साहित्यः
सफरचंद
दालचिनी पावडर
प्रमाण असे नाहीये, आवडीनुसार घ्यावे.
पाकृ:
ओव्हन ११० डिग्री सें वर प्री-हीट करून घेणे.
सफरचंदाच्या शक्य तितक्या पातळ चकत्या करून घेणे, बीया काढून टाकणे. (चकत्या नसेल जमत तर फोडी कापून त्याचे पातळ काप करणे)
दालचिनीपूड सर्व चकत्यांवर नीट चोळून घ्यावी.
बेकिंग ट्रे वर बेकिंग पेपर लावून घेणे किंवा हलके ग्रीज करुन घेणे.
ट्रेवर चकत्या लावून ११० डिग्री सें वर ३० मिनिटे बेक करावे.
अधून्-मधून लक्ष द्यावे.
३० मिनिटानंतर चकत्या उलटवून पुन्हा ३० मिनिटे दुसरी बाजू बेक होऊ द्यावी.
बेक झाल्यावर , ट्रे बाहेर काढून ५ मिनिटे गार होऊ द्यावे.
चिप्स पूर्ण गार झाले की कुरकुरीत होतील .
हवाबंद डब्यात भरुन ठेवावे. (अर्थातच उरले तर ;) )
दालचिनी भुरभुरलेले चिप्स
नोटः
दालचिनी व सफरचंद हे काँबिनेशन भन्नाट लागतं
दालचिनी आवडत नसल्यास नुसते सफरचंदाचे चिप्स पण करु शकता.
आवडत असल्यास वरुन थोडे लाल तिखट भुरभुरावे,गोड्-तिखट छान चव येते.
सफरचंद जराशी करकरीत घ्यावीत, एकदम पिठूळ नको.
तळणे नसल्यामुळे पौष्टिक ही आहेत.
लाल तिखट भुरभुरलेले चिप्स

हवाबंद डब्यात भरुन ठेवावे. (अर्थातच उरले तर ;) )
दालचिनी भुरभुरलेले चिप्स
वाचने
8249
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त दीसत आहेत,
कमी तापमानावर
In reply to मस्त दीसत आहेत, by रश्मि दाते
ग्रेट
+ १
In reply to ग्रेट by अभ्या..
तुझे फोटो मस्त आहेत!
ह्ये साणिका गालाचे सफरचंदेत
हो गालाचेच आहेत
In reply to ह्ये साणिका गालाचे सफरचंदेत by जेनी...
अरे वा... मस्तच एकदम.... इथे
आईग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग
+१
In reply to आईग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग by चिंतामणी
मलाही बरणीवाला फोटू फार आवडला
खल्लास
अप्रतिम फोटो...
बरणीवाला फोटो इज लई भारी,
वाह !!
आई ग्ग!
फोटोग्राफर की स्वयंपाकर
अर्रे बापरे ३०-३० मिन्ट बेक
नेहमीप्रमाणे मस्तच!
तुम्ही फार भारी आणि तुमचे
+११११११११.
In reply to तुम्ही फार भारी आणि तुमचे by पिलीयन रायडर
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
In reply to +११११११११. by बॅटमॅन
अतिशय भारी दिसत आहेत हे चिप्स
मस्त
ए बाई, किती छळ करणारेस अजून?
मस्तच !!
चिप्स केल्यावर सफरचंदाच्या मुळ चवीत काही फरक पड्त नाही?
फारसा फरक पडत नाही
In reply to चिप्स केल्यावर सफरचंदाच्या मुळ चवीत काही फरक पड्त नाही? by अनन्न्या
मस्त..
मस्तच नेहमीप्रमाणे
आयला... काय भारी दिसत आहेत या
अरे वा!
तोंडाला पाणी सुटले हे चिप्स