Skip to main content

तंदुरी पॉंफ्रेट

लेखक मी_देव यांनी मंगळवार, 05/03/2013 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांत तंदुरी पॉंफ्रेट खाल्लेला नव्हता, आणि तंदुरी चिकनप्रमाणे सहजही न मिळणरा प्रकार म्हणून हा घाट.. सर्व मत्स्यप्रेमी खवैंयासाठी........ साहित्य - २-३ मध्यम पापलेट (पॉंफ्रेट) मॅरिनेट १ साठी-
  • १ लिंबू
  • १ चमचा मीठ
मॅरिनेट २ साठी-
  • पाच-सहा चमचे घट्ट दही
  • २ चमचे तिखट (शक्यतो काश्मिरी, छान रंग येण्यासाठी)
  • १ चमचा धणे पावडर
  • १ चमचा तंदुर मसाला
  • अर्धा चमचा गरम मसाला पावडर
  • १ चमचा आलं-लसूण पेस्ट
  • चवीनुसार मीठ
  • २ चमचे ऑलिव्ह ऑईल
  कृती - पापलेट साफ करून स्वच्छ धुवून घ्यावा पापलेटला आडव्या चीरा कराव्यात, चीर साधारण अर्धा सेंमी खोल आणि थोडी तिरकी करावी. त्यामुळे मसाला आतमध्ये चांगला मुरेल. पापलेटवर लिंबू पिळून, त्यावर थोडे मीठ लावावे. आणि १५ मिनिटे मॅरिनेट होऊ द्यावे. दुस-या मॅरिनेटसाठी, भांड्यात दही, तिखट, तंदुर मसाला पावडर, गरम मसाला, धणे पावडर, मीठ घेऊन चांगले फेटून घ्यावे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल घालावे. मॅरिनेटमध्ये पापलेट घालावेत. मॅरिनेट पापलेटच्या चीरांमध्ये घालावे. पापलेट किमान २ तास मॅरिनेट होऊ द्यावेत. त्यापैकी पहिला एक तास रेफ्रिजरेटर मध्ये आणि नंतरचा एक तास रूम टेंप्रेचरला मॅरिनेट करावेत. ओव्हन २५०° ला २० मिनिटे प्रिहिट करुन घ्यावा. पापलेट ग्रीलवर थेवून साधारणतः ४०-४५ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवावा. गरमागरम पापलेट कोबी, कांदा, काकडी, टोमॅटो च्या सलाडबरोबर सर्व्ह करावा

वाचने 15235
प्रतिक्रिया 56

प्रतिक्रिया

लाजवाब...आणखी शब्दचं नाहीत. महीन्याअखेरी होळी येत आहे, तेव्हा हा प्रयोग करुन चाखण्यात येईल...पण ओवन न वापरता धगधगत्या कोळश्यावर.

एखाद्या सुंदरश्या ललनेच्या फोटोवरून नजर हटत नाही तसे ते शेवटचे दोन फोटो बघून झालेय. रविवारी वाशीला एका कोकण मेळाव्यात हादडून आलोय, उद्या शेवटचा दिवस परत हादडायला आणि पार्सल घ्यायला जातोय. पापलेटच खाल्ले होते पण आकाराने आणखी मोठे असते तर आणखी मजा आली असती असे राहून राहून वाटत होते तरी ती कसर या फोटोंनी भरून काढली. आता काय, वाट बघतो उद्याची.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

एखाद्या सुंदरश्या ललनेच्या फोटोवरून नजर हटत नाही तसे ते शेवटचे दोन फोटो बघून झालेय.

In reply to by मी_देव

एखाद्या सुंदरश्या ललनेच्या फोटोवरून नजर हटत नाही तसे ते शेवटचे दोन फोटो बघून झालेय.
एकदम खरं... भूक चाळवते असले फोटो बघितले की...

व्वा....!!! केवळ जब्रा फ्राय. सानिका स्वप्निल, गंपा, तुम्ही आणि अजून चार पाच माष्टर लोकांची एक पाककृतीची स्पर्धा घ्या. आणि मी एकटाच परिक्षक. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकच परीक्षक क्सा काय? सर्व स्पर्धांना आता तीन जजेस असतात. त्यामुळे मी दुसरा फिक्स. आता तिसरा नसला तरी माझा काही हट्टाग्रह नाही. तुम्ही "महाजज" व्हा हवं तर.. धागाकर्त्यासः वरचा "सा".. सांडाबबाडा परफॉर्मन्स. तोडलंत.. क्या बात.. क्या बात.. क्या बात...!!

In reply to by गवि

दोन अनुभवी जजेस असताना तिसरा कमी अनुभवी चालतो नं.. ;-) जबरदस्त पाककृती आणि फटू :) :)

In reply to by सुहास झेले

जजेस च्या संख्यांवर काही बंधन नाहीये. आम्हीपण चालुन जावुसे वाटते. बाकी पाकृ लै म्हन्जे लैच खत्रा हाये.जीभ नुसती पाणावली आहे.केव्हा खाईन केव्हा खाईन असे झालेय नुसते. आल्या आल्या पदार्पणातच डब्बल-टिब्बल शेंचुरी मारलीय देवाने.

In reply to by इरसाल

मी एकटाच परिक्षक राहणार आहे, कृपया कोणीही विनंत्या बिनंत्या करु नये. पाककृत्यांवर मी निर्णय घ्यायला समर्थ आहे. पाककृती सादर केल्यानंतर पाककृती आणि भांडे स्पर्धकांनी सोडून गेले पाहिजे ही अट राहीलच. (मुंबैत या लोकांना बोलावून खर्रखर्र खादाडीचं नियोजन केलं पाहिजे) -दिलीप बिरुटे

हे काय वाढलयं? नुसते फोटो पाहुनच जळजळ झाली. आता ईनो घ्यायलाच हवा.

फोटोत ओवन ग्रिल वर ठवलेल्या पापलेट्ला जे मरिनेशन केले आहे ते इतके व्यवस्थित कसे? (एकदम प्लेन आणि घट्ट) मरिनेट करुन फ्रीज मधे ठेवल्याने तो घट्टपणा आला का?

In reply to by स्मिता चौगुले

मरिनेट करुन फ्रीज मध्ये ठेवल्याने थोडा घट्टपणा आला, त्यासाठीच १ तास फ्रीजमध्ये ठेवणे मस्ट!

लैच भारी !! अलिबागला 'फुलोरा' मधे खाल्ला होता ...अगदी तसाच आहे !! तोंपासु !!

अगदी नेत्रसुखद फोटो. चवही तशीच असणार! एक प्रामाणिक शंका: असा सबंध पापलेट खाताना तो डोळाही खातात का हो? मी कायम पापलेटचे तुकडेच खाल्लेत म्हणून विचारलं.

काय भन्नाट दिसत आहेत अहाहा... पापलेट म्हणजे जीवकीप्राण जबरदस्त :)

मस्त पाकक्रुती . मला एका गोष्टीचं कौतुक वाटलं .. बोटांची नखं एकदम नखशिकांत कापलेली असल्यामुळे हात एकदम स्वच्छ दिसतायत देवाचे . इतक्या स्वच्छ हातांनी जे बनवाल ते भारी . ( बर्‍याच वेळा नखं ढीगभर वाढवुन अन्नपदार्थ बनवनार्‍यांच्या हातचं कितीहि सुंदर दिसलं तरी खावसं वाटत नाहि .)

In reply to by लौंगी मिरची

धन्यवाद लौंगी मिरची!!
बर्‍याच वेळा नखं ढीगभर वाढवुन अन्नपदार्थ बनवनार्‍यांच्या हातचं कितीहि सुंदर दिसलं तरी खावसं वाटत नाहि
:D १००% सहमत

हे पॉंफ्रेट म्हणजे काय असते,ते बघायला धागा उघडला,तर समोर हा मत्स्यावतार!!! सर्व इतके भारी दिसते आहे,पण जळ्ळे मेले (तंदूर/ओव्हन मधे) तरी ते मासे(च) शेवटी...त्यामुळे आमच्या साठी वाइड बॉल..!!! तरी पण एकंदर टापटीप/पद्धती/फोटूंमुळे कुणीतरी गंपाच्या जोडिचे अवतरले असे वाटायला लागलेय. :-) अ वांतर---अता चोरून खाइन म्हणतो एकदा...!!! ;)

हाय! हाय! इधरकु प्रॉमफ्रेट मिलता नय. अब क्या करेंगे? देख देख के जान जायली हय. ये भगवान इसकु माफ कर, ये जानता नही ये क्या कर रहा है।

वॉव ! मिपावरची आत्तापर्यंतची जबरी सर्वात बेस्ट बेस्ट पाक्रु .... फोटो तं क्या केहेने आलाय देवामामा एक्दम दिल्खुश ! :)

तोन्डाला पाणी म्हणून प्रॉमफ्रेट धागा वर ;)... काय खल्ल्लास फटू राव !!!!