Skip to main content

अ‍ॅपल / सफरचंदाचे चिप्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 18/03/2013 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः सफरचंद दालचिनी पावडर प्रमाण असे नाहीये, आवडीनुसार घ्यावे. . पाकृ: ओव्हन ११० डिग्री सें वर प्री-हीट करून घेणे. सफरचंदाच्या शक्य तितक्या पातळ चकत्या करून घेणे, बीया काढून टाकणे. (चकत्या नसेल जमत तर फोडी कापून त्याचे पातळ काप करणे) दालचिनीपूड सर्व चकत्यांवर नीट चोळून घ्यावी. बेकिंग ट्रे वर बेकिंग पेपर लावून घेणे किंवा हलके ग्रीज करुन घेणे. ट्रेवर चकत्या लावून ११० डिग्री सें वर ३० मिनिटे बेक करावे. अधून्-मधून लक्ष द्यावे. ३० मिनिटानंतर चकत्या उलटवून पुन्हा ३० मिनिटे दुसरी बाजू बेक होऊ द्यावी. बेक झाल्यावर , ट्रे बाहेर काढून ५ मिनिटे गार होऊ द्यावे. चिप्स पूर्ण गार झाले की कुरकुरीत होतील . . हवाबंद डब्यात भरुन ठेवावे. (अर्थातच उरले तर ;) ) दालचिनी भुरभुरलेले चिप्स . नोटः दालचिनी व सफरचंद हे काँबिनेशन भन्नाट लागतं दालचिनी आवडत नसल्यास नुसते सफरचंदाचे चिप्स पण करु शकता. आवडत असल्यास वरुन थोडे लाल तिखट भुरभुरावे,गोड्-तिखट छान चव येते. सफरचंद जराशी करकरीत घ्यावीत, एकदम पिठूळ नको. तळणे नसल्यामुळे पौष्टिक ही आहेत. लाल तिखट भुरभुरलेले चिप्स .

वाचने 8263
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

In reply to by रश्मि दाते

कमी तापमानावर चांगले बेक केल्यास व हवाबंद डब्यात ठेवल्यास २०-२५ दिवस सहज टिकतात :)

ह्ये साणिका गालाचे सफरचंदेत का हे ?? भारी चविष्ठ बै ते :) सासुबै म्हणताय्त ते खरय हं ;) आमच्याकडे मेलं कुणी सफरचंद कापूनच देत नै :-/ :P

In reply to by जेनी...

हो गालाचेच आहेत :) मला अख्खे सफरचंद खाण्याचा जाम कंटाळा येतो म्हणून हे उद्योग :P

मलाही बरणीवाला फोटू फार आवडला. मी हे चिप्स स्यालडमध्ये मिसळलेले खाल्ले आहेत. छान लागतात. सफरचंद आणि दालचिनी हे काँबीनेशन प्रचंड आवडते.... अ‍ॅपल क्रिस्पमध्ये. ;)

फोटो पाहिले आणि खल्लास झालो. सफरचन्द आणि दालचीनी एक अप्रतिम जोड आहे.

बरणीवाला फोटो पाहुनच खल्लास! आता तुझ्याकडुन फोटोग्राफि पण शीकली पाहिजे :)

सानिकास्वप्निल यांना चांगल्या फोटोग्राफर म्हणावं की स्वयंपाकर की दोन्ही मिळून अजून काही म्हणावं असा प्रश्न मला पडलाय!

अर्रे बापरे ३०-३० मिन्ट बेक करून फक्त ट्रेभर चिप्स.. नको बाबा विकत आणणे स्वस्त पडेल ;) बाकी रेसिपि आवडली

तुम्ही फार भारी आणि तुमचे कुटुंब फार भाग्यवान आहे हो.. देवा.. पुढच्या जन्मी सानिका तरी कर किंवा स्वप्नील तरी...

In reply to by पिलीयन रायडर

+११११११११. अगले जणम मे मुझे साणियाजीके कुटुंबमेही जणम दीजो भगवाण!

In reply to by बॅटमॅन

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र चूक झाली. साणिया णै साणिका. स्वारी बरंका साणिकातै :)

मस्तच नेहमीप्रमाणे. कुठुन तुंम्हाला ह्या एव्हढ्या रेसिपी सुचतात हो.

In reply to by अनन्न्या

फारसा फरक पडत नाही धन्यवाद :)

सफरचंद + दालचिनी भन्नाट लागते .. प्रचंड सहमत! हे चिप्स हायडलबर्गच्या किल्ल्याच्या पायथ्याशी खूप छान मिळतात, तसेच आमच्या इथे फ्रांकफुर्टमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या विकएंडला मुझेउम उफर फेस्ट म्हणजे माइन नदीच्या काठी म्युझिअमचा उत्सव असतो त्या वेळी नदीच्या दोन्ही काठांना पालं पडतात आणि तेथे हे चिप्स हमखास असतात. स्वाती

आयला... काय भारी दिसत आहेत या चिप्स ! आता इतक्या भारी दिसत आहेत म्हणजे चवीला पण लयं भारी लागत असणार ! :) फोटो सुंदरच... :)

अरे वा! नविन प्रकार दिसतोय चिप्सचा! धन्यवाद, रेसिपी दिल्याबद्दल. आता करून पहायला हरकत नाही!! :)