हा धागा मी का लिहितोय ?
कटकट करुन फार थकलोय. चिडचिड करायचाही स्टॅमिना संपलाय. अगदि लहान लहान गोष्टींत चिडचिड करायची पूर्वीपासून सवय. एक बस सुटली ऑफिसची नि ५ मिनिटं वाट पहावी लागली, कर चिडचिड. बॉसनं येताना सगळ्यांना शेकहँड केलं गुड मॉर्निंग म्हणत, मला सोडलं, कर चिडचिड. तिचं नाव ठाउक नाही, पण रोज येउन ओळखीची स्माइल देते, आज एकदम अनोळखी चेहरा करुन चाल्ली गेली, कर चिडचिड.
पक्यानं आज पुन्हा फुकटात चहा पिला माझ्याकडून नि पुन्हा वर निर्ढावल्यासारखा फुक्टात सुट्टा मारुन गेला; बोंबल त्याच्या नावानं.(तरी त्याला स्वतःहून बोलावून चहा पाजायचं सोडू नकोस. किंवा त्यानी बोलावल्यावर लागलिच जायची सवय मोडू नकोस.)
धाग्याला प्रतिसाद नाही मिळाले, होउन बस खट्टू. बसम्ध्ये शेजारी जाड्या येउन बसला नि माझ्याही सीटचा ८०% भाग त्यानं व्यापला, करुन घे वैताग.
.
चीननं ग्वादार बंदर घेतलं, बांधलं ; घे टेन्शन. युरो कोसळणार, डॉलर कडाडणार असं ऐकलं, कर चिंता. डॉलराऐवजी रुपया कडाडला(नि डॉलर पडला!) अजूनच घाबर. कंपनीचा नफा कमी झाला हो. पैसा कमी मिळणार हो. अशी बोंब मारणं कर सुरु.
.
पाकड्यांची अण्वस्त्रं माथेफिरुंच्या हाती जाण्याचं ऐकलं कर त्रागा. जगातलं पेट्रोल एक न एक दिवस संपणार आहे हे पुन्हा जाणवलं, घे घाबरगुंडी उडवून स्वतःची. "अरे बाप रे , आभाळ कोसळणार, आता कसं होणार" हाच ह्या सगळ्यात आमचा टोन.
.
बस आता. हे जगाचं टेन्शन सोसवत नाही. "सारी दुनिया का बोझ मेरे ही कमजोर खंदो पे है" असं वाटून घेणं सोडीन म्हणतो. जsssरा मोकळ्या मनानं श्वास घ्यावा. मनापासून आवडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींना दाद देउन पहावी. पण आधी एकदा सगळा त्रागा लिहूनच काढायची तीव्र इच्छा आहे. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या धाग्यांवर तोच तो वैताग डोकावयास नको.
.
.
समाजवादी आत्मताडन नि मन मारुन जगणे
पूर्वी ऊठसूट स्वच्छ चारित्र्यवाल्या जुन्या नेत्यांबद्दल, नि त्यांच्या उच्च मूल्य, साधी राहणी, परोपकार , निष्ठा, वगैरेबद्दल वर्तमानपत्रात वाचायचो आणि आपल्याला किती वाईट काळात रहावं लागतय त्याबद्दल हळहळायचो. आजही मराठी वृत्तप्त्रांतातील स्तंभलेखनात जुन्या काळच्या समाजवाद्यांचा प्रभाव आहेच. विनोबा भावे,साने गुरुजी,तर कधी नानाजी देशमुख, कधी राममनोहर लोहिया, एसेम, मृणाल गोरे किंवा उच्च मूल्ये जपणारे , अभ्यस्त असणारे आणि प्रागतिक विचाराअंचे म्हणून यशवंतराव चव्हाण अशी नावं पब्लिक घेते.
मुळात ह्या सर्वांचा जेव्हा तथाकथित कर्तबागारीचा सुवर्णकाळ सुरु होता, तेव्हा भारत कुठे होता?
ह्यांनी त्यात काय भर घातली? आज जे भिकारचोट, अप्पलपोटे आणि ढेर्या तुडुंब भरल्या तरी ढेकरही न देणारे असे जे नेते म्हणवले जातात,हे त्यांचीच सेकंड जनरेशन फळी आहेत ना? ह्या आज गणंग वाटणार्यांना त्यांनीच वर आणले/येउ दिले का?
की ह्यांना ते थांबवायचे होते पण काळाच प्रवाह अडवण्यात हे माझ्याइतकेच दुर्बळ, हीन दीन दुबळे ठरले?
म्हणजे चांगली वर्तणूक असणरे सज्जन पण दुर्बळ अशीच ही माणसे का?
.
सगळ्या भल्या म्हणवल्या जाणारे लोक नेहमी कांदा भाकरीच का खातात? चांगलं खाण्यावर असे ते खार खाउन का असतात?(स्पेशली विनोबा भावे).चांगलं खाउनपिउन समाजसेवा करता येत नाही का?
विनोबा भावे आणि गांधी ह्यांच्या "भलेपणानी वागा", "चांगला माणूस बना" असल्या कै च्या कैच उपदेशाला सिरियसली घेतल्यानं आम्ही किती खड्ड्यात गेलोय हे ह्यांना माहितीये का?
माझ्या खड्ड्यात जाण्याची हे जिम्मेदारी घेतात का?
चांगलं खाउनपिउन समाजसेवा करता येत नाही का?
समाजासाठी आप्लं घर स्वाहा करतो म्हणजेच फार काही मोठ्ठं करतो असं काही आहे का?
सुखासुखी राहणं हा मोठ्ठा गुन्हा आहे का? "हे साले पांढरपेशे", "स्वतःपुरतं पाहणारे" असं म्हणत नेहमी आम्हाला आमच्या जगण्याची लाज वातून द्यायचा हा वृत्तपत्रवाल्यांचा का प्रयत्न असतो?
.
विनोबाजींचे बहुतांश लिखाण हे उपदेशात्मक असते त्यामुळेच कधी कधी थोडेसे वाचून झाले की कंटाळवाणे नि पकाउ वाटते. उदात्त, पारंपरिक भारतीय विचार वगैरे त्यातून डोकावत राहतात.त्यांच्या टाइपच्या पुढील वाक्यांमुळे मला व्यावसायिक व व्यावहारिक जीवनात जबरदस्त आपटी खावी लागली.
खरे बोलावे. साधे रहावे. उगाच भपका कशाला? दुसर्यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे.
उगाच कुणाला वाइट्-साइट बोलू नये.(म्हनजे थोडक्यात सगळी टिंगल टवाळी गायब. गजाल्या गायब. कट्टे गायब्.दोसत कंपनी गाय्ब.) मेहनत करावी. मेहनत केली असेल तर त्याचे श्रेय मिळेलच. श्रेय मुद्दम घेण्याचा प्रयत्न करू नये.आपली चूक कबूल करावी.दुसर्याच्या चुका उगाच प्रकाशझोतात आणू नये.
.
दवणे :-
चित्रपट रसिक म्हणवणार्यांनी "गुंडा" पाहिलं नसेल, वाचक म्हणवणार्यांनी "दवणे" वाचले नसतील तर त्यांनी आयुष्यात खूप मोठ्ठं काही मिस केलय.
.
(सर्व साने गुरुजी फ्यान ची क्षमा मागून) अधिकाधिक बाळबोध, सुगम, सुकर, तथाकथित "संस्कारक्षम" लिहिण्यात साने गुरुजींपेक्षाही दवणे कैकपट पुढे आहेत. ( त्याच्या लिखाणात साधेपण, सात्विकपणा, वागण्यातील शुचिर्भूतता वगैरे वगैरे टिप्पिकल मध्यमवर्गानं over hype करुन ठेवलेल्या संकल्पनांचा भडिमार आहे.)
.
कुणाला शिव्याशाप खरोखर लागत असतील असे वाटत असेल तर माझ्या आयुष्यातील सर्व तळतळाट ह्या बकवास समाजवादी विचारांना लागतील. "साधे रहा. चांगले रहा. भले रहा. (स्वतःची चूक नसताना) थोबाडित खाउन घ्या. स्वतः कष्ट करूनही सुखासमाधानानं जगायची लाज वाटून घ्या. आपल्या कामाचं क्रेडिट घ्यायला संकोच करा नि स्वतःच्या पायावर धोंडा घालून घ्या; स्वतःचा न्याय्य हक्क विसरुन मन मारुन जगा. गुणी बाळ व्हा."
असला बकवास सिरियसली घेतल्यानं माझं लै नुस्कान झालेलय. स्वतःवर विलक्षण अन्याय करायची नि न्यूनगंड बाळगायची , अनावश्यक समाजसेवा (स्वतःचे इतरांमार्फत शोषण होउ देण्यासाठी इतरांना उत्तेजित करण्याची!!) करण्याची मला असल्या कंपूच्या बालपणातील घेरावामुळे लागलेली सवय अजूनही धड गेलेली नाही.
.
थोडक्यात थिल्लरपणाचा विक्रम तो माणूस करतो. ह्या उथळपणात त्याला फक्त चेतन भगतच*टक्कर देउ शकतो.
.
.
*भगत सोशालिस्ट बकवास करतो असे मी म्हणत नाही. पण तो त्याच तोडीचे भंकस्/थिल्लर/सवंग लिखाण करु शकतो असे मला म्हणायचे आहे.
.
स्वामी विवेकानंद :-
"इच्छा असेल तर सद्गुरु मिळतोच" , तथाकथित "सन्मार्गस नि आध्यात्मिक उन्नतीस लागतोच" वगैरे वगैरे स्टाइल काही स्वामीअभ्यासक म्हणवणार्यांनी बिंबवले. आम्ही दिवसेंदिवस इच्छाच करीत बसलो.
नंतर मात्र त्यांचेच इतरही विचार/quotes समजले ते बरे झाले. कष्ट करा. (चक्क भौतिक)उन्नती करुन घ्या. पाश्चात्त्यांच्या चांगल्या गोष्टी( मोकळेपणा, सचोटी, आत्मविश्वास) शिकण्यास संकोचू नका . बंधूभाव जपा. बलशाली व्हा. "तरुणांनो गीता पठण करण्यापेक्षा आधी सशक्त व्हा. भरपूर फुटबॉल खेळा" ह्या धर्तीवरचं बरच काही "स्वामी विवेकानंद म्हणतात" ह्या इवल्याशा पॉकेट बुक मध्ये मिळालं. स्वामीजींच्या नावानं जो डोक्याला शॉट्ट करुन घेतला त्यावर स्वमीजींनीच उतारा दिला.
असो.
.
साने गुरुजी, विनोबांचे काही निबंध नि विचार आणि अशा महापुरुषांच्या गोष्टी ह्या नाही त्या वयात वाचल्या. निस्ते वाचून न थांबता वाचून सिरियसली घेतल्याने महाप्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. वागणूक विचित्र झालेली नि साइडलाइन झाल्याने होणारा त्रास व इतर वैताग नेमक्या शब्दांत इतरांसमोर मांडता न आल्यानं स्वतःचाच प्रदीर्घ काळ छळ करुन घेतला होता. झेपेल ते झेपेल तसे करावे, नीट समजून घ्यावे; समजत नसेल तर सोडून द्यावे नि चार चौघांसारखे जगायला लाजू नये, गिल्ट तर अजिबात वाटून घेउ नये हे समजायला फार म्हणजे फारच उशीर झाला होता.
.
.
मिपावरच ह्या चिडचिडीवर एका प्रतिसादात भारीच उपाय सुचवलेला :-
सॉफ्ट्वेयरचे hotfix वा नविन version येते तसेच विचारांचेही करायचे असते.
विचारांच्या मागे "शक्य असेल तेव्हा", " नुकसान होणार नसेल तर ","काहीच फायदा होणार नसेल तर" हे टाकून पहा.
शक्य असेल तेव्हा खरे बोलावे. साधे रहावे.
काहीच फायदा होणार नसेल तर उगाच भपका कशाला?
नुकसान होणार नसेल तर दुसर्यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे.
.
माझ्या रडगाण्यातून थोडा पॉझ घेतोय.
अआथवतील तसे त्रागे ह्याच धाग्यावर करीत राहिन. तुम्हालाही ज्यांच्या नावानं बोंब ठोकायची असेल इथे ठोकून घ्या. कसं मोकळं मोकळं वाटेल.
वरील सर्वकाही खरं तर माझ्या जालावरच्या खरडी, प्रतिसाद ह्यांचं संकलनच आहे; इतर काही नाही.
तूर्तास कामास लागतो. बाय.
तोवर तुम्ही तुमच्या चिडचिडीची ह्यात भर घालू शकता.
--मनोबा
वाचने
16637
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म्म.
=))
पण ही वैतागवाडीसुद्धा लैच
In reply to =)) by पैसा
व्यथा
+१ अगदी सहमत
In reply to व्यथा by प्रसाद गोडबोले
वैताग! वैताग! आज वैताग दिन
..?
संगीत - गाणे
In reply to ..? by गवि
चिडणे, त्रागा करणे, वैताग
बास्स.....मनोबा,कसं का होइ ना
अरे वा! मज्जा आहे की!
@ धन्या
दुसर्याचे अज्ञान...
उर्वरित त्रागा भाग१ ...शाळा
हम्म
In reply to उर्वरित त्रागा भाग१ ...शाळा by मन१
मला प्रॉब्लेम ice breakingचा
In reply to उर्वरित त्रागा भाग१ ...शाळा by मन१
चला> मनोबा सुसाट सुटले.
+११११११११११११११.
In reply to चला> मनोबा सुसाट सुटले. by स्पंदना
वॉव....
In reply to चला> मनोबा सुसाट सुटले. by स्पंदना
मनोबा, तुम्ही चष्मा घालता ना
+१
In reply to मनोबा, तुम्ही चष्मा घालता ना by ५० फक्त
दुसरीकडचा प्रतिसाद चोप्य पस्ते करत आहे
च्यायला...
सीआरार रेटींगची काशी
In reply to च्यायला... by धन्या
चिडचिड समजु शकतो !
.. आणि बोळा निघाला एकदाचा ..
मस्त !
उर्वरित त्रागा भाग३ :- संपादक मंडळ
पिणार्यला पोरगी देत नाहित हं
In reply to उर्वरित त्रागा भाग३ :- संपादक मंडळ by मन१
ओक्के!
In reply to उर्वरित त्रागा भाग३ :- संपादक मंडळ by मन१
ओह... असं आहे का..? आय सी.
In reply to ओक्के! by पैसा
काल एका क्षुल्लक कारणावरुन
वाईट वाटुन घेऊ नका हो
In reply to काल एका क्षुल्लक कारणावरुन by शुचि
या वेळेला इंटर्व्ह्यू ला
In reply to वाईट वाटुन घेऊ नका हो by अर्धवटराव
मेलोय. ठार झालोय.
छ्या!
In reply to मेलोय. ठार झालोय. by मन१
नको नको
In reply to छ्या! by पैसा
हात तुमची!
In reply to नको नको by अभ्या..
म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर.
In reply to हात तुमची! by पैसा
काही कारणामुळे
In reply to छ्या! by पैसा
दुसरा उपाय
In reply to काही कारणामुळे by मन१
धन्यवाद
In reply to दुसरा उपाय by पैसा
व्हॉट्ट???
In reply to धन्यवाद by अभ्या..
जाऊ द्या ओ मनोबा. लागते कशी
In reply to व्हॉट्ट??? by मन१
उफ्फ
In reply to मेलोय. ठार झालोय. by मन१
सहमत!
In reply to उफ्फ by प्रसाद गोडबोले
मनोबा,
आता तुम्ही आणताच आहात
मनोबा
एकदम सहमत
+१००
In reply to एकदम सहमत by सुबोध खरे
स्वतःच
पन्नास, सुबोधराव आणि राही
हे सर्व फार उपदेशात्मक किंवा
उर्वरित त्रागा भाग ४ : अध्यात्म, मनः शांती आणि ब्रँडिंग....
उर्वरित त्रागा भाग ५ :- भारत आणि भारतीय आणि "महासत्ता" हा टॅग
_/\_
In reply to उर्वरित त्रागा भाग ५ :- भारत आणि भारतीय आणि "महासत्ता" हा टॅग by मन१
हम्म
उर्वरित त्रागा भाग ६ : दळभद्री प्रार्थना नि हिणकस दुबळेपणा..
टोकाचा निराशावाद. सतत