साहित्य :- १ मोठा बीट, ३ तिखट हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून, कढीपत्ता १५ पान, कोथिंबीर १/२ वाटी स्वच्छ धुवून व चिरून , लसून ठेचून, जिरे, मोहरी, तेल, मीठ.
कृती :- प्रथम बीटाची शेपूट व डोक कापून बीटाची वरची पातळ साल काढून घ्यायची. नंतर बीट स्वच्छ धुवून कोरडा करून किसणीवर किसून घ्या. कढईत तेलावर मोहरी व जीरा खमंग फोडणी करा नंतर त्यात टेच्लेला लसून, मिरची व कढीपत्ता खमंग परतवा. नंतर त्यात किसलेला बीट घालून परता. चवीपुरता मीठ घालून मंद आचेवर भाजी शिजवा. १५ मिनटात भाजी व्यवस्थित शिजते. शेवटी कोथांबीर घालून १ मिनिट परतावा. चविष्ट बीट भाजी तयार.
टीप :- फोडणी खमंग व जरा जास्तच परतावी. आवडत असेल तर कढीपत्ता व कोथांबीर पण जास्त घालावा. त्याने भाजीला चव तर येतेच पण बीट व कोथांबीर या दोघांच्या रंगाच मेळ पण खूप चं छान जमतो.
वाचने
6529
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाकृ आवडली... पण ती बीटाची एक
करुन बघेल
साधी सोपी
पाकृ आवडली.
चांगली वाट्तेय..
बीट आवडत नाही, पण पाकृ चांगली
मृणालिनी ..... बीटाची तूरट चव
श्रिया ... बीट सहसा कोणालाही
अनन्या , पैसा ..... अग मी इथे
त्रिवेणी ..... मला बीटाच
छान छान