टाळ बोले माझ्य मनीं -
टाळ बोले माझ्या मनीं
नाद करी मृदुंग कानीं
चिपळ्यातुनी येई ध्वनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||
हाती झेंडा नाचवुनी
स्मरण होई गजरातुनी
नामाचा जप मुखातुनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||
डोईवरी तुळशीवृंदावनीं
पावलांच्या ठेक्यातुनी
टाळ्यांच्या तालातुनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||
भक्तीच्या या वाटेवरुनी
जाऊ सगळे आनंदुनी
गाऊ सगळे दंग होउनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||
देहभान अपुले हरपूनी
नाचू रंगूया कीर्तनी
म्हणू सगळे वारीतुनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||
.
विठ्ठल
ठ्ठल ठ्ठल ठ्ठल ...
विठू माउली तू ...माउली जगाची
आवडली.
वाह !!
वा! वा! अगदी वारीला गेल्यागत