Skip to main content

संवाद

संवाद

Published on सोमवार, 04/03/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
संवाद स्वरांशी माझा स्पंदन अविरत रागांचे हृदयी माया कंठी मार्दव ओठात जलद शब्दांचे .........सावल्या किती विझलेल्या .........झिजलेले कोळ कळांचे ..........नाळेत ओवलेली गांवे ..........अवशेष अमिट नात्यांचे वाहते प्रवाही गाथा पेरीत स्मरण मिथकांचे वादळे पूररेषांची अंतहीन क्षेत्र नभाचे ...........शत जन्म अधूरे नाथा ...........तोकडे वेध वेदांचे ...........स्तंभीत मती नत माथा ...........रण ओघळते ऋणकांचे .......................अज्ञात
लेखनविषय:

याद्या 1170
प्रतिक्रिया 4
काव्यरस

शत जन्म अधूरे नाथा तोकडे वेध वेदांचे स्तंभीत मती नत माथा रण ओघळते ऋणकांचे
अत्यंत रेखिव.