साहित्यः
१. तेल - २ पळ्या
२. आलं-लसुण-हिरवी मिरची पेस्ट - १ चमचा
३. पनिर क्युब्स / ताज पनिर
४. फ्रेश किम / मलई - २ चमचे
५. कसुरी मेथी - १ चमचा (हातानी पुड्/क्रश करुन गाळुन घेणे म्हणजे खाताना कचकच लागणार नाहि)
६. व्हईट पेस्ट - १/२ वाटि - १ मध्यम कांदा, ५ काजु, २ चमचे मगज बी कुकर मधे एक शीटि देउन उकडणे. गार झाल्यावर मिक्सर मधे बारिक पेस्ट करणे
७. पिस्ता पेस्ट - १/२ वाटि - २०-२५ सोललेले पिस्ते पाण्यात टाकुन एक १० मि. उकळणे व लगेच गार पाण्यात टाकणे. गार झाल्यावर वरचं साल काढुन मुठभर कोथींबिर्/पुदिना आणि १ हिरवी मिरची घेउन मिक्सर मधे बारिक पेस्ट करणे. (मिरच्यांच प्रमाण त्यांच्या तिखटपणानुसार ठरवावे)
८. चवीनुसार मीठ, साखर किंवा मध १/२ चमचा
९. सजावटिसाठि आल्याच्या पातळ काडया
कॄती:
१. मध्यम आचेवर एका नॉनस्टिक कढईत तेल गरम करा.
२. तेल गरम झाले कि त्यात आलं/लसुण/मिरची पेस्ट टाकुन परता
३. पेस्टचा कच्चा वास गेला कि त्यात तयार केलेली व्हाईट पेस्ट टाका व सतत परतत रहा. काजु मुळे पेस्ट खाली लागण्याची शक्यता आहे
४. आता व्हाईट पेस्ट ब्राउन झाली कि त्यात तयार केलेली पिस्त्याची पेस्ट टाका
५. ग्रेव्हि चांगली परतली कि त्याचा गोळा होईल आणि बाजुच्या कडेने तेल सुटु लागेल. गरज वाटल्यास थोडे पाणि टाका म्हणजे ग्रेव्हि खाली लागणार नाहि
६. आता त्यात पनिर क्युब्स टाका. आवडत असल्यास पनिर मिक्स करण्याआधी क्युब्स थोडे शॅलो फ्राय करु शकता
७. एक ५ मि. ग्रेव्हि चांगली परतली कि कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, साखर किंवा मध घालुन गॅस बंद करा
८. फ्रेश क्रिम/मलई घालुन भाजी हलक्या हाताने मिक्स करा
९. सर्विग साठि वरुन पातळ कापलेल्या आल्याच्या काडया घाला आणि पोळि, फुलके, नान, रुमाली रोटि बरोबर सर्व करा!
वाचने
7587
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
देखणी पाककॄती !!
छान
हि हि हि...
पनीर इज माय फेवरेट यमयमयम !
तोपसू
एव्हढी चांगली पाककृती...आणी
आय माय स्वारी.......... अता
In reply to एव्हढी चांगली पाककृती...आणी by अत्रुप्त आत्मा
फटू न पाहताच प्रतिक्रिया
In reply to आय माय स्वारी.......... अता by अत्रुप्त आत्मा
ज ब री !!
च्यायला,अता परतिसाद द्यायचा
जब्राट... ते दिसायलाच येवढं
खंग्री पाकृ आहे एकदम. आम्ही
ग्रेट!
पाकृ हटके आहे. पण...
सुडजी...
भन्नाट पाकृ.फोटो पाहुन लगेच
छान पाकृ
लै भारी!
छान,नक्कीच करुन बघणार
जबरा
मस्तच !
हो रे बाणा.....(एकेरी चालेल ना?)
हो रे बाणा.....(एकेरी चालेल
In reply to हो रे बाणा.....(एकेरी चालेल ना?) by दिपक.कुवेत
हरियाली मस्त!!
करुन बघायला पाहिजे... पिस्ता
सुपर्ब
मेथी व पनीर यांचे सर्व प्रकार
भोपळ्याच्या बियांमधील गर.
In reply to मेथी व पनीर यांचे सर्व प्रकार by इन्दुसुता