वेध घेत कल्लोळांचे जाहलो मलीन
नाथा होऊ दे माथा चरणी तव लीन
पोत कोवळ्या शब्दांचे वाहुनी कुलीन
तुझे गीत गाइन म्हणतो पाहुनी सुदीन
चैन सुखी घडलो पडलो चाल दिशाहीन
चाललो अथक पण झालो ध्येयाविण दीन
शिणले गजबजलेले मन देह आता क्षीण
तुझे गीत गाइन म्हणतो पाहुनी सुदीन
माघारी फिरते पाउल म्हणे ओळखीन
दिसते ना कोणी तेथे पात्र ना जमीन
अंधार्या गर्तेतुन ह्या किरण जागवीन
तुझे गीत गाइन म्हणतो पाहुनी सुदीन
निळ्या अंबरी तार्यांचे चांदणे विभोर
विरघळले अवघे कातळ नाहि शेष घोर
अनुभूती आहे-नाही मीच देहहीन
हेच गीत आहे राया हाच तो सुदीन
......................अज्ञात
| लेखनविषय: |
|---|
वाचने
962
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह
सकाळ प्रसन्न झाली.
असेच म्हणते, सकाळ प्रसन्न
असेच म्हणते, सकाळ प्रसन्न झाली.
मस्त !!
खरं आहे !!कविता छान !!