खुप दिवसाने आज आरशात स्वतःला न्याहाळले.चेहरावरच्या सुरकुत्या खुप काही सांगून गेल्या. संसारात रमताना विसरलेल्या आठवणी जागवून गेल्या. डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळात माझे मी पण दडपले होत. ते शोधताना डोळ्यातुन एक स्वप्न पटकन निसटून गेल होत. नात्याची अनेक रूपे जगताना स्वताला कधी जगले ते आठ्वु लागले. दाट काळ्या मोकळ्या केसातुन तो एक केस पांढरा स्वतःची अनुभूती करवून देऊ लागला. भरलेल्या घरात असुनही का हि एकटेपणाची सल जाणवली. डोळ्यात हजारो स्वप्न असताना शून्यात गेलेली ती नजर आठवली. कधी घेतला होता मी मोकळा श्वास, कधी स्वताला शोधण्याचा हा केविलवाणा ध्यास. आहे सर्वाची मी, पण माझे असे कोण? प्रत्येक नाती माझी, पण का रिती माझी पाती, सर्वाच्या अस्तित्व्याची वाहन मी, मग का माझ्याच अस्तित्व्याला शोधण्याची तहान हि, आरशात विचारले अनेक प्रश्न मी माझे मला, अनउत्तरीत आहेत अजून ते सर्व, नाटकचे दोन अंक संपले, तिसऱ्या घंटीची वेळ आहे, खरेच का हो आयुष्य दोन घडीचा खेळ आहे ?
वाचने
2381
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहीलंय..
छान लिहिताय
@ चिगो
छान लिहिलं आहे. मध्यम वयीन
नेमकं. नेटकं. अन खर्या खुर्
फारच छान
ही रितेपणाची भावना सर्वव्यापी
प्रश्न महत्त्वाचे आहेत हे -
'जे माझं आहे ते मी नाही
मनोगत आवडलं
वरील