कृती-
१)रताळे सोलून व किसून घ्यावे .
२) एका कढाईत तूप गरम करावे ,त्यात किसलेले रताळे घालून नीट परतून घ्यावे . रताळ्याचा रंग जरा बदलल्यावर त्यात दूध घालावे व एक उकळी येऊ द्यावी .उकळी आल्यावर त्यात साखर घालावी व निट एकजीव करून घ्यावे .
३) रताळी चांगली शिजू द्यावी ( साधारण १० ते १५ मिनिट लागतील ) . यात खोवलेला नारळ ,वेलची पूड व बदामाचे काप घालावेत व आच बंद करावी
टीप -
शिरा साधारण थोडा ओलसरच ठेवावा ,गरज वाटल्यास थोडे पाणी किंवा दूध घालावे .
वरील पाकृतीत मी रताळे किसून घातले आहेत त्याऐवजी रताळे उकडून घेऊन कुस्करून त्याचाही शिरा करता येतो .
प्रतिक्रिया
आज महाशिवरात्रिनिमित्त खास
वा... चांगली आहे पाकॄ... करुन
अरे वा!
पाकॄ आणि फोटो छान
मस्तं दिसतोय शिरा
अगदी आवडला.