Skip to main content

रताळ्याचा शिरा

लेखक कच्ची कैरी यांनी रविवार, 10/03/2013 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
shiraकृती- १)रताळे सोलून व किसून घ्यावे . २) एका कढाईत तूप गरम करावे ,त्यात किसलेले रताळे घालून नीट परतून घ्यावे . रताळ्याचा रंग जरा बदलल्यावर त्यात दूध घालावे व एक उकळी येऊ द्यावी .उकळी आल्यावर त्यात साखर घालावी व निट एकजीव करून घ्यावे . ३) रताळी चांगली शिजू द्यावी ( साधारण १० ते १५ मिनिट लागतील ) . यात खोवलेला नारळ ,वेलची पूड व बदामाचे काप घालावेत व आच बंद करावी टीप - शिरा साधारण थोडा ओलसरच ठेवावा ,गरज वाटल्यास थोडे पाणी किंवा दूध घालावे . वरील पाकृतीत मी रताळे किसून घातले आहेत त्याऐवजी रताळे उकडून घेऊन कुस्करून त्याचाही शिरा करता येतो .

वाचने 5356
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

महाशिवरात्रीनिमित्त उपासाचा मस्त पदार्थ! फोटो छान आलाय.

पण आपला पास....रताळं किंवा त्याचा कुठलाहि पदार्थ आवडत नाहि. खाउन झाल्यावर एक गोडसर चव तोंडात रंगाळते.