कुठेतरी दुरवर जायचं आहे
सावलीची सुद्धा आशा नाही
पाय नेतील तिथवर चालायचं
थांबतील तिथे थांबायचं.........
वाटेत अनोळखी भेटतील
जे जीवलग बनुन जातील
पण जीवलग भेटून सुद्धा कधी
अनोळखी बनुन राहतील.........
रस्त्याच्या कडेला कधी
विसावा म्हणून पडायचं
पुन्हा ऊन वारा सोसत
मात्र एकट्यान घडायचं..........
कुठेतरी दुरवर जाऊन
एखाद्या वळणावर माग वळून पाहायचं
कितीही दुरवर आलो तरीही
तुझ्या मनात मात्र कायम राहायचं.....
यशवंत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1026
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा !! मस्त जमल आहे..
व्वा !! मस्त जमल आहे.. :)
व्वा !! मस्त जमल आहे..
व्वा !! मस्त जमल आहे.. :)
व्वा !! मस्त जमल आहे..
व्वा !! मस्त जमल आहे.. :)
व्वा !! मस्त जमल आहे..
व्वा !! मस्त जमल आहे.. :)
च्यायला एक प्रतिसाद चार वेळा
च्यायला एक प्रतिसाद चार वेळा कसा प्रकशित झाला.. :crazy: