Skip to main content

प्रश्न?

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 18/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसाने आज आरशात स्वतःला न्याहाळले.चेहरावरच्या सुरकुत्या खुप काही सांगून गेल्या. संसारात रमताना विसरलेल्या आठवणी जागवून गेल्या. डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळात माझे मी पण दडपले होत. ते शोधताना डोळ्यातुन एक स्वप्न पटकन निसटून गेल होत. नात्याची अनेक रूपे जगताना स्वताला कधी जगले ते आठ्वु लागले. दाट काळ्या मोकळ्या केसातुन तो एक केस पांढरा स्वतःची अनुभूती करवून देऊ लागला. भरलेल्या घरात असुनही का हि एकटेपणाची सल जाणवली. डोळ्यात हजारो स्वप्न असताना शून्यात गेलेली ती नजर आठवली. कधी घेतला होता मी मोकळा श्वास, कधी स्वताला शोधण्याचा हा केविलवाणा ध्यास. आहे सर्वाची मी, पण माझे असे कोण? प्रत्येक नाती माझी, पण का रिती माझी पाती, सर्वाच्या अस्तित्व्याची वाहन मी, मग का माझ्याच अस्तित्व्याला शोधण्याची तहान हि, आरशात विचारले अनेक प्रश्न मी माझे मला, अनउत्तरीत आहेत अजून ते सर्व, नाटकचे दोन अंक संपले, तिसऱ्या घंटीची वेळ आहे, खरेच का हो आयुष्य दोन घडीचा खेळ आहे ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2381
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

छान लिहीलंय.. आपल्या भावनांना आणखी चांगल्या रुपात, थोडंसं नेटकेपणाने मांडण्याचा प्रयत्न करा. आणखी चांगलं लिहु शकाल.. एक अगावू प्रश्न : हा आयडी म्हणजे आपलं नाव आहे, की भावनांचा कल्लोळ झाल्याने असा आयडी घेतलाय? :-)

अजून थोडा विस्तार करू शकला असतात. प्रत्येकालाच ही रिक्ततेची विरक्तीची भावना कधीतरी स्पर्श करून जाते. त्या एका क्षणात जगण्यात रस वाटू लागतो नाहीतर पुरा उडून जातो. कोणता रस्ता पकडायचा ते तुमचं तुम्हीच ठरवायचं असतं!

नाही, माझे नाव हेमा आहे, भावना कल्लोळ हा फक्त आय डी घेतला आहे. तुमच्या आणि पैशाच्या सुचना लक्षात ढेवीन . प्रतिक्रियेबद्दल आभार.

नेमकं. नेटकं. अन खर्‍या खुर्‍या भावनांनी दाटकं. सुरेख. या पेक्षा जास्ती मी ही नाही लिहु शकणार. हल्ली काही कमवत नाही. घरात सगळ्यांंसाठी मी, पण मला दोन गोष्टी लिहायच्या आहेत, जरा शाम्तपणा हवाय....नो!

हेमा ताई, हा मध्य आयुष्यात येणारा रिक्तपणा फार छान लिहिला आहे. लिहित्या राहा. आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे असे प्रत्येकाला कधी न कधी तरी मनात येतेच.

'जे माझं आहे ते मी नाही त्यामुळं त्याच्यावर माझी मालकी नाही'.... वास्तव स्वीकारणे. :)

अवांतरः नवीन सदस्यांचा केवळ छळवाद होतो म्हणणार्‍या आयड्यांनी (त्यात मॅक्झीमम नवीन सदस्यच असतात) या धाग्यावरच्या प्रतिक्रिया बघाव्या. लिखाण चांगलं असेल तर मिपावर नवीन-जुना असा भेद होत नाहि... (हो हो... आजकाल आमचा सौजन्य सप्ताह सुरु आहे ;) ) अर्धवटराव

वरील प्रतिसादकांशी सहमत. लिखाण आवडलं.