या साऱ्या कोलाहालाचा फक्त ‘समय’ एकटाच ‘गवाह’ आहे,
’Technology’ च्या महापुरात बुडाला जनप्रवाह आहे.
‘T.V’ च्या त्या अखंड भट्टीत संस्कारांची वानवा आहे,
अन ‘internet’ च्या मायाजालाचा मोह हर मानवा आहे.
घरच्यांपेक्षा ‘Facebook – friends’ शी बोलणाऱ्यांची वाहवा आहे,
आणि सदैव ‘messengers’ वर ‘chat’ करणारा आजचा जमाना नवा आहे.
या साऱ्या जंजाळात हरवला माणुसकी चा गारवा आहे,
अन ५००+ ‘FB friends’ असले तरी एकटेपणा जीवा आहे.
या प्रचंड कल्लोळातून एक तरी शांत क्षण हवा आहे,
आपसांतल्या उदासीनतेवर तीच एक ‘दवा’ आहे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1263
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
विषय पोटतिडकीने मांडलाय.
पण खुप सार्या भाषांची सरमिसळ झालीये.
धन्यवाद
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद :)
गेल्या आठवड्यात एकदा कंटाळा आलेला तेव्हा हि कविता मी ठरवून लिहिली. रोज काहीतरी नवीन लिहायचे असे ठरवले होते म्हणून.
मग तेच पुन्हा इंग्लिश मधून पण लिहिले....
One moment of pause
Time immortal is the sole witness
Of an entire generation drowned,
In this vast ocean of technology-noise
Upon which we’ve always fawned.
What the constant blare of TV is worth,
If values are looked down?
I’m sure the internet obsession of mortals
Makes even the almighty frown.
Gen-Z that prefers FB friends to the kin
Is a loser generation for sure,
And for obsessive chatting on all messengers
There seems no possible cure.
In all this chaos I hardly wonder
That we’ve lost personal touch,
And despite thousands of Facebook friends
Heart stays lonely very much.
My poetic heart tells me – we need
Only one moment of pause,
To reflect and recollect ourselves
To correct this huge faux pas.
आहे. आहे...
प्रयत्न स्तुत्य आहे.
अछा
खरी गोम इथे आहे. कवितेला जोर्-जबरदस्ती अजिबात खपत नाही.
इंग्रजी आवृत्ती सुंदर आहे. मराठीत ती तितक्या प्रभावी पणे उतरली आहे असे मात्र म्हणता येत नाही.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत.
:) मान्य आहे....
अगदी बरोबर आहे. तरीही प्रयत्न या साठी केला की हळूहळू तरी परत मला कविता सुचाव्यात..