Skip to main content

उत्सव

लेखक जयवी यांनी गुरुवार, 14/02/2013 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मागे वळता दिसते जेव्हा संसाराची चौकट हसरी नकळत होते कशी अचानक पापण्यांची या झालर भिजरी आठवणी नव नवलाईच्या लख्ख काही अन्‌ काही पुसटशा काही गाफिल, सावध काही चुकार अन्‌ लडीवाळ जराशा कधी उतावीळ, कधी अनावर शांत डोह कधी उगाच डचमळ आवरतांना सावरतांना सैरावैरा उठते मोहळ आठवात त्या भिजतांना मग काळ जरासा थांबून जातो तुझ्यासवे या जगण्याचा मग उत्सव होतो... उत्सव होतो. जयश्री अंबासकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2082
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सुरेख... जाता जाता :--- हल्ली माझं टाळक अंमळ बाद झालं आहे,च्यामारी शिर्षक वाचुन "त्या" उत्सवची आठवण झाली. ;)

सुंदर कविता! शेवटच्या ओळी अगदी कोरून ठेवाव्यात अशा!

आवडली कविता.