Skip to main content

होममेड चॉकलेट

लेखक अनन्न्या यांनी गुरुवार, 28/02/2013 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
लेकाची चॉकलेटच्या वड्यांची फर्माईश आली, आणि रुचिराची आठवण झाली. कमलाबाई ओगले यांच्या रुचिरातील ही चॉकलेटची क्रुती!! साहित्य: सहा चमचे कोको पावडर, अर्धी वाटी लोणी, एक सपाट वाटी दूध पावडर, दिड वाटी साखर. क्रुती: साखर बुडेपर्यंत पाणी घालून एक तारी पाक करावा. त्यात दूध पावडर, कोको घावे. चांगले एकजीव करावे. त्यात लोणी घालून चांगले शिजवावे. शिजताना सारखे ढवळावे. गोळा होत आला की खाली उतरून घोटावे. ताटात थापून वड्या पाडाव्यात. आपल्या आवडीप्रमाणे पॅक कराव्या.

वाचने 7929
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/chocolate.gif

रुचिरा नवे आले होते तेव्हा माझी आई बरेचदा करायची. आता त्यातले अर्धी वाटी लोणी वगैरे साहित्य वाचून मी त्याच्या वाटेला जात नाही.

In reply to by पैसा

लहान असताना आईने खूप बनवून खाऊ घातल्या :) आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद फोटो छान आहे :)

छान !! पण सध्या वर्ज्य आहे.