एक बोधकथा…
कोणे एके काळी एका होस्टेल मध्ये घडलेली ही गोष्ट आहे. एका आटपाट नगरात एक कॉलेज होते. कॉलेज होते म्हटल्यावर तिथे हॉस्टेल्स पण होती. एक होते मुलांचे आणि एक मुलींचे. ही दोन्ही हॉस्टेल्स बाजूबाजूला होती. मध्ये एक भिंत होती. एकदा एक मुलगी मुलींच्या होस्टेलच्या रेक्टर कडे तक्रार घेऊन आली. तक्रार होती की बाजूच्या होस्टेल मधील मुलगा आपल्या खोलीत केवळ एक चड्डी घालून वावरतो आणि तिच्या खिडकीतून हे तिला सतत दिसल्याने तिचा विनयभंग आणि मानसिक छळ होतो आहे. तक्रार गंभीर असल्याने रेक्टर तडकाफडकी शहानिशा करायला खोलीवर आली.
"कुठे आहे तो मुलगा, दाखव मला खिडकी"
"बाई, ती बघा खिडकी"
"अगं पण समोर तर भिंत आहे"
"बाई तो मुलगा असा नाही दिसणार. ती भिंत फार उंच नाही काही. तुम्ही एक काम करा, खिडकीखाली टेबल आहे. त्यावर उभे राहा आणि टाचा उंच करून भिंतीपलीकडे पहा. आणि बघा, कसा तो निर्लज्ज केवळ एका चड्डीवर फिरतो आहे ते"
ही कथा काल्पनिक आहे, पण या सारखीच एक घटना काही महिन्यांपूर्वी माझ्या ऑफिसात घडली. एका मुलीने सहज बोलता बोलता मला सांगितले की जवळच बसणाऱ्या एका मुलाला सतत सर्दी झालेली असते आणि त्यामुळे तो श्वास घेतो तेव्हा एक विचित्र आवाज होतो आणि सतत येणाऱ्या त्या आवाजामुळे तिला त्रास होतो ("It bothers me"). मी म्हटले, "अगं पण तो तसा लांब आहे तुझ्यापासून, इतक्या बारीक आवाजाचा त्रास कसा होतो तुला". त्यावर ती अत्यंत निरागसपणे म्हणाली, "हो, पण तुम्ही जर अत्यंत लक्षपूर्वक ऐकाल, तर तुम्हालापण त्याचा त्रास होईल (If your listen carefully, it will bother you)". शंभर टक्के सत्य घटना आहे, काडीची अतिशयोक्ती नाही.
आता तुम्ही म्हणाल की याचा आणि मिपाचा काय संबंध. तर तो असा आहे की मिपावर नियमितपणे ओरड होत असते. कधी ब्लॉगवरचे शिळे लेखन टाकले म्हणून तर कधी एकाच विषयावरचे धागे येतात म्हणून. मुंबई-पुणे, फलज्योतिष, नाडीविद्या, देशस्थ-परदेशस्थ किंवा अजून काही. कधी दिवट्यान्च्या adult लेखनावर आक्षेप तर कधी कुणा विशिष्ट लेखकाचे लेखन आवडत नाही म्हणून शंख. कधी मदत मागणाऱ्या धाग्यान्बद्दल त्रागा तर कधी कोण नवीन आयडी मिपाचे डस्टबीन करतो आहे असा आरोप. खरेतर या सगळ्यावर अत्यंत सोपा उपाय आहे. इतका सोपा की तो कुणालाही करता येइल. तुम्ही मालक, सल्लागार, संपादक नसाल तरी. हा अत्यंत खास उपाय म्हणजे, जे धागे (किंवा विषय /लेखक) आपल्याला आवडत नाहीत ते उघडू नयेत. बास, इतकाच उपाय आहे.
मला नेहमी प्रश्न पडतो की जे लोकं एखाद्या विशिष्ट प्रकारच्या धाग्यांचा कंटाळा आला आहे असे दर वेळी त्या धाग्यांवर लिहितात ते मुळात असे धागे उघडतातच का? मुळात उघडतात ते उघडतात, वर पूर्ण वाचतात. इतकेच नाही तर आवर्जून प्रतिसाद देऊन त्याला वर पण आणतात. उदा ओक काकांचे नाडीचे धागे. असा धागा आला की लेखकाचे नाव आणि धाग्याचे नाव वाचूनच कळायचे की आत काय असणार. तरीही लोकं दर वेळेला प्रतिसाद देत असत, की आता बास करा, या धाग्यांचा कंटाळा आला आहे, वगैरे वगैरे. दिवटे जेव्हा फॉर्मात होते तेव्हाची गोष्ट. त्यांच्या लेखावर खच्चून टीका व्हायची. पण नवीन लेख आला की तास दोन तासात अर्धशतक झळकायचे. बरेचसे प्रतिसाद "तुमचा लेख वाचून शरम वाटली" छापाचे. अगं बाई, मागील लेखाच्या वेळेस पण शरम वाटली होती ना, मग परत हा लेख वाचालासच का ??
फालतू धाग्यांमुळे मिपाची क्वालिटी खालावत चालली आहे अशी ओरड करणारे नित्यनेमाने दिसतात. पण मज्जा म्हणते त्या तथाकथीत फालतू लेखावर प्रतिसाद देणारे पहिले लोक हेच असतात. एक नेहमीची तक्रार म्हणजे "अशा लेखांमुळे दर्जेदार लेख खाली खाली जात जात बोर्डवरून नाहीसे होतात". मान्य, पण मग लेका, पार खाली गेलेल्या फालतू लेखाला प्रतिसाद देऊन वर तूच आणलास ना रे. वानगीदाखल अकुंचे हल्ली आलेले धागे पहा.
परवाच एका मित्राशी बोलताना हा विषय निघाला. तो म्हणाला, मायबोलीवर असे धागे आले की कुणी प्रतिसाद देतच नाही. आपोआप ते धागे जातात खाली. त्यामुळे चांगले लेख पटकन वाचायला मिळतात. मी म्हटले की लेका, त्यालाच प्रगल्भ संस्थळ म्हणतात. (दुसऱ्या संस्थळाचे कौतुक सहन करण्या इतपत मिपा प्रशासन प्रगल्भ आहे असे वैयक्तीक मत आहे. शिवाय अल्याड आणि पल्याड असे लिहिण्यापेक्षा थेट लिहिणे आवडते मला)
लोकशाही बद्दल एक नेहमी म्हटले जाते की "People get the government they deserve". माझ्यामते, संस्थळाचे पण तसेच आहे. "सदस्य get the संस्थळ they deserve". आपल्याला दर्जेदार आणि सकस कंटेंट असलेले संस्थळ हवे आहे, पण आपले(मी पण यात येतो) इथले वागणे तसे आहे का? ते तसे नसेल तर त्या होस्टेल मधील मुलीचे वागणे जितके हास्यास्पद होते, तितकेच आपले पण आहे.
वाचने
37642
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
तालियाँ...
तालियाँ!!!! पूर्ण सहमत.
आशयाशी सहमत
अगदी मनातलं..
हे ते लेखन होय...
चांगले विवेचन
In reply to हे ते लेखन होय... by धन्या
माझाही संकल्प....
In reply to चांगले विवेचन by अभ्या..
हॅ हॅ
In reply to माझाही संकल्प.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवं टोकाचा नै निर्णय...माझा संकल्प आहे....
In reply to हॅ हॅ by स्पा
विमे - या लेखावर जे जे लोक
हे का वापरत नाही?
In reply to विमे - या लेखावर जे जे लोक by मोदक
ह्म्म..
In reply to हे का वापरत नाही? by श्रीरंग_जोशी
माझी सहमती आहे , व अनेक
In reply to विमे - या लेखावर जे जे लोक by मोदक
+१
In reply to माझी सहमती आहे , व अनेक by निनाद मुक्काम …
विमे, यु टू ??
लगे रहो
खरय विमे . जे धागे आवडत नाहित
अशी टीकादेखील एक अभिव्यक्ती
खरय विमेकाका..प्रतिसादसंख्या
भल्या पहाटे धाग्याचं शीर्षक
जे बात इम्या
मी तसा नवाच आहे या संस्थळावर.
सुपारी कुणी दिलिय ? नविन की
मुद्दा बरोबर आहे!
आम्ही आहोत ते असे आहोत....
बहुतांशाने सहमत
प्रतिसादाशी १०० टक्के सहमत...
In reply to बहुतांशाने सहमत by पैसा
प्रतिसादाशी १०० टक्के सहमत...???
In reply to प्रतिसादाशी १०० टक्के सहमत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले....
In reply to प्रतिसादाशी १०० टक्के सहमत...??? by स्पा
>>शंभर प्रतिसादात काड्या
In reply to बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शंभर प्रतिसादात काड्या
In reply to बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण नव्या लेखकांच्या धाग्यावर
In reply to बहुतांशाने सहमत by पैसा
मस्त लेख..
मस्त लेख
लसिकरण आवडले,
छान.
लेखनाशी संपूर्ण असहमती दर्शवतो
खुशीताईंविषयी असहमत.
In reply to लेखनाशी संपूर्ण असहमती दर्शवतो by संजय क्षीरसागर
तिथं मंडळानं जाहिर तंबी दिली म्हणून
In reply to खुशीताईंविषयी असहमत. by सस्नेह
तुमचा नक्की उद्देश काय आहे?
In reply to तिथं मंडळानं जाहिर तंबी दिली म्हणून by संजय क्षीरसागर
मुळात तुम्ही किंवा मी कोण क्वालिटी ठरवणारे?
In reply to तुमचा नक्की उद्देश काय आहे? by विश्वनाथ मेहेंदळे
सहमती एका स्टेटमेंटला
In reply to मुळात तुम्ही किंवा मी कोण क्वालिटी ठरवणारे? by संजय क्षीरसागर
नाही पटल..
In reply to लेखनाशी संपूर्ण असहमती दर्शवतो by संजय क्षीरसागर
पण इथे डू आयडी आहेत की नाही हे ही कळण्याचा मार्ग नाही
In reply to नाही पटल.. by उपास
सदस्य उपास किंवा आपल्या
In reply to पण इथे डू आयडी आहेत की नाही हे ही कळण्याचा मार्ग नाही by संजय क्षीरसागर
नाही..
In reply to पण इथे डू आयडी आहेत की नाही हे ही कळण्याचा मार्ग नाही by संजय क्षीरसागर
भले शाब्बास!
In reply to नाही.. by उपास
त्यामुळे फालतू धाग्यांवर दंगा टाळणे आणि
In reply to भले शाब्बास! by रेवती
स्वभाव...
In reply to त्यामुळे फालतू धाग्यांवर दंगा टाळणे आणि by संजय क्षीरसागर
+१
In reply to स्वभाव... by अर्धवटराव
शीर्शकाने हेतु साध्य झाला.
हा हा...
In reply to शीर्शकाने हेतु साध्य झाला. by प्रकाश घाटपांडे
मस्त बोधकथा !!
एकदम सहमत. डू आयडी हा प्रकार
In reply to मस्त बोधकथा !! by सूड
त्याचं काये अधिराज 'सर'
In reply to एकदम सहमत. डू आयडी हा प्रकार by अधिराज
मी तसं तुम्हाला वैयक्तिकपणे
In reply to त्याचं काये अधिराज 'सर' by सूड
ज्येष्ठ सदस्यांचे मुद्दे
In reply to मी तसं तुम्हाला वैयक्तिकपणे by अधिराज
उत्तम धागा, उत्तम चर्चा, आपण
खूप छान विचार मांडले आहेत
फक्त शीर्षक
-
लेख आवडला.
अशा लेखांमुळे दर्जेदार लेख खाली खाली जात जात
In reply to लेख आवडला. by इष्टुर फाकडा
+१
In reply to अशा लेखांमुळे दर्जेदार लेख खाली खाली जात जात by संजय क्षीरसागर
सम्पादन/नियमन -editing/ moderation
सहमत . वरिल सुबोध यांच्या
In reply to सम्पादन/नियमन -editing/ moderation by सुबोध खरे
अहो...
In reply to सहमत . वरिल सुबोध यांच्या by लौंगी मिरची
मला तुमचं म्हणणं पटतं. अनेक
In reply to अहो... by दादा कोंडके
गटार लेखन ??
In reply to मला तुमचं म्हणणं पटतं. अनेक by आदूबाळ
हीन दर्जाची उपमा आहे मान्य.
In reply to गटार लेखन ?? by लौंगी मिरची