वाचन कमी होत चालल आहे.

neeta's picture
neeta in काथ्याकूट
20 Feb 2013 - 2:37 pm
गाभा: 

आजकाल सगळ्यांचेच लहान आणि मोठ्या माणसांचे वाचन कमी होत चालले आहे. मुले इंटरनेट मुळे आणि मोठी माणसे टी व्ही सिरयल मुळे वाचत नाहीत. याचा अनुभव मी सोसायटीत वाचनालय चालू केले तेव्हा मला आला. लोक सरळ सांगतात की आम्हाला वाचायला वेळ नाही म्हणून. आपल्याला काय वाटते. यासाठी काय करता येईल?

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

20 Feb 2013 - 2:41 pm | संजय क्षीरसागर

आता लोकांना भेट द्यायला वापरता येतील

तर्री's picture

20 Feb 2013 - 2:42 pm | तर्री

आपले निरीक्षण बरोबर आहे - असे माझेही मत आहे.

दादा कोंडके's picture

20 Feb 2013 - 3:02 pm | दादा कोंडके

सहमत.
अगदी अडिचोळीचे धागेसुद्धा वाचवत नाहीत. :)

संजय क्षीरसागर's picture

20 Feb 2013 - 3:11 pm | संजय क्षीरसागर

तुमच्या या नव्या जोडाक्षरामुळे चोळीचा नवीन प्रकार बाजारात आला की काय असं वाटलं !

------/\------

तुमचे वाचन आणि निरीक्षण दोनेही कमी दिसते आहे . अडीचोळी काही महिन्यांपासून सतावते आहे.

नानबा's picture

20 Feb 2013 - 2:44 pm | नानबा

जाउद्या हो... असते काही जणांना काजू कतरी सोडून शेण खायची सवय... आपण आपलं वाचन कमी होऊ द्यायचं नाही.. सिरियल बघून जगाचं जे काही अगाध ज्ञान मिळतं त्यापेक्षा आपल्याला पुस्तकातून मिळालेलं ज्ञान पुरे...

पुस्तकं वाचणार? असा प्रश्न आहे

नानबा's picture

20 Feb 2013 - 2:50 pm | नानबा

मग ती पुस्तकं एखाद्या सार्वजनिक वाचनालयात देऊन त्यांचं सदस्यत्व घ्यायचं.... आणि नवनवीन वाचत रहायचं... इच्छा तेथे मार्ग... :)

एकतर सार्वजनिक वाचनालयाला यांची पुस्तकं हवी असली पाहिजेत आणि दोन, तिथे लेखिकेला हवी असलेली पुस्तक उपलब्ध असायला पाहिजेत.

बरं एवढं करून सुद्धा मूळ प्रश्न कायमच : (लोकांचं) `वाचन कमी होत चालल आहे'.

हम्म्म्म... तेही खरंय म्हणा.. बोंबलायला लोकं आजकाल त्या डबड्यात डोकं खूपसून बसायलेत रिकाम्या वेळात.. आणि बघतात काय, तर सिरियल्स म्हणे. काय पण...

दिपक.कुवेत's picture

20 Feb 2013 - 2:59 pm | दिपक.कुवेत

वाचनालयात लॅपटॉप किंवा कॉप्युटर वर मिसळपाव उघडुन ठेवा...ईथेहि बरच वाचनीय असतं! लोक्स ऑनलाईन वाचाला तरि नाहि म्हणणार नाहि.

@ संजयः :))

लोक वाचनालयातून इथे लॉग इन व्हायला लागतील... यांची पुस्तकं पुन्हा पडून ती पडून.

वर्गणी घेउन ?

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Feb 2013 - 4:17 pm | श्री गावसेना प्रमुख

हल्ली इंटरनेट जास्त वापरणारे जास्त चिडचीड करतात म्हणे,
म्हणुन म्हणतो वाचाल तर वाचाळ

बॅटमॅन's picture

20 Feb 2013 - 4:20 pm | बॅटमॅन

वाचन कमी होत चाललं असेल-नसेलही पण तुमची टीचभर धाग्यांची फ्रीक्वेन्सी काही कमी व्हायला तयार नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2013 - 4:39 pm | परिकथेतील राजकुमार

आपल्या प्रतिसादात भावी संपादक दिसले. ;)

शैली आपल्याकडूनच उचललीये बादवे =))

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2013 - 4:43 pm | परिकथेतील राजकुमार

माफी मागता मागता, वाक्यात बदल केल्या गेल्या आहे. :-

आपल्या प्रतिसादात भावी 'मिपाद्वेष्टे' दिसले.

बॅटमॅन's picture

20 Feb 2013 - 4:49 pm | बॅटमॅन

अंमळ हळवा होऊन, ड्वॉळे पाणावल्या गेले आहेत.

Nile's picture

21 Feb 2013 - 8:08 am | Nile

आपल्या प्रतिसादात भावी 'मिपाद्वेष्टे' दिसले.

पराशेठ, पण आपल्य प्रतिसादात आम्हाला चार काड्या दिसताहेत ब्वॉ!! ;-)

ऋषिकेश's picture

20 Feb 2013 - 4:43 pm | ऋषिकेश

हा हा हा.. त्रागाकुमाराने आपल्या त्रागा नं ३.१ साठी इथे लक्ष द्यावे ;)

धन्या's picture

20 Feb 2013 - 11:49 pm | धन्या

त्रागाकुमाराच्या त्राग्यांपुढे फिक्का पडेल असा नीतातैंचा त्रागा आहे. एव्हढी चांगली लायब्ररी त्यांनी सुरु केलीय आणि लोक ईतके करंटे की म्हणे पुस्तके वाचायला वेळ नाही.

बदलत्या काळानुसार, रुचीनुसार बदलणारी पुस्तके लिहिली का जात नाहीत? असा प्रश्न पडायला हवा.

बाकी, हीच वेळ नसणारी माण्सं राशीभविष्य, गर्भसंस्कार, यशस्वी होण्याचे क्षक्षक्ष उपाय वगैरे पुस्तके मात्र हमखास वाचताना दिसतात नै?

खटासि खट's picture

20 Feb 2013 - 11:53 pm | खटासि खट

लोकांचं वाचन वाढावं यासाठी आता आपल्यालाच लिखाण केलं पाहीजे.... असं कुणाकुणाला वाटतं त्यांनी हात वर करावेत.

नाही वाचले तर काय झाले? सगळ्यांनी सगळे केलेच पाहिजे का? अभ्यासाची पुस्तके तर सगळेच वाचतात. काहिंना तेव्हडेच पुरेसे वाटत असेल तर तुमची काय हरकत आहे?

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2013 - 5:08 pm | परिकथेतील राजकुमार

काही लोकं तर फक्त 'मचाक' वाचतात आणि संतुष्ट होतात असे निरिक्षण आहे.

हो का नाही रे स्पावड्या ?

=)) =)) =))

हो सर , आम्ही तुमचे फ्यान हौत

वाचन कमीबिमी काहीही होत नाही आहे. उलटपक्षी त्यात वाढच होत आहे.

१. मराठी पुस्तकांच्या विक्रीत गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होत आहे. नवनवीन प्रकाशक येताहेत. जुने प्रकाशक वाचकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना काढत आहेत (५० रुपयांत कुठलेही पुस्तक, किलोच्या भावाने पुस्तके वगैरे)

२. आंतरजालावर मराठी साहित्याची भरभराट होते आहे. मिपा (आणि इतर प्रतिस्पर्धी मंचां) वर उत्तमोत्तम साहित्याची लयलूट सतत चालू असते. त्यामुळे आंतरजाल हे साहित्याच्या वाढीला मारक नसून पूरक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

३. टीव्हीचं (आणि इतर माध्यमांचं) ही तसंच. नुकतेच आलेले "शाळा", "निशाणी डावा अंगठा", "पांगिरा" हे चित्रपट साहित्यकृतींवर आधारित होते. मालिकांच्या बाबतीत "गंगाधर टिपरे" आणि "साळसूद" या आठवतात.

तुमच्या सोसायटीच्या वाचनालयाबाबत खालील मुद्दे तपासून पहा:
- पुस्तकांचा संग्रह किती मोठा आहे?
- त्यातली "हमखास उठावाची" पुस्तकं किती (उदा. सुहास शिरवळकर, वपु), अभिजात पुस्तकं किती (उदा. खांडेकर), वगैरे. ही यादी अजूनही पुढे वाढवता येईल.
- कार्यपध्दतीमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे का? (उदा. लोकांना वाचनालयात आणण्याऐवजी घरपोच पुस्तकं देणे)

मी स्वतः वाचनालयाचा सभासद होताना (किमान) या बाबींचा विचार केला असता.

अजून एकः वाचनालय सुरू करताना "मार्केट सर्व्हे" नीट केला आहे ना?

अभ्या..'s picture

20 Feb 2013 - 7:04 pm | अभ्या..

आंतरजालावर मराठी साहित्याची भरभराट होते आहे. मिपा (आणि इतर प्रतिस्पर्धी मंचां) वर उत्तमोत्तम साहित्याची लयलूट सतत चालू असते

"माझं वाचन कमी आहे (ते दिसतंच) पण मी जे काही लिहिन ते तुम्ही मात्र वाचा(आणि फक्त छान छान म्हणा)" असे म्हणायची फॅशन पण जोरात आहे.

असू द्या ना. लोक लिहितात तरी - हे महत्त्वाचं.

जर ३० लेख पालथे घालून १ वाचनीय असा मिळाला तरी २९ लेख वाचण्याचे श्रम कामी आले, असं मला वाटतं.

आणि शेवटी कंट्रोल+डब्ल्यूची कळ वाचकाच्या हातात असतेच!

अभ्या..'s picture

20 Feb 2013 - 7:27 pm | अभ्या..

सगळेच नेते झाल्यावर जय हो कुणी म्हनायचं आदूबाळ?
लेखक व्हा की पण वाचक हवेत ही इथे समस्या आहे. स्वयंघोषीत लेखक फक्त ऑटोग्राफ वाटण्याच्या तयारीत कायम. "अभ्यासोनी प्रकटावे" कुठेय?

नाना चेंगट's picture

20 Feb 2013 - 10:48 pm | नाना चेंगट

आजकाल लोकांना पोरं कमी असतात म्हणून कमी होत आहे हो लोकांच.... असं म्हणायच का?

हल्ली मराठी लेखक इंग्रजीमध्ये बेस्टसेलर म्हणून मिरवत आहेत. किती दिवस ते दहा कॉपी फ्री च्या बोलीवर पुस्तक छापायला द्यायचं मराठी लेखकांनी तरी ?

आनंदी गोपाळ's picture

21 Feb 2013 - 12:06 am | आनंदी गोपाळ

प्रताधिकार कायद्याचा अभ्यास करा..

हारुन शेख's picture

21 Feb 2013 - 12:21 am | हारुन शेख

पुस्तके वाचणे कमी होत चाललंय असं अजिबात वाटत नाही पण पुस्तके त्यांच्या पारंपारिक म्हणजेच कागदी स्वरूपात वाचली जाणे कमी होत चाललंय असे मात्र वाटते. हा बदलही प्रचंड स्वरूपात होत आहे असे नाही.पण आंतरजाल हे एक अपार ज्ञानभांडार बनून आपल्यासाठी हवे ते ज्ञान मिळवणे अत्यंत सुकर झाले आहे.

श्रीरंग_जोशी's picture

21 Feb 2013 - 8:16 am | श्रीरंग_जोशी

हेच म्हणतो!