Skip to main content

...........!!!!!!!

लेखक फिझा यांनी बुधवार, 20/02/2013 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
छोटे होते डोळे , त्यात सामावणारं विश्वही तसंच , छोट्यांच्या गोष्टी ऐकता ऐकता मोठ्यांच्या समजू लागल्या , पण .....मोठं होण्याच्या हट्टात 'बालपण ' जगायचं राहून गेलं ....!!! पुस्तकं वाचत राहिले वह्या भरत राहिले , परीक्षेच्या दिवसात देवाला स्मरत राहिले , पण ….शाळेला जायच्या नादात ... 'सहलीला ' जायचंच राहून गेलं .....!! लाथ मारील तिथं पाणी काढील अशी जिद्द तेव्हा होती , कॉलेजचा कट्टा ,हिरोइनच्या गप्पा , आमची ख्याती कमी नव्हती , पण ...अबोली माळून मोगर्यांच्या गर्दीत ... 'गुलाबाशी ' बोलायचंच राहून गेलं ...!!! बायको साजेशी ,सूनही आदर्श , हुशार आई लेकरांची होती , मोजून मापून आखलेल्या चौकटीत क्षितिजे सुद्धा वेगळी नव्हती , पण ...प्रतिबिंब पाहताना आरशात .... ' मी ' म्हणायचं राहून गेलं ......!!! उन्हाळे गेले पावसाळे ही गेले , व्यवहार चोख करूनही हिशोब मात्र चुकले , लेखणीने उतरवलं कागदावर एकदा , जे डोळ्यांनी दाखवलं आयुष्यभर सदा , पण ....खरडलेल्या त्या कवितेत ..... 'शीर्षक ' द्यायचं राहून गेलं .....!!!
लेखनविषय:

वाचने 2201
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

अ...प्र....ति....म!!!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

+१

ह्म्म ही कविता आवडली ... खास करुन पण ....खरडलेल्या त्या कवितेत ..... 'शीर्षक ' द्यायचं राहून गेलं .....!!!

कविता आवडली.

चांगल्या कविता वाचायला मिळताहेत. छान,टचिंग शेवट!

हि अनामिक कविता खूप भावली.

धन्यवाद !!प्रतिसाद वाचून....अजून नवीन काहीतरी लिहावेसे वाटते ! हे खरे !!