✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

" रविवार आज रविवार -" (बालकविता)

व — विदेश, Sun, 03/17/2013 - 09:48
रविवार आज रविवार किती छान छान वार अभ्यास नाही शाळा नाही खूप मजेचा आज वार ! मारामारी आणि कुस्ती येत नाही मुळीच सुस्ती खेळ खेळण्यांची कमाल दिवसभर नुसती धमाल ! दिवसभर खाणेपिणे नाचणे अन् हुंदडणे गट्टी फू अभ्यासाशी कट्टी फक्त खेळण्यांशी ! नाही धपाटा आईचा नाही रट्टा बाबांचा ताईचे ऐकायचे नाही दादाशी बोलायचे नाही ! दोस्तमंडळ झिंदाबाद मौजमस्ती झिंदाबाद धिंगाणा गाणे गाणी रंगीत फुग्याची पिपाणी ! रविवार हो रविवार आमचा आवडता वार घरात आणि मैदानात दंगामस्ती चालणार ! .

प्रतिक्रिया द्या
1706 वाचन

💬 प्रतिसाद (6)

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/17/2013 - 10:12 नवीन
अजून येऊ दे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छान छान

निवेदिता-ताई
Sun, 03/17/2013 - 10:21 नवीन
छान छान
  • Log in or register to post comments

हम्म...

सस्नेह
Sun, 03/17/2013 - 14:03 नवीन
हम्म... रविवार खरा, पण उद्या आहे गणिताचा पेपर..! तेव्हा अभ्यासातून सुटका नाही.
  • Log in or register to post comments

निरागस कविता

अविनाशकुलकर्णी
Sun, 03/17/2013 - 15:44 नवीन
निरागस कविता
  • Log in or register to post comments

खरच निरागस.. पण आता

पक पक पक
Mon, 03/18/2013 - 13:35 नवीन
खरच निरागस.. ;) पण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना राव आता कसला रविवार.. ? :)
  • Log in or register to post comments

@आता कसला रविवार..? >>> खरं

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/20/2013 - 12:19 नवीन
@आता कसला रविवार..? >>> Image removed. खरं आहे,आता कसला रविवार..? -आता रवि वरच वार ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा