Skip to main content

कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 22/02/2013 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, हा मिपावर मी सुमारे ५ वर्षांपुर्वी काढलेला चर्चा धागा . पाच एक वर्षे उलटून गेली आहेत तेव्हा चर्चेचा अजून एक राउंड करुन पाहू , या वेळी विकि हे टार्गेट नाही मिपाच राहू देऊ, 'रचनात्मक टिका कशी स्विकारावी' (How to accept constructive criticism) आणि 'रचनात्मक टिका कशी करावी' (How to do constructive criticism) या बद्दल आंतरजालावर इंग्रजी भाषेत बरच मार्गदर्शन उपलब्ध दिसत, पण कठोरतेचा टच कसा द्यावा या बद्दल फारशी माहिती वाचण्यास मिळाली नाही. रागावल्या नंतर व्यक्तिगत टिका (आपल्या मराठी) संस्कृतीचा भागही आहे. अशा रागावलेल्या व्यक्तींना उपयोगी पडेल असा त्यांचा राग मनमोकळेपणाने व्यक्त करू देणारे "कठोर टीकात्मक लेखन", सभ्यतेच्या (संसदीय) मर्यादेत पुर्णतः राहून आणि व्यक्तिगत रोख टाळून कसे करावे ? या बद्दल 'कठोर पण सभ्य टिका कशी करावी' असा लेख 'मराठी विकिबुक्सवर' लिहिण्यात सक्रीय सहभाग अथवा या विषयाच्या अनुषंगाने चर्चा अथवा मराठी शब्द, शब्द समूह, वाक्यरचना तुमच्या अनुभवातून किंवा मराठी साहित्यातील उदाहरणे हवी आहेत. चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.

वाचने 36453
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

सौम्य : १. तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती / जास्त अपेक्षा होती. कठोर : २.हया वेळी जरा तुम्ही कमी पडलात - पुढच्या वेळी जास्त प्रयतन अपेक्षित आहेत - अन्यथा काही पर्याय शोधावा लागेल. कर्णकर्कश्य : तू नेहमीप्रमाणे घाण घातली आहेस.

In reply to by खटासि खट

कणखर मराठी मित्राचा प्रतिसाद मराठमोळे पणाची चुणूक दाखवतानाच आंतरजालावरील संसदीय सभ्यतेच्या परिघाच्या अपेक्षा कशा सांभाळायच्या हा मराठी आंतरजालावरील व्यवस्थापनांपुढचा हा प्रश्न जुनाच आहे आम्ही वाचा फोडली एवढेच.

In reply to by नाना चेंगट

सध्यातरी विचारवाँटाच्या भूमीकेत विचार घेण्याकरता आलो आहोत. वाफेच थंड पाणिही होऊ नये आणि ती योग्य मार्गाने कुणाला न दुखावता कशी बाहेर पाडता येईल याचा शोध घेणारा - आपला विचारवाँट

सदर लेख पुरेशा लांबीचा नाही. त्यातून अधिक सविस्तर अपेक्षा समजल्या असत्या तर बरे झाले असते. धागाकर्त्याने स्वतः एखादे उदाहरण देउन सुरुवात केली असती तर चर्चेची नेमकी अपेक्षित दिशा अधिक अचूक पकडली गेली असती. अर्थात धागाकर्त्यास याहून अधिक चांगले नक्कीच लिहिता येते ह्याची आम्हास खात्री नसली तरी आशा आहे. पुढील सर्व लेखनासाठी शुभेच्छा. . . . हुश्श. दिला बुवा एकदाचा रचनात्मक टिकेचा नमुना. :) आता कुणीतरी माझी समस्या सोडवा प्लीझ. .

चित्रपटामध्ये 'क्ठोर' शब्द बर्याच वेगळ्या अर्थांनी वापरला आहे .. त्या बद्दल जास्त माहीती कळेल का

नमस्कार, मिपावर स्वागत आहे. शास्त्रीय टीका, आस्वादक टीका, निर्णायक टीका, असे माहित आहे. चांगल्या टीकाकाराची लक्षणे सांगता येतील. पण, 'कठोरतेचा टच' असलेली टीका म्हणजे नेमकं समजलं नाही. कारण टीकेत 'कठोरता' असतेच तसे टीकाकारांकडे काही पूर्वग्रहही असतात. असं काही चालेल का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'कठोरतेचा टच' असलेली टीका म्हणजे नेमकं समजलं नाही. नुसत्या रचनात्मक टिका कशी करावी बाबत आंतरजालावर इंग्रजीत जे लेखन (How to do constructive criticism) गूगल सर्च ने मिळत त्यात थोडक्यात सँडवीच थेरपी सांगीतली आहे.म्हणजे आधी कौतुक मग खुपणारा भाग शेवट पुन्हा कौतुकाने. ह्याचही महत्व आहे पण फारच गोड गोड होत. कठोर मध्ये खणखणीत सूर अपेक्षीत आहे. -माहितगार

In reply to by माहितगार

''अनिल, हे एक प्रयोगशील कवी आहेत, त्यांनी सतत निरनिराळे प्रयोग केले आहेत, त्यांनी काव्यात 'दशपदी' हा एक नवीन रचनाप्रकार आणला आहे.'' आता यात कौतुक आहे आणि टीकाही आहे. (अनिलांना असं बोलणं खूपलेलं दिसतं) आपल्या दशपदी काव्यसंग्रहात कवी अनिलांनी म्हटलं होतं की 'प्रयोगशील कवी' म्हणून टीकाकारांना टीका करायची असेल तर खुशाल करु द्या. (शरद सर बरोबर ना ?) -दिलीप बिरुटे

इग्नोअर करा...! अर्थात हे पर्करन नवीनच शिकतोय आम्हीपण. हुच्च लोक्स आधीपासून वापरतात म्हणे!

स्पष्ट बोलल्याबद्दल माफ करा, पण तुमच्या लिखाणात मला अपेक्षित उंची आढळली नाही. काही तरी नवे मिळेल या आशेने लेख वाचायला सुरुवात केली होती, परंतु तेच घासून गुळगुळीत झालेले शब्दप्रयोग आणि कंटाळवाणी वाक्यरचना पाहून निराशा झाली. तुमच्यासारख्या नवोदित लेखकांना प्रथितयश व्हायचे असेल तर याहून जास्त गांभीर्याने लिहावे लागेल आणि तुम्हाला त्याहून जास्त वाचनाची आवश्यकता आहे हे नमूद करते. यापुढील लेख जास्त वाचनीय असेल अशी आशा व्यक्त करते. (हुश्श्य! जमलं का? कठोर टीका करणे हे फारच कठीण आहे ब्वॉ! :P)

In reply to by पैसा

टीका ज्यावर होते तो व्यक्ती चांगलाच संवेदनशील असावा. म्हणजे समजा मिपावर एखादे लेखन आले की त्याला टीका इतकी लागली पाहिजे की तो रात्रभर या कुशीवरुन त्या कुशीवर वळला पाहिजे. माझे मुद्दे असे भर घाला. १] प्रचंड आक्रमक लिहिलं पाहिजे. शब्द, वाक्य, उतारे अगदी उच्च दर्जाचे. २] झोंबणारी टीका केली पाहिजे, व्यक्तिगत सोडून देऊ. ३] आस्वादाचा आवाका नाही, आणि लेखन करत आहात तेव्हा काय काय वाचले पाहिजे. [प्रचंड यादी सांगायची] ४] किरकोळ गोष्टींचे ज्ञान नाही. असा सूर टीकाकाराकडे असला पाहिजे. आणि तो उत्तम व्यक्त झाला पाहिजे.[शुद्धलेखन नाही, वाक्यरचना बरोबर नाही, आशय तर लेखनातून अजिबात पोहचत नाही] ५] उगाच बालकवी वाचलाय ? मुक्तीबोध वाचलाय ? किमान तुकारामाचे अभंग चाळले आहेत ? कर्‍हेचं पाणी माहिती आहे ? वर्डस्वर्थ नाव ऐकलंय ? उगा असं जे लेखकानं वाचलं नसेल त्याची नावे घ्यायची. हे एकदा वाचा आणि मग लिहा म्हणायचं. ६] ७] ८] ९] १०] सवडीने भरतो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

६] ७] ८] ९] १०] सवडीने भरतो. smiley
जमत नाही असं सरळ सांगावं, उगाच काय सवडीच्या सबबी. तसंही प्राध्यापकांना हल्ली काही काम तरी कुठे असतं.

In reply to by शुचि

आपापसातल आदर आहे तर,तर होऊन जाऊ द्या , पण आमच्या प्रस्तावित लेखात न बसवता येणारा शब्द दिसला म्हणून आठवण दिली.

In reply to by माहितगार

कुणीतरी काहीतरी लिहितं आणि पब्लिक लगेच कीबोर्डवर बोटं आपटायला सुरुवात करतं. लिहिलेलं चुक आहे बरोबर आहे याचा पडताळा घेण्याच्याही भानगडीत कुणी पदत नाही.
नाना ज्यांच्यात्यांच्यावर का टीका करुन राहीलायत बे?
हे वाक्य नागपूरी भाषेतलं आहे असं जर लेखिकेचं म्हणणं असेल तर ते चुक आहे. प्रतिसादकर्तीस नाना चेंगट या आयडीस आदरार्थी संबोधावयाचे असल्याने तिने "राहीलायत बे" असा शब्दप्रयोग केला आहे. मुळात "बे" हा शब्द सलगीदर्शक आहे. आणी तो एकेरी संबोधन असेल (किंवा ज्यांना एकेरी संबोधता येईल अशा अनेक जणांना एकाच वेळी संबोधले जात असेल) तरच वापरला जातो. प्रतिसादकर्तीचा "राहीलायत" हा शब्दच चुकीचा आहे. बहूधा तो प्रतिसादकर्तीने नाना चेंगट या आयडीस अहो जाहो (अनेकवचनी आदरार्थी) करण्यासाठी निर्माण केला असावा. जर मुळ वाक्य बरोबर लिहायचं असेल तर असं लिहिता येईल: १. नाना ज्यांच्यात्यांच्यावर का टीका करुन राहीला बे? - सलगीदर्शक एकेरी संबोधन २. नाना ज्यांच्यात्यांच्यावर का टीका करुन राहीला? - अनेकवचनी आदरार्थी (च्यायला, पब्लिकसारखं चावणं मलाही जमायला लागलं तर.)

In reply to by नाना चेंगट

>>>जमत नाही असं सरळ सांगावं, उगाच काय सवडीच्या सबबी. तसंही प्राध्यापकांना हल्ली काही काम तरी कुठे असतं. मस्त जमलंय अजून येऊ दे. [माझ्या मागं नगं लागू. ] :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या मागे लागावं असं तुमच्यात काही आहे असं मला वाटत नाही.

In reply to by नाना चेंगट

धन्यवाद.

In reply to by नाना चेंगट

धन्यवाद.

In reply to by नाना चेंगट

::>>जमत नाही असं सरळ सांगावं, उगाच काय सवडीच्या सबबी. ::हे मस्त आहे. ::>>तसंही प्राध्यापकांना हल्ली काही काम तरी कुठे असतं. ::हे एक वाक्य व्यक्तिगत होतय का ? ठिक आहे ?

In reply to by माहितगार

::>>तसंही प्राध्यापकांना हल्ली काही काम तरी कुठे असतं. अहो नानांनी ते वाक्य समस्त प्राध्यापक वर्गाबद्दल वापरले आहे. बिरुटे सर मिपावर संपादक देखिल आहेत.

In reply to by नाना चेंगट

बा ! नील्कांता सिग्नेचरची सोय दिली तशीच प्रतिसाद संपादनाची पण सोय मिळाली तर बरे होईल. च्यामारी संपादक, सल्लागार आणि तंत्रज्ञ त्यांचे त्यांचे प्रतिसाद संपादीत करु शकतात पण आमच्यासारखे सामान्य सदस्य मात्र या साध्या सोईपासून वंचित रहातात हे पाहून जीव तीळ तीळ तुटतो. असो, बदलीन.

आजकाल जो तो उठतो तो मिपाकरांना कामाला लावतो. मला एक सांगा तुम्ही काय उदाहरण दिलत म्हणून इतर सदस्यांनी उदाहरणे द्यावीत? का उगा आपलं अमकं पाश्चात्य पुस्तक वाचलं न टमकं वाचलं ची फुका झैरात? २ आठवड्यात तुम्ही मिपा किती वाचलंत, प्रतिसाद किती दिलेत? ट्रॅक तर कोरा दिसतोय. तुम्हीच उलट सांगा - सदस्यांनी हा धागा का म्हणून एन्टरटेन करावा???

In reply to by शुचि

::>>तुम्हीच उलट सांगा - सदस्यांनी हा धागा का म्हणून एन्टरटेन करावा??? ::हे जमल , ::बाकीच सूर बरोबर आहे , पण अजून थोडं खणखणीत जमवता येईल ?

In reply to by शुचि

आजकाल जो तो उठतो तो मिपाकरांना कामाला लावतो. मला एक सांगा तुम्ही काय उदाहरण दिलत म्हणून इतर सदस्यांनी उदाहरणे द्यावीत? का उगा आपलं अमकं पाश्चात्य पुस्तक वाचलं न टमकं वाचलं ची फुका झैरात? २ आठवड्यात तुम्ही मिपा किती वाचलंत, प्रतिसाद किती दिलेत? ट्रॅक तर कोरा दिसतोय. तुम्हीच उलट सांगा - सदस्यांनी हा धागा का म्हणून एन्टरटेन करावा???
एक निरीक्षण नोंद ईच्छितो, तुम्हीही अगदी हेच करता. आपल्याला स्पर्धक निर्माण होत आहे या भीतीने तुम्ही हा प्रतिसाद दिला आहात का? ही टीका जर तुम्हाला कठोर वाटत असेल तर तसे स्पष्ट सांगा. या धाग्यातील त्यातला त्यात माहितीपुर्ण प्रतिसाद वाचून ती शक्य तेव्हढी सभ्य शब्दांत (सदस्यांना स्वसंपादनाची सूविधा नसल्यामुळे) पुन्हा करण्यात येईल. ;)

In reply to by धन्या

धनाजीराव तुम्ही सर्वात "वीक" सदस्य पाहून हे जे टीकेचं मोहोळ उठवलं आहेत ना ते आक्षेपार्ह आहे. आपल्या कोत्या मनोवृत्तीचा त्रिवार निषेध करावा तरी थोडाच आहे! चूझ योर ओन साइझ!!! =))

या विषयात डॉक्टरेट मिळवलेले रारा परिकथेतील राजकुमार आणि नाना चेंगट यांच्या प्रदिर्घ प्रतिसादांच्या प्रतिक्षेत. नाना तू वर ते दिलेत तसे चाराणे छाप प्रतिसाद द्यायचं सोडून एक छानसा प्रतिसाद दे पाहू.

::>>प्रदिर्घ प्रतिसादांच्या प्रतिक्षेत ::सहमत ::>>चाराणे छाप प्रतिसाद ::'रदिर्घ प्रतिसादांच्या प्रतिक्षेने बावरल्यामुळे सहमती देत नाही :) पण, बाकी,आमच्या प्रस्तावित लेखात वापरण्या करता वाक्यप्रयोग छान आहे. धन्यवाद

मला टीका अशी कोणाची करताच आली नाही कधी, त्यामुळे काहीच सांगू शकत नाही. कोणी या विषयावर क्लासेस घेतं का?

एखाद्या व्यक्तीवर टीका न करता त्या व्यक्तीच्या श्रद्धास्थानांवर करावी. हा वार कधीच खाली जात नाही. फक्त अश्यावेळी आपली स्वताची श्रद्धास्थाने असू नयेत किंवा ती उघड करू नयेत किंवा खोटीच पसरवावीत.

In reply to by तुमचा अभिषेक

श्रद्धास्थाने ढळली तर चालतील (नव्या श्रद्धास्थानांचे ऑप्शन देता आलेच पाहिजेत असे नाही,पण देता आले तर मेहनत फळाला येते नाहीतर नाही) पण हे करताना श्रद्धास्थानांची अवहेलना हा उद्देश मात्र मुळीच असू नये.

गविंनी सांगितलेला जळ.लि आणि मिळ.लि फॉर्म्याट विसरले का बे सगळे? त्या साच्यात हे टीकाप्रकरण चपखल बसवता येईल.

कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?
तथाकथित विचारवंत, कंपुबाज यांना सोडुन कोणाला कशाही पध्दतिने घातलेल्या उभ्या आडव्या शिव्या म्हणजे कठोर व सभ्य टिका होय.

In reply to by अग्निकोल्हा

::>>उभ्या आडव्या शिव्या म्हणजे कठोर व सभ्य टिका होय. ::हे रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र म्हटल्या सारखे नाही ना ? ...हे बदलणे या चर्चा प्रस्तावाचे प्रयोजन आहे. ::>>तथाकथित विचारवंत, कंपुबाज यांना सोडुन ::विचारवाँटाच्या विचारानंतर कंपूबाजाकडून बर्याचदा अपेक्षीत नसलेल्या भाषेत जो धूरळा उडतो तो धूरळा रचनात्मक टिकेच्या मार्गाने नेता येईल किंवा कसे हा या चर्चेचा विचारवाँट आहे

दुसर्‍या संस्थळांवर तुमच्या कसल्याही लिखाणाला वाहवा मिळते म्हणून कृपया तुमचे सगळे लिखाण इथे आदळू नये. एक मित्रत्वाचा सल्ला म्हणून सांगते, इथल्या चोखंदळ वाचकांना कृपया गृहीत धरू नये आणि यापुढे किमान शुद्धिचिकित्सक तरी वापरून लिहाल अशी आशा आहे. तुमची मध्यमवर्गीय मानसिकता त्या मध्यमवर्गीय संस्थळावर सोडून आलात तर फार बरे. अशा मध्यमवर्गीय कूपंमंडूक वृत्तीचा आम्ही सर्वतोपरि निषेध करतो. (यात काही वैयक्तिक नाही ना? जल्लां कोणावर टीका करायची म्हणजे लैच विचार करावा लागतो. चांगलं, छान छान म्हणायला काय त्रास नाय!)

मुळात टिका का करावी?? लेखक व कलाकृति लक्षात रहाते.. टिकाकार नाहि..

In reply to by अविनाशकुलकर्णी

...अनुमान आणि नकार या पद्धतीतून जाईल तेव्हाच सत्य जाणता येते. सत्य जाणायचे असेल, तर प्रत्येक प्रस्थापित सत्याला आपण नकार देणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण मनाने व बुद्धीने मुक्त असणे आवश्‍यक आहे. समाजव्यवस्थादेखील मुक्त असली पाहिजे.... [१];वादे वादे जायते तत्व(/शास्त्र) बोध ज्याचा अर्थ वाद विवादानेच सत्याचा बोध होतो. ::>>लेखक व कलाकृति लक्षात रहाते..टिकाकार नाहि.. ::सहमत