Skip to main content

माणूस

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 22/02/2013 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
खगांचे थवे, पाखरे ही निरागस काय कसे रज, कण संचिताचे थकेनात पंख, खळे ना भरारी रिते मोकळे सोस, निळ्या अंबराचे न हेवे न दावे, न साठे कशाचे हवेसे नितळ, पारदर्शी उसासे ढळे दिवस कोरा, रात्र आणि काळी जगाची तमा ना, असे खेळ सारे माणूस मी, भूक, व्याधी उपाधी मुळी मूढ ईर्षा, अंध, अंग जाळी परा, बुद्धी-प्रज्ञा, असूनी उपाशी अवकाळ मोठा, सदा मोह पाशी .........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1622
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आवडली कविता !!

परत एक सुंदर रचना
माणूस मी, भूक, व्याधी उपाधी मुळी मूढ ईर्षा, अंध, अंग जाळी परा, बुद्धी-प्रज्ञा, असूनी उपाशी अवकाळ मोठा, सदा मोह पाशी
सुरेख!!

:) सुरेख

खगांचे थवे, पाखरे ही निरागस काय कसे रज, कण संचिताचे थकेनात पंख, खळे ना भरारी रिते मोकळे सोस, निळ्या अंबराचे
सुंदर! अहो तो पशुपतीनाथ आहे पक्ष्यांची काळजी घायला.

कविता आवडली.
हवेसे नितळ, पारदर्शी उसासे
हे विशेष आवडले.

छान