Skip to main content

लैंगिक शिक्षणाचे व्यावहारीक महत्त्व

लेखक शुचि यांनी मंगळवार, 22/01/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुद्दा मांडायचा प्रयत्न करते - आम्हाला जेव्हा शाळेत लैंगिक शिक्षण मिळालं तेव्हा फक्त "मासिक धर्म" या विषयावर सांगीतले गेले. अजूनही भारतात तीच स्थिती आहे की आता गुप्तरोग/ एडस आदि रोगांची माहीतीदेखील सांगीतली जाते? कारण चित्रपट, कादंबर्‍या आदिंमधून सहजीवनाअची एक इमेज निर्माण केली जाते जी अतिशय रोझी असते, खरं तर वास्तवापासून दूर असते. सततच्या भूलभुलैय्याच्या भडीमारामुळे , हार्मोनल बदलांमुळेदेखील मुलामुलींचे मन भरकटू शकते. शाळा/ विद्यालयांमधून वास्तवाची जाण करुन देण्याचे किती प्रयत्न होतात? वास्तव म्हणजे 'सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात. शारीरीक संपर्काशिवाय किंवा अगदी अचूक सांगायचे झाले तर "बॉडी फ्लुईड एक्स्चेंज" शिवाय आनंद कसा मिळवायचा आदिची माहीती देणे आदि "लैगिक शिक्षणांतर्गत" अंतर्भूत नाही काय? शिक्षक-पालक साधारण कधी ही माहीती देतात? आणि देत नसतील तर हे आवश्यक नाही का? "एकच सहचारी (पार्ट्नर)" हे एक मूल्य यापेक्षा व्यावहारीक स्तरावर किती महत्त्वाचे आहे याचा कशी उहापोह झालेला माझ्या माहीतीत नाही. नैतिक मूल्य-मूल्य म्हणून ती डोक्यावर घेतलेली गोष्ट आहे पण त्याच गोष्टीला जबरदस्त व्यावहारीक मूल्य आहेच हे कधी हायलाईट होत नाही ते. मुलांशी मनमोकळेपणाने बोलणे हे नैतिकतेइतकेच किंबहुना जास्त व्यावहारीक (प्रॅक्टिकल) पातळीवरुन व्हायला पाहीजे. असो. या विषयावर गंभीर आणि संयत प्रतिसादांची अपेक्षा मिपाकरांकडून ठेवली तर वावगे ठरेल का? आशा करते लेखामागची भूमिका जाणवून मग प्रतिसाद येतील. नुसता कळफलक बडवला असे होणार नाही. नाना स्तरांतून, नाना वयाच्या, प्रगल्भतेच्या, व्यवसायीक स्तरांमधून आलेल्या व्यक्ती मिपावर वावरतात तेव्हा ही अपेक्षा अवाजवी ठरु नये.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 52119
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

फक्त लैंगिक शिक्षण नाही, तर एकंदरीतच "गुप्तांगा'बद्दल बोलण्यातच फार भिती/ नकारात्मकता असते. त्यामुळेच त्याच्याबद्दल एकतर कीळस किंवा 'फँट्सी' निर्माण होउन अज्ञानातच भर पडते. या फँटसीमधून्च जिथे व्यक्त व्हायला मोकळी वाट आहे, तिथे कथा, कादंबर्‍या,सिनेमा अश्या माध्यमातून मेंदूला अजूनच चमचमित आणि निकृष्ट असं खाद्य पुरवले जाते.... आणि समाजाच्या रोगांमध्ये भरच पडते.

लेख व प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत , माझ्या मते मुलं वयात आल्यावर त्यांना लैंगिक शिक्षण द्यायला हवे ह्याबाबत दुमत नाही , मात्र त्यांना ह्या शिक्षणाच्या नावाखाली चुकीची अवैज्ञानिक माहिती नकळत पणे मिळून त्यांच्या पुढील आयुष्यात फार मोठ्या समस्या निर्माण होतात. ह्याचे ठळक उदाहरण म्हणजे हस्त मैथुन म्हणजे शक्तिपात शरीराच्या प्रकृतीला अपायकारक , विर्याचा एक थेंब म्हणजे ..... अश्या अनेक माहितीपूर्ण पुस्तके भारतीय संस्कृतीचे वारसदार लिहितात , आज विठ्ठल प्रभू व राजन भोसले सारख्या नामवंत डॉक्टर वृत्त पत्रातून दर्जेदार लेख लिहित असतात. ह्यावर अनेक आयुर्वेदिक डॉक्टर आपत्ती घेतात , त्यांच्यामते हस्त मैथुन अपायकारक असते. प्रास ह्यांचे ह्यासंबंधीचे मत जाणून घेण्यास आवडेल.

जसा व्यायाम करायला आवर्जून डॉक्टर्स सांगतील तसे काउन्सिलर्स हस्तमैथुन मुद्दाम करावा किंवा सवय लावून घ्यावी असे बिल्कुल सांगत नाहीत. पण परत परत संवेदना निरमाण झाल्या तर तोच सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे. शिवाय मनाला, डोक्याला दुसरे काही चांगले (interesting/ creative) काम नसेल, तर मन रिझवण्यासाठी परत परत हेच करायची वेळ येउ शकते.

फीमेल सुध्धा हस्तमैथुन करतात हे मला माझ्या ४५ शी नन्तर कळले. मी एकदा एका तज्ञाला विचारले की संमती शिवाय सेक्स हा गुन्हा आहे. पन मला तु सेक्स करु देते का अशी विचारना करता येते का.तर हो म्हनाले. प्रश्न हा आहे कुनाला व कसे विचारावे? फीमेल्स ना खरंच सेक्स आवडतो का हाच मोठा प्रश्न आहे. माझ्या मते लैन्गीक शिक्शनाची गरज फक्त फीमेल्स्नाच आहे. तसे नाही आपल्या जोडीदाराला कसे खुष करावे हे शिक्शन तेही अगदी कंपलसरी करावे. बेअकली बायको मिळाल्यास भारतात फार त्रास होतो. पटकन सोडता ही येत नाही. पटकन दुसरी मिळतही नाही. शिवाय समाज काय म्हनेल हा तर मोठा प्रश्नच असतो.

हस्तमैथुन न केल्यास रात्री (स्वप्नदोष)विर्य गळती होते. निसर्ग आपले काम करीत असतो. जुन्या लोकांचा असल्या घाणेरड्या विषयाबद्दल एक दांभिक असा दृष्टीकोने असतो.आमच्या काळात असले काही नव्हते इ. आहार निद्रा भय आणि मैथुन या चार नैसर्गिक प्रवृत्ती आहेत त्याबद्दल दांभिकपणा दाखवणे यासारखा कोतेपणा दुसरा नसेल. सुबोध खरे

आज असे वाचण्यात आले की व्हालेन्टाईन दिवशी गुलाब पुष्पा पेक्षा कन्डोम चा खप व सेल जास्त आहे .. तरुण पिढी प्रेम व आरोग्य दोनही बाबत जागरूक आहे ..असे समजायचे का?