साहित्य:
ताजे बीट: ३-४, मध्यम आकाराचे
साखर: एक वाटी
कणिक: दोन-तीन वाट्या (मिश्रणाच्या प्रमाणात)
तूप: ५० ग्रॅम
दूध: पाव लिटर
मीठ: चवीपुरते
तीळ: अर्धा चमचा (ऐच्छिक)
पाकृ:
बीट साल काढून बारीक किसून घ्या. मंद आचेवर १२-१५ मिनिटे शिजवून घ्या.
मऊसर झाले की दूध आणि साखर घालून, चांगले हलवून अजून दोन मिनिटे शिजवून घ्या.
थंड झाल्यावर यात कणिक, तूप आणि चिमुटभर मीठ (हवे असल्यास तीळ) मिसळून साधारण घट्टसर पीठ भिजवून घ्या.
नेहमी पोळी जशी लाटतो तश्या दशम्या लाटून घ्या. भाजतांना दोन्ही बाजूला व्यवस्थित तूप लावा. लालेलाल, गरमागरम दशमीवर तुपाचा किंवा लोण्याचा गोळा घालून खायला द्या.
टीपा:
१. यात दूध आणि साखरेऐवजी तिखट, हळद, आले-लसणाची पेस्ट इ. घालून तिखटमिठाची आवृत्ती (धपाटे) करता येते.
२. फोटोत दाखवलेली दशमी ही तिखट आवृत्ती आहे. (म्हणून हळदीचा पिवळा रंग दिसतोय.) गोड दशम्या फोटो काढण्याआधीच संपून गेल्या.
३. ही पाकृ माझी नसून माझ्या पत्नीची आहे.

वाचने
5628
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त दिसताहेत. करून बघायला
मस्त आहेत!
पाकृ आवडली
बिट इट! बिट इट!
लालेलाल
बीटाच्या दशम्या
मस्तच.
छान आहे.
स्सही.
मस्त आहेत
सुरेख फोटो !
धन्यवाद
बिटाच्या पुय्रा आणि पराठे होतात बय्राचदा!!
मस्त पाकृ!! कोशिंबीर सोडून हा