Skip to main content

"शिवराय"

लेखक अनिल तापकीर यांनी मंगळवार, 19/02/2013 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्रासली गांजली जनता, नाही कोणी वाली | तारावा हिंदुधर्म, साकडे देवास घाली | दाही दिशा माजले दैत्य,गिळती महाराष्ट्रासी | झाली मंदिरे जमीनदोस्त,भग्न केले देवांसी | लेकी सुनांच्या अब्रूला,नाही राहिले रक्षण | वतनदारांना तर प्रिय आपलेच वतन | संत महात्म्यांनी केला देवाचा धावा | या धरतीला ताराया अवतार घ्यावा | संतांची गरीब रयतेची, देवास आली दया | म्हणूनच देवांनी पाठविला शिवराया | शिवरायांनी ऐसे अघटीत केले | शून्यातून स्वराज्य उभे राहिले | अफझलचा कोथळा बाहेर काढीला | औरंग्याचा तर माजच जिरवला | आदिलशहा निजामासी जागीच रोखले | इंग्रजांसी मुंबईच्या वखारीतच कोंडले | संतांचे देवालयांचे केले रक्षण | खळ, नि दुर्जांनांचे करुनी निर्दालन | त्रेतायुगी होते जसे रामाचे रामराज्य | कलियुगी आमच्या शिवरायांचे शिवराज्य | जय शिवराय
लेखनविषय:

वाचने 2145
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

खणखणीत रचना. आवडली.

राज्याना मानाचा मुजरा!

या मराठी मातीचा रंगच असा आहे की येथे जन्म घेणार्‍या लेकरास शिवाजी कोन हे कधीच शिकवाव लागत नाही, कारण "शिवाजीमहाराज की..." म्हणुन हाळी दिली की त्या पोराच्या तोंडातुन आपसुकच "जय "म्हणुन बाहेर पडत्,हीच माझ्या राजाची खरी थोरवी आहे.....आजही साडेतीनशे वर्षानंतरही आमचा राजा आमच्या रक्ताच्या कणाकणात आहे,अणुरेणुत आहे.हीच माझ्या राजास माझी मानवंदना....