर, भिरभिर.. खुलणारी
कधी रुजली हे न कळताही
अंगोपांग बहरणारी
कधी अंग चोरून बसणारी
नको असतानाही असणारी
काही आयुष्यभर दिसत, भासत
हुलकावणी देत राहणारी
उणे अधिक मांडता मांडता
हातचा म्हणून राहणारी
अन् ती.. आभाळागत सदैव जागी
फक्त नजरेत सामावणारी
जगणं-बिगणं सुरू असता
'का? कशासाठी?' हे सांगणारी
उतरणीला लागत असता अंधूक झाल्या नजरेपुढे
पुन्हा एकदा उजळत जाऊन विरामाकडे नेणारी
...नाती!
सुरेख कविता.
'कोण बरं ती? ' असा प्रश्न
+१
मस्त !!
सुंदर
मस्त!
छान कविता. घरातल्या
उत्कृष्ट !
नाती
सुरेख.
वाह
नाती!
अपर्णा, मस्त अॅडिशन..
अप्रतिम
सुंदर रचना.!
सुरेख रचना.
खरेच सुंदर .....
छान छान मस्तच
छानच! नात्यांचा गोषवारा आवडला
(No subject)
फारच छान .
सुंदर!!
आवडली.
सुरेख
" उतरणीला लागत असता अंधूक
मस्त!!
खुपच सुंदर कविता
मस्त!
सुंदर..
छान
सुरेख कविता. आवडली.
छान