✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

त्रागा धागा... वैताग.....

म
मन यांनी
Tue, 02/19/2013 - 12:31  ·  लेख
लेख
हा धागा मी का लिहितोय ? कटकट करुन फार थकलोय. चिडचिड करायचाही स्टॅमिना संपलाय. अगदि लहान लहान गोष्टींत चिडचिड करायची पूर्वीपासून सवय. एक बस सुटली ऑफिसची नि ५ मिनिटं वाट पहावी लागली, कर चिडचिड. बॉसनं येताना सगळ्यांना शेकहँड केलं गुड मॉर्निंग म्हणत, मला सोडलं, कर चिडचिड. तिचं नाव ठाउक नाही, पण रोज येउन ओळखीची स्माइल देते, आज एकदम अनोळखी चेहरा करुन चाल्ली गेली, कर चिडचिड. पक्यानं आज पुन्हा फुकटात चहा पिला माझ्याकडून नि पुन्हा वर निर्ढावल्यासारखा फुक्टात सुट्टा मारुन गेला; बोंबल त्याच्या नावानं.(तरी त्याला स्वतःहून बोलावून चहा पाजायचं सोडू नकोस. किंवा त्यानी बोलावल्यावर लागलिच जायची सवय मोडू नकोस.) धाग्याला प्रतिसाद नाही मिळाले, होउन बस खट्टू. बसम्ध्ये शेजारी जाड्या येउन बसला नि माझ्याही सीटचा ८०% भाग त्यानं व्यापला, करुन घे वैताग. . चीननं ग्वादार बंदर घेतलं, बांधलं ; घे टेन्शन. युरो कोसळणार, डॉलर कडाडणार असं ऐकलं, कर चिंता. डॉलराऐवजी रुपया कडाडला(नि डॉलर पडला!) अजूनच घाबर. कंपनीचा नफा कमी झाला हो. पैसा कमी मिळणार हो. अशी बोंब मारणं कर सुरु. . पाकड्यांची अण्वस्त्रं माथेफिरुंच्या हाती जाण्याचं ऐकलं कर त्रागा. जगातलं पेट्रोल एक न एक दिवस संपणार आहे हे पुन्हा जाणवलं, घे घाबरगुंडी उडवून स्वतःची. "अरे बाप रे , आभाळ कोसळणार, आता कसं होणार" हाच ह्या सगळ्यात आमचा टोन. . बस आता. हे जगाचं टेन्शन सोसवत नाही. "सारी दुनिया का बोझ मेरे ही कमजोर खंदो पे है" असं वाटून घेणं सोडीन म्हणतो. जsssरा मोकळ्या मनानं श्वास घ्यावा. मनापासून आवडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींना दाद देउन पहावी. पण आधी एकदा सगळा त्रागा लिहूनच काढायची तीव्र इच्छा आहे. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या धाग्यांवर तोच तो वैताग डोकावयास नको. . . समाजवादी आत्मताडन नि मन मारुन जगणे पूर्वी ऊठसूट स्वच्छ चारित्र्यवाल्या जुन्या नेत्यांबद्दल, नि त्यांच्या उच्च मूल्य, साधी राहणी, परोपकार , निष्ठा, वगैरेबद्दल वर्तमानपत्रात वाचायचो आणि आपल्याला किती वाईट काळात रहावं लागतय त्याबद्दल हळहळायचो. आजही मराठी वृत्तप्त्रांतातील स्तंभलेखनात जुन्या काळच्या समाजवाद्यांचा प्रभाव आहेच. विनोबा भावे,साने गुरुजी,तर कधी नानाजी देशमुख, कधी राममनोहर लोहिया, एसेम, मृणाल गोरे किंवा उच्च मूल्ये जपणारे , अभ्यस्त असणारे आणि प्रागतिक विचाराअंचे म्हणून यशवंतराव चव्हाण अशी नावं पब्लिक घेते. मुळात ह्या सर्वांचा जेव्हा तथाकथित कर्तबागारीचा सुवर्णकाळ सुरु होता, तेव्हा भारत कुठे होता? ह्यांनी त्यात काय भर घातली? आज जे भिकारचोट, अप्पलपोटे आणि ढेर्‍या तुडुंब भरल्या तरी ढेकरही न देणारे असे जे नेते म्हणवले जातात,हे त्यांचीच सेकंड जनरेशन फळी आहेत ना? ह्या आज गणंग वाटणार्‍यांना त्यांनीच वर आणले/येउ दिले का? की ह्यांना ते थांबवायचे होते पण काळाच प्रवाह अडवण्यात हे माझ्याइतकेच दुर्बळ, हीन दीन दुबळे ठरले? म्हणजे चांगली वर्तणूक असणरे सज्जन पण दुर्बळ अशीच ही माणसे का? . सगळ्या भल्या म्हणवल्या जाणारे लोक नेहमी कांदा भाकरीच का खातात? चांगलं खाण्यावर असे ते खार खाउन का असतात?(स्पेशली विनोबा भावे).चांगलं खाउनपिउन समाजसेवा करता येत नाही का? विनोबा भावे आणि गांधी ह्यांच्या "भलेपणानी वागा", "चांगला माणूस बना" असल्या कै च्या कैच उपदेशाला सिरियसली घेतल्यानं आम्ही किती खड्ड्यात गेलोय हे ह्यांना माहितीये का? माझ्या खड्ड्यात जाण्याची हे जिम्मेदारी घेतात का? चांगलं खाउनपिउन समाजसेवा करता येत नाही का? समाजासाठी आप्लं घर स्वाहा करतो म्हणजेच फार काही मोठ्ठं करतो असं काही आहे का? सुखासुखी राहणं हा मोठ्ठा गुन्हा आहे का? "हे साले पांढरपेशे", "स्वतःपुरतं पाहणारे" असं म्हणत नेहमी आम्हाला आमच्या जगण्याची लाज वातून द्यायचा हा वृत्तपत्रवाल्यांचा का प्रयत्न असतो? . विनोबाजींचे बहुतांश लिखाण हे उपदेशात्मक असते त्यामुळेच कधी कधी थोडेसे वाचून झाले की कंटाळवाणे नि पकाउ वाटते. उदात्त, पारंपरिक भारतीय विचार वगैरे त्यातून डोकावत राहतात.त्यांच्या टाइपच्या पुढील वाक्यांमुळे मला व्यावसायिक व व्यावहारिक जीवनात जबरदस्त आपटी खावी लागली. खरे बोलावे. साधे रहावे. उगाच भपका कशाला? दुसर्‍यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे. उगाच कुणाला वाइट्-साइट बोलू नये.(म्हनजे थोडक्यात सगळी टिंगल टवाळी गायब. गजाल्या गायब. कट्टे गायब्.दोसत कंपनी गाय्ब.) मेहनत करावी. मेहनत केली असेल तर त्याचे श्रेय मिळेलच. श्रेय मुद्दम घेण्याचा प्रयत्न करू नये.आपली चूक कबूल करावी.दुसर्‍याच्या चुका उगाच प्रकाशझोतात आणू नये. . दवणे :- चित्रपट रसिक म्हणवणार्‍यांनी "गुंडा" पाहिलं नसेल, वाचक म्हणवणार्‍यांनी "दवणे" वाचले नसतील तर त्यांनी आयुष्यात खूप मोठ्ठं काही मिस केलय. . (सर्व साने गुरुजी फ्यान ची क्षमा मागून) अधिकाधिक बाळबोध, सुगम, सुकर, तथाकथित "संस्कारक्षम" लिहिण्यात साने गुरुजींपेक्षाही दवणे कैकपट पुढे आहेत. ( त्याच्या लिखाणात साधेपण, सात्विकपणा, वागण्यातील शुचिर्भूतता वगैरे वगैरे टिप्पिकल मध्यमवर्गानं over hype करुन ठेवलेल्या संकल्पनांचा भडिमार आहे.) . कुणाला शिव्याशाप खरोखर लागत असतील असे वाटत असेल तर माझ्या आयुष्यातील सर्व तळतळाट ह्या बकवास समाजवादी विचारांना लागतील. "साधे रहा. चांगले रहा. भले रहा. (स्वतःची चूक नसताना) थोबाडित खाउन घ्या. स्वतः कष्ट करूनही सुखासमाधानानं जगायची लाज वाटून घ्या. आपल्या कामाचं क्रेडिट घ्यायला संकोच करा नि स्वतःच्या पायावर धोंडा घालून घ्या; स्वतःचा न्याय्य हक्क विसरुन मन मारुन जगा. गुणी बाळ व्हा." असला बकवास सिरियसली घेतल्यानं माझं लै नुस्कान झालेलय. स्वतःवर विलक्षण अन्याय करायची नि न्यूनगंड बाळगायची , अनावश्यक समाजसेवा (स्वतःचे इतरांमार्फत शोषण होउ देण्यासाठी इतरांना उत्तेजित करण्याची!!) करण्याची मला असल्या कंपूच्या बालपणातील घेरावामुळे लागलेली सवय अजूनही धड गेलेली नाही. . थोडक्यात थिल्लरपणाचा विक्रम तो माणूस करतो. ह्या उथळपणात त्याला फक्त चेतन भगतच*टक्कर देउ शकतो. . . *भगत सोशालिस्ट बकवास करतो असे मी म्हणत नाही. पण तो त्याच तोडीचे भंकस्/थिल्लर/सवंग लिखाण करु शकतो असे मला म्हणायचे आहे. . स्वामी विवेकानंद :- "इच्छा असेल तर सद्गुरु मिळतोच" , तथाकथित "सन्मार्गस नि आध्यात्मिक उन्नतीस लागतोच" वगैरे वगैरे स्टाइल काही स्वामीअभ्यासक म्हणवणार्‍यांनी बिंबवले. आम्ही दिवसेंदिवस इच्छाच करीत बसलो. नंतर मात्र त्यांचेच इतरही विचार/quotes समजले ते बरे झाले. कष्ट करा. (चक्क भौतिक)उन्नती करुन घ्या. पाश्चात्त्यांच्या चांगल्या गोष्टी( मोकळेपणा, सचोटी, आत्मविश्वास) शिकण्यास संकोचू नका . बंधूभाव जपा. बलशाली व्हा. "तरुणांनो गीता पठण करण्यापेक्षा आधी सशक्त व्हा. भरपूर फुटबॉल खेळा" ह्या धर्तीवरचं बरच काही "स्वामी विवेकानंद म्हणतात" ह्या इवल्याशा पॉकेट बुक मध्ये मिळालं. स्वामीजींच्या नावानं जो डोक्याला शॉट्ट करुन घेतला त्यावर स्वमीजींनीच उतारा दिला. असो. . साने गुरुजी, विनोबांचे काही निबंध नि विचार आणि अशा महापुरुषांच्या गोष्टी ह्या नाही त्या वयात वाचल्या. निस्ते वाचून न थांबता वाचून सिरियसली घेतल्याने महाप्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. वागणूक विचित्र झालेली नि साइडलाइन झाल्याने होणारा त्रास व इतर वैताग नेमक्या शब्दांत इतरांसमोर मांडता न आल्यानं स्वतःचाच प्रदीर्घ काळ छळ करुन घेतला होता. झेपेल ते झेपेल तसे करावे, नीट समजून घ्यावे; समजत नसेल तर सोडून द्यावे नि चार चौघांसारखे जगायला लाजू नये, गिल्ट तर अजिबात वाटून घेउ नये हे समजायला फार म्हणजे फारच उशीर झाला होता. . . मिपावरच ह्या चिडचिडीवर एका प्रतिसादात भारीच उपाय सुचवलेला :- सॉफ्ट्वेयरचे hotfix वा नविन version येते तसेच विचारांचेही करायचे असते. विचारांच्या मागे "शक्य असेल तेव्हा", " नुकसान होणार नसेल तर ","काहीच फायदा होणार नसेल तर" हे टाकून पहा. शक्य असेल तेव्हा खरे बोलावे. साधे रहावे. काहीच फायदा होणार नसेल तर उगाच भपका कशाला? नुकसान होणार नसेल तर दुसर्‍यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे. . माझ्या रडगाण्यातून थोडा पॉझ घेतोय. अआथवतील तसे त्रागे ह्याच धाग्यावर करीत राहिन. तुम्हालाही ज्यांच्या नावानं बोंब ठोकायची असेल इथे ठोकून घ्या. कसं मोकळं मोकळं वाटेल. वरील सर्वकाही खरं तर माझ्या जालावरच्या खरडी, प्रतिसाद ह्यांचं संकलनच आहे; इतर काही नाही. तूर्तास कामास लागतो. बाय. तोवर तुम्ही तुमच्या चिडचिडीची ह्यात भर घालू शकता. --मनोबा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
16599 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

हम्म्म.

प्रचेतस
Tue, 02/19/2013 - 12:37 नवीन
हम्म्म. हापिसात मिपावरचा ब्यान उठलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Tue, 02/19/2013 - 12:40 नवीन
वैतागवाडी लै आवडली! त्यानिमित्ताने मनोबा लिहिते झाले हे फार झक्कास काम झालं. आज तरी मी वैतागले नाहीये. पण काही झालंच तर हा धागा वाचनखुणेत साठवून ठेवीन म्हणते!
  • Log in or register to post comments

पण ही वैतागवाडीसुद्धा लैच

बॅटमॅन
Tue, 02/19/2013 - 12:47 नवीन
पण ही वैतागवाडीसुद्धा लैच सभ्य, अंतर्मुख वगैरे आहे. इथे कुणाची मारलेली नाहीये उगा. अजून एक वैतागलेल्या माणसाची डायरी आहे ती बहुतेक भडकमकर मास्तराण्णी लिवलीय ती लैच भारी हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

व्यथा

प्रसाद गोडबोले
Tue, 02/19/2013 - 12:52 नवीन
मनोबा , बहुतेक हा त्रागा हा वैताग सर्वच सेन्सेटीव्ह संवेदनशील माणसांची व्यथा असते . जास्त त्रास करुन घेण्यात काही अर्थ नसतो अन आंतर जालावर चर्चा करुन तरी काही खास उत्तर सापडत नाही...सो तुम्ही जे उपाय शेवटच्या पॅरा मधे सांगितलेत त्याला एक अ‍ॅड करत आहे .... जमेल तितुके ... विनेदी चेष्टा मस्करीच्या मुड मध्ये राहण्याचा प्रयत्न करावा . बहुतांश त्राग्याचा गोष्टींमधे "हसावे" अशी एकतरी गोष्ट नक्केच सापडते ... त्यावर मनसोक्त हसावं अन बाकी सगंळ सोडुन द्यावं ....बस्स
  • Log in or register to post comments

+१ अगदी सहमत

चेतन माने
Wed, 02/20/2013 - 11:58 नवीन
काही जणांना हे सहज जमत..... काहींना थोडा वेळ जातो पण उपाय मस्त आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

वैताग! वैताग! आज वैताग दिन

यशोधरा
Tue, 02/19/2013 - 12:52 नवीन
वैताग! वैताग! आज वैताग दिन आहे का? मग सुट्टी कशी काय नै मिळाली आम्हां आयटी हमालांना? एक दिअव्स तरी वैताग दिनाची सुट्टी नको का? असलेल्या सुट्टयाही प्रोजेक्ट्सपायी घेता येत नाहीत हा अजून एक वैताग.
  • Log in or register to post comments

..?

गवि
Tue, 02/19/2013 - 12:54 नवीन
कोल्डारिन ली??
  • Log in or register to post comments

संगीत - गाणे

सहज
Tue, 02/19/2013 - 13:24 नवीन
स्नेहाताईचे सुंदर गाणे - अपसेटवा न मूरा जो भी राँगवा हे उसे सेट राईटवा करो जी फ्रस्टीआओ नही मूरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चिडणे, त्रागा करणे, वैताग

तुमचा अभिषेक
Tue, 02/19/2013 - 13:47 नवीन
चिडणे, त्रागा करणे, वैताग येणे म्हणजे आपण आपल्या आयुष्यापेक्षा जगाला फार गंभीरपणे घेतोय असा अर्थ झाला.. आपण आपले मस्त जगत राहायचे, मनाला हवे तसे.. जर आपल्या वागण्याने इतर कोणाला त्रास होत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्रागा चिडचिड वैताग हे जे काही आहे ते त्यांच्या मनात उत्पन्न होऊ द्या ना.. :)
  • Log in or register to post comments

बास्स.....मनोबा,कसं का होइ ना

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/19/2013 - 13:56 नवीन
बास्स.....मनोबा,कसं का होइ ना, अस्सं मोकळं झालं पाहिजे एकदाच.! ;-)
  • Log in or register to post comments

अरे वा! मज्जा आहे की!

प्यारे१
Tue, 02/19/2013 - 14:10 नवीन
अरे वा! मज्जा आहे की! बरंचसं आदर्शवादी वाटणारं असं आम्ही पण मनात बिंबवतो. त्यामुळं होतं काय की रेल्वे अश्श्शी समोरुन निघून जाते नि आम्ही नंतर स्वतःला श्या देत बसतो. सालं अलिकडं पण नाय नि पलिकडं पण नाय! मधल्या मध्येच लटकलेला! ही फेज पण मजा करायची असते रे मनोबा! वेन्जॉय!
  • Log in or register to post comments

@ धन्या

मी-सौरभ
Tue, 02/19/2013 - 14:17 नवीन
बघ जरा तुझ्या मित्राला काय झालय?? बस त्याला घेऊन; वैताग कमी होईल कदाचित त्याचा. (ढिसः या प्रक्रियेत तुझा वैताग वाढला तर त्याला मंड्ळ जबाबदार राहणार नाही)
  • Log in or register to post comments

दुसर्‍याचे अज्ञान...

राही
Tue, 02/19/2013 - 14:26 नवीन
दुसर्‍याचे अज्ञान हे आपल्या स्वतःच्या दु:खाचे कारण होऊ देऊ नये असे वचन आहे.
  • Log in or register to post comments

उर्वरित त्रागा भाग१ ...शाळा

मन१
Tue, 02/19/2013 - 16:37 नवीन
"मुलींची शाळा", "मुलांची शा़ळा" ...ई ई ई ई ई....यक्क्क्क......... अशा सेपरेट शाळा काढणं हा राष्ट्रिय गुन्हा म्हणून जाहिर करायला हवा. त्याच्यानं पर्सन्यालिटी प्रॉब्लेम होतो. . शाळा एकत्रित ठेवली तर पोरं मोठी झाल्यावर बावचळल्यासारखं करायची किंवा उचकल्यासरखं किंवा हपापल्यासारखं करायची शक्यता कमी होते. मला अजूनही कमी परिचित स्त्रियांशी बोलताना गोंधळल्यासारखं होतं. कळतं पण वळत नाही.म्हणजे समजा अगदि ग्रुप जमलाय कींवा कट्टा सुरु आहे; तेव्हाही अगदि शेजारी येउन , नाव घेउन कुणी स्पष्ट प्रश्न विचारला तरच मी उत्तर देतो. उत्तरही जेवढ्यस तेवढे असते. बोलायचे टाळतो. विनाकारण कॉन्शिअस होतो. नक्की काय होते सांगता येत नाही. जीभ ,मान आक्रसते. मी मनानेही आकुंचित पावतो. मनातल्या मनात कोपर्‍यात जाउन बसतो. अन्यथा ग्रुप मध्ये बसलो आहोत, सगळे बोल्ताहेत असे चित्र असेल तर त्या चित्रातील गप्प बसलेला तो प्राणी मीच असतो. बर्‍यापैकी आता ग्रुप असताना आजही कमी परिचित स्त्रियांबद्दल माझा reflex हा असाच आहे. मला मिक्सअप होण्यास भयंकर वेळ लागतो. कधी कधी अनंत वेळ घेतला तरी मी मिक्स अप होउच शकत नाही. हा मी असा आहे हे मला ठाउक असतानाही मुळात माझ्या मागे कुणी लागूच कसं शकतं हे आजवर मला समजलेलं नाही. अर्थात भारतात मला माझ्यासारखेच शतमूर्ख सहस्रसंख्येने सापडले. आपण एकटे नाहित ह्या कल्पनेने सुखावलो. . म्हणूनच "शेपरेट शाळा हा राष्ट्रिय गुन्हा" आहे. . टू द टॉप ऑफ धिस आय सरप्राइझ अबाउट वन थिंग . आमची "भावी ही" आहे. तिला हे असं आहे हे सगळं सगळं ठाउक आहे. तिला हा चक्क प्लस पॉइंट वाटतो.मध्यमवर्गीय चष्म्यातून हा बावचळलेपणा म्हणे सभ्यतेचा पुरावा आहे! . इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला माझी प्रोजेक्ट मेट घरी वगैरे यायची.(प्रोजेक्ट टीम मी निवडली नव्हती. HOD ने सिलेक्ट करुन दिली होती. माझी मुलींना एकदम चक्क "माझ्या सोबत प्रोजेक्ट करणार का" इतका भयंकर चावट, लज्जास्पद, अश्लील वगैरे प्रश्न थेट विचारायची हिम्मत नव्हती.) तर ती यायची तेव्हाही घरचे(त्यातही स्त्रीसदस्य) विनाकारणच उगीचच सलगीनं वागायचे. "आम्हाला चाल्तं हो. आम्हीही तसे फार मागासलेले वगैरे नाही. मोकळ्या विचारांचे आहोत." असं उगीच अधून मधून आडून आडून सात सांगत वैताग आणायचे. त्यांच्या ह्या सांगण्यामुळं ते खरोखर तसे नाहित; त्यांना फक्त तसे दाखवायचे आहे आणि तेसुद्धा तसेच अवघडल्यासारखे आहेत ह्यावर शिक्कामोर्तब व्हायचे. . ह्या परिस्थितीत वढल्यानं परवापरवापर्यंत पार वाट लागलेली होती. जसाजसा सोशल मिक्स अप झाला तसा निखळपणे दंगा करता आला. हा असाच आधीची वीस बावीस वर्षे नि:संकोचपणे करता आला असता हे समजलं. . बादवे, मी स्वभावाने "शांत"नाही. एखादा मुद्दा मिळाला तर त्याबद्दल मी बिनदिक्कत काहीहे पिंका टाकित सुटतो. किंवा अमुक विषयाची माहिग्ती व्हावी म्हणून शंका वगैरेही विचारतो. प्रॉब्लेम कधी होतो? प्रॉब्लेम माझा तेव्हा होतो जेव्हा इकडचं तिकडचं बोलायचं असतं. मुद्द्यांशिवाय सहज, गप्पाटाप्पा करायच्या असतात. हां तेव्हा मात्र आख्खा कोराच असतो. ब्लँक. ह्या सर्व गोष्टीचं १००% खापार शाळेवर जात नाही; पण त्याचाही काही प्रमाणात तरी महत्वाचा सहभाग आहेच. . मला आठवतय तसं वय वर्षे बावीसएक होइपर्यंत मी औरंगाबाद शहराच्या धड पुरेसं बाहेरच पडलेलो नाही काही कारणाने.वय वर्षे तेवीसपासून मी नॉर्मल लोकांना भेटलो. त्यामुळं बौद्धिक वय अजूनही पाचेक वर्षेच आहे. घर ते शाळा इतकच करायचो. शाळेनंतर फार तर इकडं तिकडं फिरणं आणी धडपडणं व्हायचं, त्यातही एकटाच असायचो. कधी कधी ग्रुप असायचा. पण मी अशा एखाद्या ग्रुपमध्येही एकटाच असायचो. i may not be unique. but i was alone. . मला प्रॉब्लेम ice breakingचा आहे. मला ते चटकन करता येत नाही. विशेषतः in person भेटित. त्यातही ग्रुपमध्ये भेटत असेन तर नक्कीच.एकदा एवढे ice breaking झाले की मग काहिच नाही. . . जालवरती चक्क स्त्री आयडी "monogamy is a myth" ह्या धर्तीवर बोलूच कसं शकतात? (भारतीय) स्त्री त्यात पुन्हा विवाहित असून मद्यप्राशन करुच कसं शकतात? पुन्हा ते गपगुमान न करता वर तोंड करुन साम्गायला काहिच न वाटणे ह्या गोष्टींमुळे मला दचकायला होतं.(व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे ठीक आहे; पण वातावरण्/संस्कार वगैरे नावाखाली एक प्रोग्रामिंग आहे; ते मानगुटीवरून उतरत नाही.)
  • Log in or register to post comments

हम्म

पैसा
Tue, 02/19/2013 - 17:11 नवीन
हा जास्त प्रॉब्लेम व्यक्तिमत्त्वाचा आहे असं वाटलं. म्हणजे एखादा अंतर्मुख स्वभावाचा असतो, एखादा बहिर्मुख. शाळा फक्त मुलांची असल्याने थोडा फरक जास्त पडला असं असेल. पण १००% तेच कारण असं नाही वाटत. पण आता हे सगळं लिहिलंस की तू. हीच बदलाची सुरुवात आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

मला प्रॉब्लेम ice breakingचा

प्रसाद१९७१
Wed, 02/20/2013 - 17:06 नवीन
मला प्रॉब्लेम ice breakingचा आहे. मला ते चटकन करता येत नाही.>>> तुम्ही आधी ह्या Internet चा नाद सोडा. एकदम outgoing होऊन जाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

चला> मनोबा सुसाट सुटले.

स्पंदना
Tue, 02/19/2013 - 17:20 नवीन
चला> मनोबा सुसाट सुटले. छान वाटला हा वैताग. म्हणजे अस की कुठेतरी बोलावस वाटत पण कस बोलाव हा प्रश्न पडतो. निदान हा प्रश्नतरी सुटला नाही का मनोबा? हे बघ दुसर्‍याने कसं वागावं हे आपण ठरवु शकत नाही तेंव्हा सोडुन द्यायचं, स्वतःपुरत एक वर्तुळ आखायचं अन त्यात मस्त गिरक्या घ्यायच्या. मग अधुन मधुन त्या बाहेर येउन जगाकडे पहायच अन आपल वर्तुळ सुरक्षित आहे ना याची खात्री करायची. पुन्हा वर्तुळ!
  • Log in or register to post comments

+११११११११११११११.

बॅटमॅन
Tue, 02/19/2013 - 18:01 नवीन
+११११११११११११११. "काही गल्बला काही निवळ | ऐसा कंठीत जावा काळ |" -समर्थ रामदास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

वॉव....

मन१
Tue, 02/19/2013 - 19:08 नवीन
दुसरा परिच्छेद(त्यातही शेवटचं वाक्य) अगदि साधा, आचरणीय आणि काही प्रमाणात श्वास घेण्यास मदत करणारा. मी आता मोठ्या आकारात घरामध्ये लावतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

मनोबा, तुम्ही चष्मा घालता ना

५० फक्त
Tue, 02/19/2013 - 18:39 नवीन
मनोबा, तुम्ही चष्मा घालता ना ? मग तो काढुन ठेवा अन कुंडलिकाला रिव्हर राफ्टिंग करायला जा, दोन तास लई मज्जा. सगळे वैताग धुवुन जातात.
  • Log in or register to post comments

+१

प्रसाद गोडबोले
Tue, 02/19/2013 - 18:55 नवीन
कुंडलिकाला रिव्हर राफ्टिंग करा>>>>हा जबरदस्त उपाय आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

दुसरीकडचा प्रतिसाद चोप्य पस्ते करत आहे

नितिन थत्ते
Tue, 02/19/2013 - 19:01 नवीन
धाग्याचा एकूण सूर पटला नाही.... आमच्या आई-वडिलांनी सिनेमा पहायचे, दागिने घेण्याचे टाळल्यामुळे आम्हाला शिक्षणासाठी पैसे कमी पडले नाहीत* असे वाटते. ते आदर्श पाळण्यासाठी साधे रहात होते असे वाटत नाही. तेव्हाच्या त्यांच्या वैयक्तिक आर्थिक परिस्थितीचा तो परिणाम होता. (ऑन द अदर हॅण्ड, आमचे अनेक नातेवाईक गडगंज श्रीमंत असूनसुद्धा साधेपणाने (दळिद्री पद्धतीने) रहात त्याचे कारण ते साधेपणाचा आदर्श मानीत होते हे नसून त्याकाळी तसेच राहण्याची पद्धत आमच्या समाजात (साने गुरुजी, टिळक, आगरकर यांच्या कैक आधीपासून) होती. *त्यांच्या तशा राहणीमुळे आमच्या पिढीची व्हिजन तशी मर्यादित राहिली हे काहीसे खरे आहे. व्हिजन म्हणजे इंजिनिअर होऊन कंपनीत चिकटणे इतकीच मर्यादित होती. म्यानेजर/व्हाइस प्रेसिडेंट/सीईओ व्हायची व्हिजन आमच्यात त्यांनी रुजवली नाही हे खरे आहे. पण त्याबद्दल त्यांना दोष देणे मला पटत नाही. अवांतर: कोएड शाळेत शिकूनही मुलींशी वागण्याचे बाबतीत आम्ही मनोबांसारखेच होतो.
  • Log in or register to post comments

च्यायला...

धन्या
Tue, 02/19/2013 - 19:46 नवीन
आज सकाळी चहा घेताना उगाच किल्ली दिली तुला. असो. समोरासमोर बोलण्याचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे उद्या सकाळी बोलूच. तोपर्यंत तुझ्या सीआरार रेटींगची काशी करणार्‍याच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहा आणि रागाचा निचरा होऊ दे. :)
  • Log in or register to post comments

सीआरार रेटींगची काशी

जातवेद
गुरुवार, 02/21/2013 - 21:29 नवीन
सीआरार रेटींगची काशी
निदान ईकडेतरी याच्या गप्पा(?) नकोत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

चिडचिड समजु शकतो !

अग्निकोल्हा
Tue, 02/19/2013 - 23:01 नवीन
साधारण अर्धदशकभरापुर्वी एक मजेशीर ब्लॉग-पोस्ट वाचला होता "वॉल्ट डिस्ने रुइन्ड माय लाइफ" त्याची आठवण झाली. "बिग ब्रदर इज नॉट वॉचिंग यु" ज्याच नडलं तो सोडुन कोणाचं घंटा अडलेल नाही तुमच्या कामगिरीच मुल्यमापन करुन तुम्हाला त्याचे तसे रिटर्न्स (आज्/उद्या/ अथवा नेक्स्ट लाइफमधे) भोगावे लागतील.... बिंधास्त रहा यार. हॅव फन.
  • Log in or register to post comments

.. आणि बोळा निघाला एकदाचा ..

अस्वस्थामा
Wed, 02/20/2013 - 00:49 नवीन
.. आणि बोळा निघाला एकदाचा .. अगदी मनातलं लिहिलयस मन-भौ. इथे त्रागा चीड चीड मुख्यतः ज्या गोष्टींना आदर्शवत मानून चाललोय त्यांच्यामुळे झालेला भ्रमनिरास (साध्या शब्दात 'चुतिया' बनल्याची भावना!) यामुळे आहे असं वाटतं. आणि आपल्यातले बरेच जण त्यांच्या त्यांच्या वेळेस यातून गेलेत असही वाटतंय.. फरक कुणी औरंगाबादेत तर कोणी साताऱ्यात किंवा सोलापुरात .. यासंदर्भात आमच्या एका मित्राने एक वाक्य ऐकवलं होतं, 'आयुष्यात एक वेळ अशी येते की निष्पापपणा (innocence) हा cute न राहता मूर्खपणा ठरू लागतो, आपल्या आयुष्यातली ती वेळ आपण ओळखण्यात शहाणपणा आहे.. जे लोक त्यांच्या गोग्गोड प्रतिमेस जपायचा प्रयत्न करतात त्याचं बहुतेकदा हसंच होतं.' (बराचसा समदुःखी)
  • Log in or register to post comments

मस्त !

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/20/2013 - 12:04 नवीन
आधी दुसरीकडे वाचला होता, पण पुन्हा वाचताना तेवढीच मजा आली.
  • Log in or register to post comments

उर्वरित त्रागा भाग३ :- संपादक मंडळ

मन१
Wed, 02/20/2013 - 13:25 नवीन
सालं संपादक झालो तरी संपादकपदाची कामं करायला छटाकभरही टैम काढणं ह्या जन्मात जमणार नाही. पण "संपादक हो म्हणून म्हणत होते. पण मीच नको म्हटलं " असं जाहिर कट्ट्यावर मानभावीपणे म्हणायची संधी मिळण्यासठी काय करावं लागतं? नक्की कोणती अ‍ॅप्टी क्लिअर केली की इथे संपादक्/निरिक्षक आणि अजून मोठ्ठ्या पदव्या मिळतात? संतुलित पणाचा किती आव मी आणून दाखवला म्हणजे मला आमंत्रित करतील? सम्जा एखाद्या तावातावाच्या काथ्याकुटात "तुम्हाला शतमूर्ख त्याने जाहिर धाग्यावर म्हणावयास नको होते. आम्ही त्याच्याशी सहमत असलो तरी तुम्हाला तसे म्हणणार नाही"(!!??) असे किती गोल्-गोल , संतुलित प्रतिसाद देउन दाखवले तर मला हे ह्यांच्यासारखाच खरोखरिच सभ्य, मॅच्युअर्ड समजतील? हे गंडलेले आहेत की इतरांना गंडवताहेत ? ;) . हे संतुलित लोक मनातल्या मनातही संतुलित असतात का? कुणी राँग साइड येउन ह्यांना रस्त्यावर धडकला तरी हे "अहो असे करु नका. असे करणे इष्ट नाही." अशा समजुतीत बोलत असतील का? मनातल्या मनातसुद्धा "थोबाड फोडलं पाहिजे ***च्याचं " असं हे कधीच म्हणत नसतील का? तसं असेल तर नक्की कोणती तपःसाधना हे महात्मे आणि महात्मीणी करतात? . इथं अपेयपानाचं नाव कढलं की उकळ्या फुटणारे अनेकजण आहेत. नक्की साल्यांना परवडतेच कशी? की हे नेहमी फुकटातली पितात नि त्याच्या कॉकटेल्सच्या पाकृ टाकीत राहतात? ह्यांना डाउनपेमेंटचं आणि फ्लॅटच्या हप्त्यांचं टेन्शन नसतं का? सुखी माणसाचा सदरा ह्यांना भेटलं तर मिळू शकतो का? "पिणार्‍यला पोरगी देत नाहित हं चांगल्या घरचे" असं ह्यांना पुनः पुनः सांगून घरच्यांनी कधीच टारकावलं नसेल का? ह्या स्थितीत मनावर ते कसा विजय मिळवू शकतात? हे लोक साने गुर्जींना शिरिअसली घेत नाहित का?
  • Log in or register to post comments

पिणार्‍यला पोरगी देत नाहित हं

बॅटमॅन
Wed, 02/20/2013 - 13:28 नवीन
पिणार्‍यला पोरगी देत नाहित हं चांगल्या घरचे" असं ह्यांना पुनः पुनः सांगून घरच्यांनी कधीच टारकावलं नसेल का? ह्या स्थितीत मनावर ते कसा विजय मिळवू शकतात? हे लोक साने गुर्जींना शिरिअसली घेत नाहित का? अधोरेखित प्रश्न वाचून डॉळे पाणावले एकदम. सीदंति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यते, वगैरे वगैरे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

ओक्के!

पैसा
Wed, 02/20/2013 - 14:59 नवीन
आता तुझ्या वैतागाचं खरं कारण कळलं!:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

ओह... असं आहे का..? आय सी.

गवि
Wed, 02/20/2013 - 17:02 नवीन
ओह... असं आहे का..? आय सी. आलं लक्षात... हम्म.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काल एका क्षुल्लक कारणावरुन

शुचि
गुरुवार, 02/21/2013 - 01:15 नवीन
काल एका क्षुल्लक कारणावरुन माझ्या अपार्ट्मेंट्च्या मॅनेजरवर चिडले. त्रागा केला. आज जाऊन "सॉरी" म्हटलं ती अगदी सहजतेने म्हणाली "दॅट्स ऑलराइट. इट इझ लाइफ. मला वाईट वाटले.
  • Log in or register to post comments

वाईट वाटुन घेऊ नका हो

अर्धवटराव
गुरुवार, 02/21/2013 - 01:46 नवीन
तुम्ही तिला तडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला ना? आता थोडं कमि पडला शाब्दीक दट्ट्या... त्याचं एव्हढं वाईट वाटुन घेऊ नका. पुढल्या खेपेला एक मस्त का.कु. टाका मिपावर... मॅनेजरला कसं झापावं या नावाने... आणि मग पूर्ण तयारीनिशी जा. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

या वेळेला इंटर्व्ह्यू ला

शुचि
गुरुवार, 02/21/2013 - 01:52 नवीन
या वेळेला इंटर्व्ह्यू ला प्रश्न होता - हाऊ डू यु हँडल कॉन्फ्लिक्ट? अजिबात उत्तर देता आले नाही :( काहीतरी बावचळल्यासारखं उत्तर दिलं. खरं तर एक काकु टाकायचा आहे की मिपाकर कॉन्फ्लिक्टला कसे सामोरे जातात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मेलोय. ठार झालोय.

मन१
Fri, 02/22/2013 - 16:08 नवीन
आता सिरियसली मेलोय. ठार झालोय. होम लोनसाठी बेंक अधिकार्‍याने तोंडी सांगितलेला आकडा गृहित धरुन फ्लॅट बुक केला होता. डाउन पेमेंट नि अग्रीमेंटही झालं. आता loan eligibility(कर्ज पात्रता?) मी समजलो त्याच्या वीस टक्के कमी निघालिये. आता घ्या पर्सनल लोन आणि अडका कर्जाच्या सायकल मध्ये. . बहुतांश बँकांचा हाच दर असणार आहे. मला कुणी NBFC(non banking financial instituitions) सुचवू शकाल का? त्या अधिक लोन देतात म्हणे. काही nbfc म्हणजे महिंद्र फायनान्स्,चोलामंडलम, इंडिया बुल्स. असे अजून कुणाला ठाउक असतील तर सांगा. काम सोपं होइल. नाहीतर तीर्थरुप नामक डिफॉल्ट बँकर निसर्गाने दिलेलाच आहे. पण आजवर तरी तिकडे जाण्याची पाळी आलेली नाही ग्रॅज्युएशनला लागल्यापासून. आता गेलो तर इतकी वर्ष जपलेला आख्खा तोरा उतरेल एका झटक्यात. . घर विकण्याचा मला अनुभव नाही. घर विकणारे एखादे विश्वासाचे वकील वगैरे असतील तर त्यांचा नम्बर द्या. फार ताण घेण्यापेक्षा घर काढून मोकळा होइन म्हणतो. . मनोबा, कधी होणार तुम्ही मॅच्युअर?
  • Log in or register to post comments

छ्या!

पैसा
Fri, 02/22/2013 - 16:20 नवीन
घराच्या किमतीच्या ८५% आणि तुमच्या पगाराच्या ६०% पर्यंत हप्ता बसेल असे कर्ज मिळते. वडिलांकडून थेट पैसे घ्यायला नकोत. त्यांनी सह कर्जदार म्हणून सह्या केल्या तर पुरे. त्यांचे उत्पन्न्+तुझे उत्प्न्न एकत्र धरून त्याच्या ६०% ही एलिजिबिलिटी असते. काय रडताय राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

नको नको

अभ्या..
Fri, 02/22/2013 - 16:29 नवीन
पैसे मिळण्याचे काही नाही हो. वडीलांकडे असे मागायलाच जायला नको वाटते (सहीपण). जास्त फाटे फुटतात हे आणि त्यावरची चर्चा हे माझ्या त्राग्याचे पण कारण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हात तुमची!

पैसा
Fri, 02/22/2013 - 16:34 नवीन
मी घर घेतलं तेव्हा आधी लग्न केलेलं होतं त्यामुळे हमी देणार्‍याचा प्रश्न आला नाही. आता आधी लग्न करा. म्हणजे तो ही प्रश्न सुटून जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर.

५० फक्त
Sat, 02/23/2013 - 09:55 नवीन
म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काही कारणामुळे

मन१
Fri, 02/22/2013 - 16:34 नवीन
काही कारणामुळे वडील हा ऑप्शन बाद आहे. सहकर्जदार म्हणूनही. रिलायन्स किंवा महिन्द्रा(जे अधिक लोन देतील, अधिक व्याजदर लावतील) असे फायनान्सर आता शोधतोय. बघूयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

दुसरा उपाय

पैसा
Fri, 02/22/2013 - 16:36 नवीन
पर्सनल लोन काढण्यापेक्षा बचतपत्रे, बँक फिक्स्ड डिपॉझिट, एल आय सी पॉलिसी अशा काही तरी तारणावर कर्ज घ्यावे. व्याजदर कमी लागतो. खाजगी वित्तसंस्थांपेक्षा एल आय सी कधीही बरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

धन्यवाद

अभ्या..
Fri, 02/22/2013 - 16:42 नवीन
बँकेत असणारेच पालक, त्यांचे पर्याय आणि अर्थातच त्याला एलिजिबल नसल्याने दुसरेच मार्ग हुडकणारी आमची पिढी हा त्रागा इथेच व्यक्त करुन निरोप घेतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

व्हॉट्ट???

मन१
Fri, 02/22/2013 - 16:45 नवीन
are you my alter ego? am i suffering through multiple personality disorder? how do you come to know everything???????????????!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जाऊ द्या ओ मनोबा. लागते कशी

अभ्या..
Fri, 02/22/2013 - 16:52 नवीन
:( जाऊ द्या ओ मनोबा. लागते कशी तरी नैय्या पार. थोड्या वर्षाने तोच त्रागा रिपीट करायचाय. रोल रिव्हर्सल होइल इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

उफ्फ

प्रसाद गोडबोले
Fri, 02/22/2013 - 16:45 नवीन
सेम प्रॉब्लेम मला आला होता. :( loan eligibility = कर्ज पात्रता हेच होय पण LTV = loan to value ratio ८०% आहे अर्थात जितकं काही लोन ठरवाल त्याच्या २०% तुम्हाला भराव्हेच लागतील ( एस्बीआय / एलायसी हौ.फायनास्न्स मधे हे फक्त १० % आहे म्हणे ...चौकशी करुन पहा ) गोल्डलोन हा परवडेबल पर्याय उपलब्ध्द आहे . पी एफ विड्रॉल जमतय का पहा . लॉन्ग टर्म एफ डी असेल तर त्यावर बर्‍याचश्या बॅन्का ९०% ओडी देतात आजकाल . एकदा बुक केलेले घर विकु नका . ( सध्या रीयल थंड आहे पण एकदा गोल्ड इम्पोर्ट्वर निर्बंध आले ह्या बजेट नंतर की लोक परत रीयल इस्टेट मधे गुंतवणुक सुरु करणार... पर्यायाने रीयल इस्टेट परत बुम मधे येणार..रेट्स वाढणार.. आसा अंदाज आहे आमचा ) आणि सर्वात महत्वाचे... पर्सनल लोन् शक्यतो टाळा . (पर्सनल लोनचे व्याज आपल्या तोर्‍यापेक्षा खुप जास्त असते हो ...डिफॉल्ट ब्यॅन्कर कडे जाणे कधीही परवडते पर्सनल लोनपेक्षा) (मीही नुकतेच घर घेतले आहे सेम प्रॉब्लेम्स मलाही आले होते ...कोणी तरी समदुख्खी दिसले म्हणुन बोललो. क्षमा केली पाहिजे . )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

सहमत!

दादा कोंडके
Sat, 02/23/2013 - 17:02 नवीन
वडिलांकडून पैसे घेउ नका. हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. पिएफवर वगैरे कर्ज मिळेलच किंवा काढून घ्या. कंपनीत चौकशी करून बघा. खूप कंपन्यांत नाममात्र व्याजावर पैसे देतात. पर्सनल लोन आजिबात काढू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मनोबा,

प्यारे१
Fri, 02/22/2013 - 18:50 नवीन
मनोबा, मला वाटतंय की तू तुझ्या फारच वैयक्तिक गोष्टी एका मोठ्या पब्लिक फोरम समोर ठेवतो आहेस. जास्त टेन्शन नको घेऊ रे भावा! सगळ्यांचं बरंचसं असंच असतं. टेक अ चिल पिल का काय ते!
  • Log in or register to post comments

आता तुम्ही आणताच आहात

५० फक्त
Sat, 02/23/2013 - 10:04 नवीन
आता तुम्ही आणताच आहात वैयक्तिक गोष्टी पब्लिक फोरमवर तर घ्या हे सल्ले / टिका. आता गेलो तर इतकी वर्ष जपलेला आख्खा तोरा उतरेल एका झटक्यात. - कसला तोरा जपलाय तुम्ही ओ इतकी वर्षे, कधी झालं तुमचं ग्रज्युएशन, कधी लिगली किंवा इलिगली झाला आहात का एखाद्या लेकराचे बाप, किमान द्त्तक घेउन तरी, (हा असा तोरा एका झटक्यात अगदी याच कारणासाठी उतरलेला एक इथलाच आयडी माहित आहे मला, तुमचाही परिचय आहे त्याच्याशी, एकदा बोलुन बघा त्याच्याशी) बाप ही गोष्टच अशी आहे की जेंव्हा आख्खी दुनिया तुमचा जीव घ्यायचा विचार करत असते तेव्हा हा बापच तुमच्या आणि दुनियेच्या मध्ये उभा असतो, या सध्याच्या पिढीचा हा सार्वत्रिक इश्यु आहे, ज्या व्यक्तिनं आपल्याला जन्म दिला, मोठं केलं, आपले लाड पुरवले, ज्या शिक्षणाच्या जोरावर आपण त्याच्या आख्ख्या हयातीच्या कमाईपेक्षा जास्त पैसे चार सहा वर्षात कमवतोय त्याच्या या सग़ळ्या उपकारांना विसरुन कृतघ्नता दाखवायची. मा.संपाद्क मंडळ, सदर प्रतिसाद धागाकर्त्याला अथवा आपणांस फार वैयक्तिक वगैरे वाटला तर उडवला जावा ही नम्र विनंती. तसेच हा प्रतिसाद न उडाल्यास त्यात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे, धागाकर्त्यावर बंधनकारक नाही.
  • Log in or register to post comments

मनोबा

स्पा
Sat, 02/23/2013 - 10:13 नवीन
मनोबा द आय टी हुचः चालू द्या
  • Log in or register to post comments

एकदम सहमत

सुबोध खरे
Sat, 02/23/2013 - 10:19 नवीन
बापासमोर कसला आलाय तोरा?पन्नाशी जवळ आली आणि दोन कॉलेज ला जाणारया पोरांचा बाप असून आजही मानसिक आधारासाठी मि माझ्या बापावर अवलंबून आहे आयुष्याच्या अशा टप्प्यावर मी उभा होतो कि सर्व दुनियेने पाठ फिरवली असताना फक्त माझा बाप माझ्या पाठीशी उभा राहिला होता.निस्संकोचपणे बापाला आपले प्रश्न सांगा.उद्या माझी मुले अस प्रश्न घेऊन आली तर मी कोणताही संकोच न करता त्यांच्या पाठीशी उभा राहीन. (पितृ ॠण फेडणे हे असेच असते असे ऐकले आहे)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा