Skip to main content

बीटाच्या दशम्या

लेखक वामन देशमुख यांनी सोमवार, 11/03/2013 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: ताजे बीट: ३-४, मध्यम आकाराचे साखर: एक वाटी कणिक: दोन-तीन वाट्या (मिश्रणाच्या प्रमाणात) तूप: ५० ग्रॅम दूध: पाव लिटर मीठ: चवीपुरते तीळ: अर्धा चमचा (ऐच्छिक) साहित्य साहित्य पाकृ: बीट साल काढून बारीक किसून घ्या. मंद आचेवर १२-१५ मिनिटे शिजवून घ्या.  शिजवून घ्या मऊसर झाले की दूध आणि साखर घालून, चांगले हलवून अजून दोन मिनिटे शिजवून घ्या. Alt थंड झाल्यावर यात कणिक, तूप आणि चिमुटभर मीठ (हवे असल्यास तीळ) मिसळून साधारण घट्टसर पीठ भिजवून घ्या. Alt नेहमी पोळी जशी लाटतो तश्या दशम्या लाटून घ्या. भाजतांना दोन्ही बाजूला व्यवस्थित तूप लावा. लालेलाल, गरमागरम दशमीवर तुपाचा किंवा लोण्याचा गोळा घालून खायला द्या. Alt Alt टीपा: १. यात दूध आणि साखरेऐवजी तिखट, हळद, आले-लसणाची पेस्ट इ. घालून तिखटमिठाची आवृत्ती (धपाटे) करता येते. २. फोटोत दाखवलेली दशमी ही तिखट आवृत्ती आहे. (म्हणून हळदीचा पिवळा रंग दिसतोय.) गोड दशम्या फोटो काढण्याआधीच संपून गेल्या. ३. ही पाकृ माझी नसून माझ्या पत्नीची आहे.

वाचने 5628
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

बीटाचं कोशिंबीरीशिवाय काय करता येतं याचं हे उत्तर!

अरे व्वा लालेलाल दशम्या !!

पण दशम्या सोडून ताटातले बाकीचे पदार्थ बघुनच तोंपासु. :)

मस्त मांडणी आणि पाककृती. आवडली. -दिलीप बिरुटे

फोटो छान आणि सोपी पाकॄ. बीट अनायेसे घरात आहेत तर करुन बघायला पाहिजे

विशेषतः स्नेहांकिता यांना आणि सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद!

मस्त पाकृ!! कोशिंबीर सोडून हा असा "ऑफबीट" वापर पहिल्यांदाच पाहिला :) अवांतरः वामनपंडितांचे सोवळे इतके कडक होते की ते आपल्या बायकोच्या हातचेही न खाता स्वतःच रांधून खात असत असे वाचलेय. क्षणभर वाटले की तुमचीच पाकृ तर नव्हे? स्क्रोलल्यावर कळ्ळं काय ते ;)