✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वाचन कमी होत चालल आहे.

N
neeta यांनी
Wed, 02/20/2013 - 14:37  ·  लेख
लेख
आजकाल सगळ्यांचेच लहान आणि मोठ्या माणसांचे वाचन कमी होत चालले आहे. मुले इंटरनेट मुळे आणि मोठी माणसे टी व्ही सिरयल मुळे वाचत नाहीत. याचा अनुभव मी सोसायटीत वाचनालय चालू केले तेव्हा मला आला. लोक सरळ सांगतात की आम्हाला वाचायला वेळ नाही म्हणून. आपल्याला काय वाटते. यासाठी काय करता येईल?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6840 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

वाचनालयाची पुस्तकं नवीन असतील तर

संजय क्षीरसागर
Wed, 02/20/2013 - 14:41 नवीन
आता लोकांना भेट द्यायला वापरता येतील
  • Log in or register to post comments

हो.

तर्री
Wed, 02/20/2013 - 14:42 नवीन
आपले निरीक्षण बरोबर आहे - असे माझेही मत आहे.
  • Log in or register to post comments

+१

दादा कोंडके
Wed, 02/20/2013 - 15:02 नवीन
सहमत. अगदी अडिचोळीचे धागेसुद्धा वाचवत नाहीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

दादा, अडिचोळीचे ?

संजय क्षीरसागर
Wed, 02/20/2013 - 15:11 नवीन
तुमच्या या नव्या जोडाक्षरामुळे चोळीचा नवीन प्रकार बाजारात आला की काय असं वाटलं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

तुमचे वाचन आणि निरीक्षण -

तर्री
Wed, 02/20/2013 - 16:14 नवीन
------/\------ तुमचे वाचन आणि निरीक्षण दोनेही कमी दिसते आहे . अडीचोळी काही महिन्यांपासून सतावते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जाउद्या हो... असते काही

नानबा
Wed, 02/20/2013 - 14:44 नवीन
जाउद्या हो... असते काही जणांना काजू कतरी सोडून शेण खायची सवय... आपण आपलं वाचन कमी होऊ द्यायचं नाही.. सिरियल बघून जगाचं जे काही अगाध ज्ञान मिळतं त्यापेक्षा आपल्याला पुस्तकातून मिळालेलं ज्ञान पुरे...
  • Log in or register to post comments

मिस्टर फडणीस, त्या स्वतः किती वेळ स्वत:च्याच लायब्ररीची

संजय क्षीरसागर
Wed, 02/20/2013 - 14:48 नवीन
पुस्तकं वाचणार? असा प्रश्न आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

मग ती पुस्तकं एखाद्या

नानबा
Wed, 02/20/2013 - 14:50 नवीन
मग ती पुस्तकं एखाद्या सार्वजनिक वाचनालयात देऊन त्यांचं सदस्यत्व घ्यायचं.... आणि नवनवीन वाचत रहायचं... इच्छा तेथे मार्ग... :)
  • Log in or register to post comments

दोन वेगवेगळ्या इच्छा आणि वेगवेगळे मार्ग आहेत

संजय क्षीरसागर
Wed, 02/20/2013 - 15:01 नवीन
एकतर सार्वजनिक वाचनालयाला यांची पुस्तकं हवी असली पाहिजेत आणि दोन, तिथे लेखिकेला हवी असलेली पुस्तक उपलब्ध असायला पाहिजेत. बरं एवढं करून सुद्धा मूळ प्रश्न कायमच : (लोकांचं) `वाचन कमी होत चालल आहे'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

हम्म्म्म... तेही खरंय म्हणा..

नानबा
Wed, 02/20/2013 - 15:05 नवीन
हम्म्म्म... तेही खरंय म्हणा.. बोंबलायला लोकं आजकाल त्या डबड्यात डोकं खूपसून बसायलेत रिकाम्या वेळात.. आणि बघतात काय, तर सिरियल्स म्हणे. काय पण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एक काम करा.....

दिपक.कुवेत
Wed, 02/20/2013 - 14:59 नवीन
वाचनालयात लॅपटॉप किंवा कॉप्युटर वर मिसळपाव उघडुन ठेवा...ईथेहि बरच वाचनीय असतं! लोक्स ऑनलाईन वाचाला तरि नाहि म्हणणार नाहि. @ संजयः :))
  • Log in or register to post comments

म्हंजे वाचनालयाची वाट लागलीच म्हणून समजा!

संजय क्षीरसागर
Wed, 02/20/2013 - 15:04 नवीन
लोक वाचनालयातून इथे लॉग इन व्हायला लागतील... यांची पुस्तकं पुन्हा पडून ती पडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

मग ही पुस्तके मिपावर प्रकाशित केली तर ?

अग्निकोल्हा
Wed, 02/20/2013 - 23:29 नवीन
वर्गणी घेउन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हल्ली इंटरनेट जास्त वापरणारे

श्री गावसेना प्रमुख
Wed, 02/20/2013 - 16:17 नवीन
हल्ली इंटरनेट जास्त वापरणारे जास्त चिडचीड करतात म्हणे, म्हणुन म्हणतो वाचाल तर वाचाळ
  • Log in or register to post comments

वाचन कमी होत चाललं असेल

बॅटमॅन
Wed, 02/20/2013 - 16:20 नवीन
वाचन कमी होत चाललं असेल-नसेलही पण तुमची टीचभर धाग्यांची फ्रीक्वेन्सी काही कमी व्हायला तयार नाही.
  • Log in or register to post comments

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/20/2013 - 16:39 नवीन
आपल्या प्रतिसादात भावी संपादक दिसले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शैली आपल्याकडूनच उचललीये

बॅटमॅन
Wed, 02/20/2013 - 16:40 नवीन
शैली आपल्याकडूनच उचललीये बादवे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अच्छा ! असे आहे होय. मग..

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/20/2013 - 16:43 नवीन
माफी मागता मागता, वाक्यात बदल केल्या गेल्या आहे. :- आपल्या प्रतिसादात भावी 'मिपाद्वेष्टे' दिसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अंमळ हळवा होऊन, ड्वॉळे

बॅटमॅन
Wed, 02/20/2013 - 16:49 नवीन
अंमळ हळवा होऊन, ड्वॉळे पाणावल्या गेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आँ!!

Nile
गुरुवार, 02/21/2013 - 08:08 नवीन
आपल्या प्रतिसादात भावी 'मिपाद्वेष्टे' दिसले.
पराशेठ, पण आपल्य प्रतिसादात आम्हाला चार काड्या दिसताहेत ब्वॉ!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा हा.. त्रागाकुमाराने

ऋषिकेश
Wed, 02/20/2013 - 16:43 नवीन
हा हा हा.. त्रागाकुमाराने आपल्या त्रागा नं ३.१ साठी इथे लक्ष द्यावे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

त्रागाकुमाराच्या

धन्या
Wed, 02/20/2013 - 23:49 नवीन
त्रागाकुमाराच्या त्राग्यांपुढे फिक्का पडेल असा नीतातैंचा त्रागा आहे. एव्हढी चांगली लायब्ररी त्यांनी सुरु केलीय आणि लोक ईतके करंटे की म्हणे पुस्तके वाचायला वेळ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

बदलत्या काळानुसार, रुचीनुसार

ऋषिकेश
Wed, 02/20/2013 - 16:34 नवीन
बदलत्या काळानुसार, रुचीनुसार बदलणारी पुस्तके लिहिली का जात नाहीत? असा प्रश्न पडायला हवा. बाकी, हीच वेळ नसणारी माण्सं राशीभविष्य, गर्भसंस्कार, यशस्वी होण्याचे क्षक्षक्ष उपाय वगैरे पुस्तके मात्र हमखास वाचताना दिसतात नै?
  • Log in or register to post comments

लोकांचं वाचन वाढावं यासाठी

खटासि खट
Wed, 02/20/2013 - 23:53 नवीन
लोकांचं वाचन वाढावं यासाठी आता आपल्यालाच लिखाण केलं पाहीजे.... असं कुणाकुणाला वाटतं त्यांनी हात वर करावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

वाचणे म्हणजे काही ग्रेट आहे की काय?

प्रसाद१९७१
Wed, 02/20/2013 - 16:59 नवीन
नाही वाचले तर काय झाले? सगळ्यांनी सगळे केलेच पाहिजे का? अभ्यासाची पुस्तके तर सगळेच वाचतात. काहिंना तेव्हडेच पुरेसे वाटत असेल तर तुमची काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments

हो हो !

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/20/2013 - 17:08 नवीन
काही लोकं तर फक्त 'मचाक' वाचतात आणि संतुष्ट होतात असे निरिक्षण आहे. हो का नाही रे स्पावड्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

हो सर , आम्ही तुमचे फ्यान हौत

स्पा
Wed, 02/20/2013 - 17:21 नवीन
=)) =)) =)) हो सर , आम्ही तुमचे फ्यान हौत
  • Log in or register to post comments

वाचन कमीबिमी काहीही होत नाही

आदूबाळ
Wed, 02/20/2013 - 18:38 नवीन
वाचन कमीबिमी काहीही होत नाही आहे. उलटपक्षी त्यात वाढच होत आहे. १. मराठी पुस्तकांच्या विक्रीत गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होत आहे. नवनवीन प्रकाशक येताहेत. जुने प्रकाशक वाचकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना काढत आहेत (५० रुपयांत कुठलेही पुस्तक, किलोच्या भावाने पुस्तके वगैरे) २. आंतरजालावर मराठी साहित्याची भरभराट होते आहे. मिपा (आणि इतर प्रतिस्पर्धी मंचां) वर उत्तमोत्तम साहित्याची लयलूट सतत चालू असते. त्यामुळे आंतरजाल हे साहित्याच्या वाढीला मारक नसून पूरक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ३. टीव्हीचं (आणि इतर माध्यमांचं) ही तसंच. नुकतेच आलेले "शाळा", "निशाणी डावा अंगठा", "पांगिरा" हे चित्रपट साहित्यकृतींवर आधारित होते. मालिकांच्या बाबतीत "गंगाधर टिपरे" आणि "साळसूद" या आठवतात. तुमच्या सोसायटीच्या वाचनालयाबाबत खालील मुद्दे तपासून पहा: - पुस्तकांचा संग्रह किती मोठा आहे? - त्यातली "हमखास उठावाची" पुस्तकं किती (उदा. सुहास शिरवळकर, वपु), अभिजात पुस्तकं किती (उदा. खांडेकर), वगैरे. ही यादी अजूनही पुढे वाढवता येईल. - कार्यपध्दतीमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे का? (उदा. लोकांना वाचनालयात आणण्याऐवजी घरपोच पुस्तकं देणे) मी स्वतः वाचनालयाचा सभासद होताना (किमान) या बाबींचा विचार केला असता. अजून एकः वाचनालय सुरू करताना "मार्केट सर्व्हे" नीट केला आहे ना?
  • Log in or register to post comments

भरभराट ?

अभ्या..
Wed, 02/20/2013 - 19:04 नवीन
आंतरजालावर मराठी साहित्याची भरभराट होते आहे. मिपा (आणि इतर प्रतिस्पर्धी मंचां) वर उत्तमोत्तम साहित्याची लयलूट सतत चालू असते
"माझं वाचन कमी आहे (ते दिसतंच) पण मी जे काही लिहिन ते तुम्ही मात्र वाचा(आणि फक्त छान छान म्हणा)" असे म्हणायची फॅशन पण जोरात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

असू द्या ना. लोक लिहितात तरी

आदूबाळ
Wed, 02/20/2013 - 19:16 नवीन
असू द्या ना. लोक लिहितात तरी - हे महत्त्वाचं. जर ३० लेख पालथे घालून १ वाचनीय असा मिळाला तरी २९ लेख वाचण्याचे श्रम कामी आले, असं मला वाटतं. आणि शेवटी कंट्रोल+डब्ल्यूची कळ वाचकाच्या हातात असतेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नेते

अभ्या..
Wed, 02/20/2013 - 19:27 नवीन
सगळेच नेते झाल्यावर जय हो कुणी म्हनायचं आदूबाळ? लेखक व्हा की पण वाचक हवेत ही इथे समस्या आहे. स्वयंघोषीत लेखक फक्त ऑटोग्राफ वाटण्याच्या तयारीत कायम. "अभ्यासोनी प्रकटावे" कुठेय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आजकाल लोकांना पोरं कमी असतात

नाना चेंगट
Wed, 02/20/2013 - 22:48 नवीन
आजकाल लोकांना पोरं कमी असतात म्हणून कमी होत आहे हो लोकांच.... असं म्हणायच का?
  • Log in or register to post comments

हल्ली मराठी लेखक इंग्रजीमध्ये

खटासि खट
Wed, 02/20/2013 - 23:43 नवीन
हल्ली मराठी लेखक इंग्रजीमध्ये बेस्टसेलर म्हणून मिरवत आहेत. किती दिवस ते दहा कॉपी फ्री च्या बोलीवर पुस्तक छापायला द्यायचं मराठी लेखकांनी तरी ?
  • Log in or register to post comments

वाचनालय बंद करून

आनंदी गोपाळ
गुरुवार, 02/21/2013 - 00:06 नवीन
प्रताधिकार कायद्याचा अभ्यास करा..
  • Log in or register to post comments

असं वाटत नाही

हारुन शेख
गुरुवार, 02/21/2013 - 00:21 नवीन
पुस्तके वाचणे कमी होत चाललंय असं अजिबात वाटत नाही पण पुस्तके त्यांच्या पारंपारिक म्हणजेच कागदी स्वरूपात वाचली जाणे कमी होत चाललंय असे मात्र वाटते. हा बदलही प्रचंड स्वरूपात होत आहे असे नाही.पण आंतरजाल हे एक अपार ज्ञानभांडार बनून आपल्यासाठी हवे ते ज्ञान मिळवणे अत्यंत सुकर झाले आहे.
  • Log in or register to post comments

+१

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/21/2013 - 08:16 नवीन
हेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा