Skip to main content

आजीच्या गोष्टीमधली खार

आजीच्या गोष्टीमधली खार

Published on 17/02/2013 - 11:26 प्रकाशित मुखपृष्ठ
आजीच्या गोष्टीमधली खार आठवते मला फ़ार फ़ार इवलेसे डोळे, मीच मीच खुळे शेपुट करडी झुपकेदार! ससेभाऊ टेलर, उंदीरमामा बेकर मास्तरीण चिंमणाबाई, न्यायाधीश माकड प्राण्यांची सभा, नी शेपट्यांचा त-हा असे सारेच किस्से मजेदार आजीच्या गोष्टीमधली खार गोष्टीतून आजी दूर दूर नेई जात जाता अंगणात, आम्हा येई गाई दादाचे डोके, कुरळे कुरळे त्यात मधेच फ़िरे तीचा हात आजीच्या गोष्टीमधली खार गीत -कौस्तुभ
लेखनविषय:

याद्या 1239
प्रतिक्रिया 4