कुवरा म्हणजे कोवळा फणस.
साहित्यः-१)कुवरा
२)भिजवलेली तुरडाळ.(काळे वाटाणे,हिरवे वाटाणे,छोले,चवळी,शेंगदाणे पण घालू शकता.)
३)हळद.
४)मीठ
५)हिरवी मिरची.(उभी चिरलेली)
६)चवीपुरता गूळ.
७)खोबरेल तेल.
८)मोहरी(फोडणीसाठी)
९)बारीक चिरलेला कांदा.( optional)
१०)खवलेले ओले खोबरे.
कृती :-प्रथम कुवर्याच्या फोडी करून कमी पाण्यामध्ये कुकरमध्ये दोन शिट्या काधून शिजवून घ्याव्या.(भिजवलेले
कडधान्य(तुरडाळ सोडून) घालायचे असल्यास कुकरमधेच फोडीबरोबर घालावे.)
शिजलेला कुवरा कुस्करून घ्यावा.
त्यात हळद्,गूळ व मीठ घालावे.
एका भांड्यात खोबरेल तेल घालून तापल्यावर मोहरी घालून फोडणी करावी.
मोहरी तडतडली की भिजवलेली तूरडाळ्,व उभी चिरलेली हिरवी मिरची घालावी व ढवळून झाकण ठेवावे
व त्यावर पाणी ठेवावे.
डाळ थोडी शिजली की कुस्करलेली भाजी घालून ढवळून थोडे फोडी शिजलेले पाणी घालून झाकून ठेवावे.
भाजीतील पाणी आटले की त्यात ओले खोबरे घालून भाजी ढवळावी.
ता.क.साहित्याचा फोटो काढताना त्यात हळद व मोहरी ठेवायची राहिली.(चु.भु.दे.घे.)
वाचने
5831
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
'जीवटाकार्ह' भाजी आहे ही.
छान पाकृ.
फणसाची भाजी पाहून मन खूश झाले
खाल्ली नाही
कच्च्या कैरीनं, कच्च्या
In reply to खाल्ली नाही by कच्ची कैरी
मस्त!
फणस चिरताना घ्यायची काळजी...
छान पारंपारीक पाककृती
वेगळी पाकृ... कधी खाल्ली
वा एकदम कोकणची याद आली
अवश्य या.आमच्या घरी सर्वांचे
In reply to वा एकदम कोकणची याद आली by दिपक.कुवेत
मलापण आवडते फणसाची भाजी.
फणसाचा डिंक