Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by माहितगार on Fri, 02/22/2013 - 18:15
नमस्कार, हा मिपावर मी सुमारे ५ वर्षांपुर्वी काढलेला चर्चा धागा . पाच एक वर्षे उलटून गेली आहेत तेव्हा चर्चेचा अजून एक राउंड करुन पाहू , या वेळी विकि हे टार्गेट नाही मिपाच राहू देऊ, 'रचनात्मक टिका कशी स्विकारावी' (How to accept constructive criticism) आणि 'रचनात्मक टिका कशी करावी' (How to do constructive criticism) या बद्दल आंतरजालावर इंग्रजी भाषेत बरच मार्गदर्शन उपलब्ध दिसत, पण कठोरतेचा टच कसा द्यावा या बद्दल फारशी माहिती वाचण्यास मिळाली नाही. रागावल्या नंतर व्यक्तिगत टिका (आपल्या मराठी) संस्कृतीचा भागही आहे. अशा रागावलेल्या व्यक्तींना उपयोगी पडेल असा त्यांचा राग मनमोकळेपणाने व्यक्त करू देणारे "कठोर टीकात्मक लेखन", सभ्यतेच्या (संसदीय) मर्यादेत पुर्णतः राहून आणि व्यक्तिगत रोख टाळून कसे करावे ? या बद्दल 'कठोर पण सभ्य टिका कशी करावी' असा लेख 'मराठी विकिबुक्सवर' लिहिण्यात सक्रीय सहभाग अथवा या विषयाच्या अनुषंगाने चर्चा अथवा मराठी शब्द, शब्द समूह, वाक्यरचना तुमच्या अनुभवातून किंवा मराठी साहित्यातील उदाहरणे हवी आहेत. चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments
  • 36375 views

प्रतिक्रिया

Submitted by माहितगार on Fri, 02/22/2013 - 19:41

In reply to धागा वाचताना झोप लागत होती by वेताळ

Permalink

कशामुळे? प्रतिसाद अमळ गोड आहे

अजून थोडा खणखणीत करता येईल ? धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 02/22/2013 - 19:48

Permalink

आजकाल जो तो उठतो तो

आजकाल जो तो उठतो तो मिपाकरांना कामाला लावतो. मला एक सांगा तुम्ही काय उदाहरण दिलत म्हणून इतर सदस्यांनी उदाहरणे द्यावीत? का उगा आपलं अमकं पाश्चात्य पुस्तक वाचलं न टमकं वाचलं ची फुका झैरात? २ आठवड्यात तुम्ही मिपा किती वाचलंत, प्रतिसाद किती दिलेत? ट्रॅक तर कोरा दिसतोय. तुम्हीच उलट सांगा - सदस्यांनी हा धागा का म्हणून एन्टरटेन करावा???
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 02/22/2013 - 19:52

In reply to आजकाल जो तो उठतो तो by शुचि

Permalink

::>>तुम्हीच उलट सांगा -

::>>तुम्हीच उलट सांगा - सदस्यांनी हा धागा का म्हणून एन्टरटेन करावा??? ::हे जमल , ::बाकीच सूर बरोबर आहे , पण अजून थोडं खणखणीत जमवता येईल ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sat, 02/23/2013 - 10:31

In reply to आजकाल जो तो उठतो तो by शुचि

Permalink

आजकाल जो तो उठतो तो

आजकाल जो तो उठतो तो मिपाकरांना कामाला लावतो. मला एक सांगा तुम्ही काय उदाहरण दिलत म्हणून इतर सदस्यांनी उदाहरणे द्यावीत? का उगा आपलं अमकं पाश्चात्य पुस्तक वाचलं न टमकं वाचलं ची फुका झैरात? २ आठवड्यात तुम्ही मिपा किती वाचलंत, प्रतिसाद किती दिलेत? ट्रॅक तर कोरा दिसतोय. तुम्हीच उलट सांगा - सदस्यांनी हा धागा का म्हणून एन्टरटेन करावा???
एक निरीक्षण नोंद ईच्छितो, तुम्हीही अगदी हेच करता. आपल्याला स्पर्धक निर्माण होत आहे या भीतीने तुम्ही हा प्रतिसाद दिला आहात का? ही टीका जर तुम्हाला कठोर वाटत असेल तर तसे स्पष्ट सांगा. या धाग्यातील त्यातला त्यात माहितीपुर्ण प्रतिसाद वाचून ती शक्य तेव्हढी सभ्य शब्दांत (सदस्यांना स्वसंपादनाची सूविधा नसल्यामुळे) पुन्हा करण्यात येईल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 02/27/2013 - 03:31

In reply to आजकाल जो तो उठतो तो by धन्या

Permalink

धनाजीराव तुम्ही सर्वात "वीक"

धनाजीराव तुम्ही सर्वात "वीक" सदस्य पाहून हे जे टीकेचं मोहोळ उठवलं आहेत ना ते आक्षेपार्ह आहे. आपल्या कोत्या मनोवृत्तीचा त्रिवार निषेध करावा तरी थोडाच आहे! चूझ योर ओन साइझ!!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 02/22/2013 - 20:02

Permalink

या विषयात डॉक्टरेट मिळवलेले

या विषयात डॉक्टरेट मिळवलेले रारा परिकथेतील राजकुमार आणि नाना चेंगट यांच्या प्रदिर्घ प्रतिसादांच्या प्रतिक्षेत. नाना तू वर ते दिलेत तसे चाराणे छाप प्रतिसाद द्यायचं सोडून एक छानसा प्रतिसाद दे पाहू.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Fri, 02/22/2013 - 22:48

In reply to या विषयात डॉक्टरेट मिळवलेले by गणपा

Permalink

विनंती फाट्यावर मारली आहे.

विनंती फाट्यावर मारली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 02/22/2013 - 20:12

Permalink

फिर बात बनेगी

::>>प्रदिर्घ प्रतिसादांच्या प्रतिक्षेत ::सहमत ::>>चाराणे छाप प्रतिसाद ::'रदिर्घ प्रतिसादांच्या प्रतिक्षेने बावरल्यामुळे सहमती देत नाही :) पण, बाकी,आमच्या प्रस्तावित लेखात वापरण्या करता वाक्यप्रयोग छान आहे. धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 02/22/2013 - 21:05

Permalink

टीका? ती काय असते ब्वॉ?

मला टीका अशी कोणाची करताच आली नाही कधी, त्यामुळे काहीच सांगू शकत नाही. कोणी या विषयावर क्लासेस घेतं का?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 02/23/2013 - 09:10

In reply to टीका? ती काय असते ब्वॉ? by सूड

Permalink

क्लास करताच

साहित्य शोधतोय , म्हणजे क्लास कशे शिष्टीमनी होतील :)
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on Fri, 02/22/2013 - 21:17

Permalink

एखाद्या व्यक्तीवर टीका न करता

एखाद्या व्यक्तीवर टीका न करता त्या व्यक्तीच्या श्रद्धास्थानांवर करावी. हा वार कधीच खाली जात नाही. फक्त अश्यावेळी आपली स्वताची श्रद्धास्थाने असू नयेत किंवा ती उघड करू नयेत किंवा खोटीच पसरवावीत.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 02/23/2013 - 09:14

In reply to एखाद्या व्यक्तीवर टीका न करता by तुमचा अभिषेक

Permalink

...पण अवहेलना हा उद्देश असू नये

श्रद्धास्थाने ढळली तर चालतील (नव्या श्रद्धास्थानांचे ऑप्शन देता आलेच पाहिजेत असे नाही,पण देता आले तर मेहनत फळाला येते नाहीतर नाही) पण हे करताना श्रद्धास्थानांची अवहेलना हा उद्देश मात्र मुळीच असू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 02/22/2013 - 23:16

Permalink

गविंनी सांगितलेला जळ.लि आणि

गविंनी सांगितलेला जळ.लि आणि मिळ.लि फॉर्म्याट विसरले का बे सगळे? त्या साच्यात हे टीकाप्रकरण चपखल बसवता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 02/23/2013 - 09:23

In reply to गविंनी सांगितलेला जळ.लि आणि by बॅटमॅन

Permalink

काय आणि कसे

आम्ही मि.पा. वर नवीन आहोत .कृ. जरा विस्तारकरून मिळावा .
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Fri, 02/22/2013 - 23:26

Permalink

कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी

कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?
तथाकथित विचारवंत, कंपुबाज यांना सोडुन कोणाला कशाही पध्दतिने घातलेल्या उभ्या आडव्या शिव्या म्हणजे कठोर व सभ्य टिका होय.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 02/23/2013 - 09:32

In reply to कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी by अग्निकोल्हा

Permalink

...हे बदलणे चर्चा प्रस्तावाचे प्रयोजन आहे

::>>उभ्या आडव्या शिव्या म्हणजे कठोर व सभ्य टिका होय. ::हे रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र म्हटल्या सारखे नाही ना ? ...हे बदलणे या चर्चा प्रस्तावाचे प्रयोजन आहे. ::>>तथाकथित विचारवंत, कंपुबाज यांना सोडुन ::विचारवाँटाच्या विचारानंतर कंपूबाजाकडून बर्याचदा अपेक्षीत नसलेल्या भाषेत जो धूरळा उडतो तो धूरळा रचनात्मक टिकेच्या मार्गाने नेता येईल किंवा कसे हा या चर्चेचा विचारवाँट आहे
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 02/22/2013 - 23:33

Permalink

हं, आणखी थोडे

दुसर्‍या संस्थळांवर तुमच्या कसल्याही लिखाणाला वाहवा मिळते म्हणून कृपया तुमचे सगळे लिखाण इथे आदळू नये. एक मित्रत्वाचा सल्ला म्हणून सांगते, इथल्या चोखंदळ वाचकांना कृपया गृहीत धरू नये आणि यापुढे किमान शुद्धिचिकित्सक तरी वापरून लिहाल अशी आशा आहे. तुमची मध्यमवर्गीय मानसिकता त्या मध्यमवर्गीय संस्थळावर सोडून आलात तर फार बरे. अशा मध्यमवर्गीय कूपंमंडूक वृत्तीचा आम्ही सर्वतोपरि निषेध करतो. (यात काही वैयक्तिक नाही ना? जल्लां कोणावर टीका करायची म्हणजे लैच विचार करावा लागतो. चांगलं, छान छान म्हणायला काय त्रास नाय!)
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Fri, 02/22/2013 - 23:34

Permalink

मुळात टिका का करावी??

मुळात टिका का करावी?? लेखक व कलाकृति लक्षात रहाते.. टिकाकार नाहि..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 02/22/2013 - 23:45

In reply to मुळात टिका का करावी?? by अविनाशकुलकर्णी

Permalink

लाखमोलाची गोष्ट

लेखक व कलाकृति लक्षात रहाते.. टिकाकार नाहि..
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 02/23/2013 - 09:20

In reply to मुळात टिका का करावी?? by अविनाशकुलकर्णी

Permalink

मुळात टिका का करावी??

...अनुमान आणि नकार या पद्धतीतून जाईल तेव्हाच सत्य जाणता येते. सत्य जाणायचे असेल, तर प्रत्येक प्रस्थापित सत्याला आपण नकार देणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण मनाने व बुद्धीने मुक्त असणे आवश्‍यक आहे. समाजव्यवस्थादेखील मुक्त असली पाहिजे.... [१];वादे वादे जायते तत्व(/शास्त्र) बोध ज्याचा अर्थ वाद विवादानेच सत्याचा बोध होतो. ::>>लेखक व कलाकृति लक्षात रहाते..टिकाकार नाहि.. ::सहमत
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sat, 02/23/2013 - 10:34

In reply to मुळात टिका का करावी?? by माहितगार

Permalink

हा उतारा कोणत्या पुस्तकातून

हा उतारा कोणत्या पुस्तकातून ढापलात तुम्ही? तुमचा ओरिजिनल उतारा असेल तर तुम्ही लेखक बनायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 02/23/2013 - 10:34

Permalink

भेंडी !

सदर लेखाचे व लेखाच्या लेखकांच्या प्रतिसादांचे सुगम मराठी भाषांतर देखील 'विकी' वरती दिल्यास काही उमाज पडेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 02/27/2013 - 09:22

Permalink

अगंबै ! मलासुद्धा हे समजलं तर

अगंबै ! मलासुद्धा हे समजलं तर बरं होईल. मला तर बै टीकाच करता येत नै. एखाद्याला फुकटात निरुपद्रवी सल्ला दिला तरी अंगावर भुंकत थयथयाट करत राहतात मग टीका तर लांबच राहीली. विकीच्या पानाच्या अपेक्षेत आहे. इथेच लिंकवलं तरी चालेल.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 02/27/2013 - 11:08

Permalink

बकवास !

अत्यंत वेडझवा धागा आणि त्याहून वेडझव्या प्रतिक्रिया.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 02/27/2013 - 11:13

In reply to बकवास ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

अहं.

कठोर टीका आहे पण रचनात्मक काही दिसत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 02/27/2013 - 11:17

In reply to अहं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

तसे लिहिण्यासाठी आजूबाजूला

तसे लिहिण्यासाठी आजूबाजूला रचनात्मकता समजणारी लोकं असायला नकोत का? गाढवांपुढे गीता कशाला ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 02/27/2013 - 11:26

In reply to तसे लिहिण्यासाठी आजूबाजूला by परिकथेतील राजकुमार

Permalink

गाढव कोण आणि गीता कोणत्या गावाची ?

टीका रचनात्मक आहे किंवा नाही तो ते समजून घेणे हे लेखकावर अवलंबून आहे. गाढवापुढे गीता कशाला यातही कठोरपणाच आहे. कठोर टीका करणे सोपं आहे, पण त्यातून रचनात्मक संदेशही गेला पाहिजे, ते बहूतेक होत नाही. अमूक अमूक लिहिणारा फाल्तू लिहितो तेव्हा ते फाल्तूपणा कुठे कसा आहे हे सांगितलं पाहिजे, म्हणजे हे 'खर्रच हे लिहिण्यात नको होतं का ' असा विचार लिहिणार्‍याच्या मनात आला पाहिजे, लिहिण्यापासून नाऊमेद करणं म्हणजे कठोर टीका नव्हे. असो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 02/27/2013 - 11:30

In reply to गाढव कोण आणि गीता कोणत्या गावाची ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

नुसत्या टिकेने कोणी

नुसत्या टिकेने कोणी लिहिण्यापासून नाऊमेद होत असेल तर त्या मनुष्याची किव वाटते. प्रतिसादकाने लेखक / लिखाणाला फाट्यावरती मारले की मग लेखकाने प्रतिसादक / प्रतिसादाला फाट्यावरती मारावे. हाय काय आन नाय काय !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 02/27/2013 - 11:47

In reply to नुसत्या टिकेने कोणी by परिकथेतील राजकुमार

Permalink

सर्वांचीच कातडी गेंड्यांची नसते.

माणसं हळवी असतात, माणसं कठोर असतात. काहींना मोजक्या शब्दांचा मार पुरेसा असतो, काहींना कितीही लिहा काहीही फरक पडत नाही. चर्चाप्रस्तावकाने म्हणूनच म्हटलं असावं की 'रचनात्मक टीका स्वीकारताही आली पाहिजे' टीका करणार्‍याने काही कठोर टीकेबरोबर रचनात्मक टीकाही केली पाहिजे, इतकेच म्हणायचे होते. बाकी, फाट्यावर मारणे, अनुल्लेखाने मारणे, दुर्लक्ष करुन निव्वळ समाचार घेणे, टोमणे, येता-जाता ढुसण्या, चिमटे, मला वाटतं हे केवळ कठोर टीकेत येतं. कठोर टीकेबरोबर 'रचनात्मक टीकेवर' फार काही प्रतिसादाता आलं नाही. बाय द वे, इंग्रजी साहित्यावर आपलं चांगलं वाचन आहे, तेव्हा रचनात्मक टीकेवर कै पुस्तक-बिस्तक आहे का ? काही मराठीत अनुवाद-बिनुवाद ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 02/27/2013 - 11:51

In reply to सर्वांचीच कातडी गेंड्यांची नसते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

हम्म्म

संपादकाच्या झूलीआडून प्राध्यापकांनी दिलेला प्रतिसाद वाटला. जलमं का हो आता ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 02/27/2013 - 11:53

In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

:)

आता जमलं :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 05/02/2018 - 18:34

Permalink

नमस्कार,

नमस्कार, हा मिपावर मी सुमारे ५ वर्षांपुर्वी काढलेला चर्चा धागा . पाच एक वर्षे उलटून गेली आहेत तेव्हा चर्चेचा अजून एक राउंड करुन पाहू , या वेळी विकि हे टार्गेट नाही मिपाच राहू देऊ. माझे कठोर टिकेचे अधिकतम स्वातंत्र्य जपण्यासाठी धागा वर जाढत आहे,
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 05/02/2018 - 18:41

In reply to नमस्कार, by माहितगार

Permalink

तुम्ही टार्गेट द्यायचे आणि

तुम्ही टार्गेट द्यायचे आणि इतरांनी बोंब मारायला निदान शिमग्याला तरी धागा वर काढायचात. वर्षभर शंखध्वनी करणारे त्या दिवशी तोंड दाबून बसतात. बादवे लै काय काय लिहायची न तेच तेच उकरु उकरु काढायची दांडगी हौस ब्वा तुम्हाला.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 05/02/2018 - 19:17

In reply to तुम्ही टार्गेट द्यायचे आणि by अभ्या..

Permalink

...बादवे लै काय काय लिहायची न

...बादवे लै काय काय लिहायची न तेच तेच उकरु उकरु काढायची दांडगी हौस ब्वा तुम्हाला.
असे करनारा मी येकला न्हाई आनी समद्यात म्होर बी न्हाई , बाकीच्ये बी करत्यात पन त्याम्चे त्यान्चे वीषय लावून धरत्यात !
...वर्षभर शंखध्वनी करणारे त्या दिवशी तोंड दाबून बसतात.
संक्रांतीला घाबरत्यात ! ...... :) ) आमी बी घाबरतो म्हना
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com