ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन सध्या भारताच्या दौर्यावर आहेत. मे २०१० मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच केलेल्या भारत दौर्यानंतर अवघ्या २-२.५ वर्षातला हा ब्रिटिश पंतप्रधानांचा दुसरा दौरा. १४० व्यापार आणि उद्योग प्रतिनिधींचे ब्रिटनच्या आजवरच्या इतिहासातले हे सर्वात मोठे व्यापारी शिष्टमंडळ त्यांच्यासोबत आहे. अर्थात, मागच्या प्रमाणे ह्याही दौर्याचा उद्देश उगवती महासत्ता असलेल्या भारताबरोबर व्यापारी संबंध दृढ करुन काही व्यापारी करारमदार करता येतील का ते पाहाणे हाच. ब्रिटनची सध्याची अतिशय नाजूक आणि ढासळती अर्थव्यवस्था, वाढत चाललेले कर्ज, लागोपाठ तिसर्यांदा येऊ घातलेली मंदी ( किंवा जी २००८ पासून कधी दूर गेलीच नाही), वाढती बेरोजगारी या आणि अशा प्रश्नानी त्रस्त होऊन मोठ्या आशेने भारताची वाट श्री कॅमेरॉननी धरली खरी पण गेल्या खेपेप्रमाणे याही वेळेला हाती धुपाटणे येणार अशी चिन्हे दिसतायत.
ह्या दौर्याबद्दल भारतीय माध्यमांत जेवढी उत्सुकता दिसली नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त इंग्लिश माध्यमांत चर्चा चालू असल्याचे वेगळेच चित्र पाहायला मिळतय. अर्थात, भारत-ब्रिटन संबंधातील हे एक नवे पर्व म्हणावे लागेल. अशात, कदाचित भारताच्या खुशामतीची एक संधी म्हणा वा व्यापारी कावा म्हणा वा तद्दन राजकीय खेळी म्हणा, पण कॅमेरॉनच्या या कृतीचे चांगलेच तीव्र पडसाद इथे उमटलेयत आणि त्याचबरोबर एकंदर जागतिक घडामोडीत बदलत्या सत्याची आणि वास्तवाची एक प्रखर जाणीव कदाचित आपल्या माजी शासक राष्ट्राला झाली आहे. किंबहुना, एक विचारी, अभ्यासू पण काही प्रमाणात वर्णभेदी आणि छुपे साम्राज्यवादी नियतकालिक असे सार्थ वर्णन केले जाणार्या "द इकॉनॉमिस्ट" मधला
फोटो पुरेसा बोलका आहे!
कॅमेरॉनने दिलेल्या कबुलीचे जे काय राजकीय्/आर्थिक लाभ ब्रिटनला होतील ते होवो, पण वरच्या बीबीसीच्या लेखाखालील काही इंग्रजांच्या प्रतिक्रिया पुरेश्या बोलक्या आहेत- एका बाजूला साम्राज्यवादी दर्प आणि अहंगंड आणि दुसर्या बाजूला हताश करणारी अपरिहार्य आर्थिक आणि राजकीय वस्तुस्थिती यांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया आढळतात. सर्वसामान्यपणे, अटळ राजकीय सत्य मान्य करण्यात अनेक इंग्रजांना अडचण येत असली तरी अँड्र्यू नॉर्थ सारखे काही समंजस आवाज देखील आढळतात.
पण तरीही काही गोष्टी अनुत्तरीतच राहातात-
कॅमेरॉन नी जालियनवाला बाग घटनेबद्दल नुसता खेद व्यक्त न करता संपूर्ण माफी मागायला हवी होती का?
समजा, अशी माफी मागीतली असती तरी त्याने ९४ वर्षापूर्वी झालेल्या घटनेने जो परिणाम भारतीय मानसिकतेवर आणि इतिहासावर झाला आहे त्यात काय फरक पडला असता? असा विरोधी विचार सुद्धा पुढे आला.
ब्रिटनने ईस्टर रायझिंग आणि आयरीश महादुष्काळाबद्दल पूर्वी आयर्लंडची माफी मागितली आहे मग भारतात केलेल्या अत्याचारांबद्दल माफी मागायला काय हरकत होती?
आपणास काय वाटते हे जाणून घ्यायला आवडेल.

वाचने
5124
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक वर्तुळ पूर्ण झाले
माफिनामा
नुसती माफी?
उगवती महासत्ता असलेल्या
महासत्ता म्हणजे काय? एखादा देश महासत्ता आहे की नाही हे कसे ठरवाव
In reply to उगवती महासत्ता असलेल्या by ऋषिकेश
महासत्ता म्हणजे काय? एखादा देश महासत्ता आहे की नाही हे कसे ठरवावे?... ह्म्म... तुम्हाला काय म्हणायचय ते कळलं, पण भारताला सगळी हुशार लोकं उगवती महासत्ता म्हणतात म्हणून आम्ही पण म्हणतो, बुवा! ते कोण जिम ओ'नील का कोणी आहेत ना त्यानीच सुरुवात केली बघा, मी नाही काही!म्हणजे एकूणच 'ठराविक' पुणेकर किंवा उत्तरेतील मुसलमानांसारखे झाले आहे.हा हा हा! ब्रिटनने तर आपल्या नावातच "ग्रेट" लावून घेतलंय, मिरवायला सोपं!माफी
आधी तो 'कोहिनूर' द्या म्हणावं
ब्रिटिश आले होते भारत लुटायला
इंग्लंडच्या इतिहासाकडे पाहिलं
In reply to ब्रिटिश आले होते भारत लुटायला by आदूबाळ
नाही, बर्याचदा असं होत नाही.
In reply to इंग्लंडच्या इतिहासाकडे पाहिलं by ऋषिकेश
उदाहरणे अजिबातच पटली नाही. का
In reply to नाही, बर्याचदा असं होत नाही. by आदूबाळ
"प्रामुख्याने आर्थिक कारणे"
In reply to उदाहरणे अजिबातच पटली नाही. का by ऋषिकेश
मुघल विरुद्ध मराठा हा संघर्ष
In reply to उदाहरणे अजिबातच पटली नाही. का by ऋषिकेश
तुर्तास घाईत, अगदी थोडक्यात,
In reply to मुघल विरुद्ध मराठा हा संघर्ष by बॅटमॅन
अंमळ गल्लत होतेय. मांडलिक
In reply to तुर्तास घाईत, अगदी थोडक्यात, by ऋषिकेश
सहमत
In reply to उदाहरणे अजिबातच पटली नाही. का by ऋषिकेश
शाळेतल्या दादागिरी करणार्या
In reply to ब्रिटिश आले होते भारत लुटायला by आदूबाळ
स्कॉलर!
In reply to शाळेतल्या दादागिरी करणार्या by ऋषिकेश
उदाहरण दिलं हो - बार्गेनिंग
In reply to स्कॉलर! by बाळकराम
+१
In reply to शाळेतल्या दादागिरी करणार्या by ऋषिकेश
जालियनवाला बाग
सत्ताकारण