बर्याचशा समारंभात, शेवटी एक 'गोग्गोड' असा आभारप्रदर्शनाचा औपचारिक कार्यक्रम असतो. आता वय झाले की जुन्या आठवणी येणारच. अशा आठवणी उगाळत असताना एक विचार चमकून गेला की, आपला शेवट जवळ आला आहे अशी कल्पना केली तर मी देवाचे आणि इतरांचे आभार कसे मानीन? आणि तेही औपचारिक नव्हे तर मनापासून.
१. सर्वप्रथम, या जगांत मनुष्यप्राणी म्हणून जन्माला घातल्याबद्दल आभार.
२. त्यानंतर, एका चांगल्या, मध्यमवर्गीय घरांत, साधे जीवन आणि उच्च विचार करण्याची संवय लावल्याबद्दल त्या स्वर्गस्थ मातापित्यांचे आभार.
३. मुलगा किंवा मुलगी यांत काहीच फरक नाही असे सरकारी पातळीवर जरी सांगत असले तरी, मुलगा म्हणून जन्म मिळाल्याने जे विशेष फायदे मिळाले आणि लग्न होईपर्यंत, घरांत ज्या कामचुकारपणा करण्याच्या संधी मिळाल्या त्याबद्दल आई-वडीलांचे आणि भावंडांचे आभार.
४. माझा जन्म झाला तेंव्हा आपल्या देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते त्यामुळे सर्व लोकांमधे एक विशेष उत्साह होता. काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी होती. त्यामुळे त्या कालखंडात, उत्तम संगीत, उत्तम साहित्य, उत्तम कला आणि उच्च मूल्ये असलेली अनेक नाटके व सिनेमे बघण्याचे भाग्य लाभले. श्रीपाद डांगे, आचार्य अत्रे अशा अनेक वक्त्यांची उत्कृष्ट भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. तर अशा भारलेल्या कालखंडात आयुष्याचा उमेदीचा काळ व्यतीत करायला मिळाला म्हणून आभार.
६. संगीताचा कान मिळाला नसता तर किती मोठ्या आनंदाला मुकलो असतो? लता-आशा यांच्या गाण्यांनी मनामधे एक न्यूनतम मानक निश्चित करुन टाकले. त्या मापदंडाने मोजूनच इतरांची पातळी ठरवता येऊ लागली. त्यावेळचे अजरामर संगीतकार, रफी, किशोर आणि तलत यांनी त्या आनंदात भरच टाकली. शास्त्रीय संगीतात तर, ज्यांचे नुसते नांव काढले तरी आदराने कान धरावे, अशा दिग्गजांना, याचि देही याचि डोळा बघण्याचा आणि त्यांच्या मैफिलीत डुंबण्याचा जो आनंद मिळाला त्याबद्दल खास आभार.
७. यश अपयशाचे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येतातच. पण अशा प्रसंगी, डोके खांद्यावर आणि पाय जमिनीवर ठेवण्याची बुद्धी दिल्याबद्दल आभार.
८. आत्मसंतुष्ट वृत्ती हा दोष असेल कदाचित, पण त्यामुळेच आहे त्यांत समाधानी राहून, या जगातल्या शर्यतीत भाग न घेता , त्याकडे अलिप्तपणे पहाण्याची दृष्टी दिल्याबद्दल आभार.
९. आयुष्याच्या विविध वळणांवर भेटलेल्या आणि चांगले-वाईट, उत्कट्-मातकट अनुभव देणार्या सर्व द्विपाद, चतुष्पाद, षटपाद, अष्टपाद व बहुपाद आणि सरपटणार्या प्राण्यांचे आभार.
१०. आणि सरतेशेवटी, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपले विचार जालावर मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी मिळाल्यामुळे, सर्व मराठी संकेतस्थळांचे विशेष आभार.
टीपः वरील विचारांचे मनसोक्त विच्छेदन व्हावे,त्याची विडंबने पाडावीत किंवा त्यांत मौलिक भर पडावी असे वाटत असल्याने धागा 'काथ्याकूटात' टाकला आहे.
वाचने
3133
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> आयुष्याच्या विविध वळणांवर
रंजक...
हम्म...
सुन्दर
बाकी सगळंच उत्तम पण
+१
In reply to बाकी सगळंच उत्तम पण by बॅटमॅन
एकदम सहमत
मालक आणि संपादकांचे आभार
सल्लागार?
In reply to मालक आणि संपादकांचे आभार by नाना चेंगट
आवडल तिमा.
तिमाजी अप्पा
शंका समाधान
In reply to तिमाजी अप्पा by इन्दुसुता
उत्कट्-मातकट अनुभव देणार्या
आँ ?