frendz & girlfrindz of MipA.,हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे.. ![]()
भाईलोग्ज, वैसे अपुन जैसे टपोरिकु क्या मालुम, के प्रेम कशाबरोबर खातात ते? पण आपल्याला ट्राय मारायचाय राव एकदा..,
'ते' लै भारी असतय म्हणं..
आज ह्या कवितेपासुन स्टार्टर मारतो..
--------------------------------
आता बंद होतील त्या कट्ट्या वरल्या शिट्ट्या
रोमिओ-मजनू च्या यादीत add होईल अजून एक पठ्या..
टपोरी गिरी सोडून काहीतरी नवीन TRY करायचंय
मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय
एकच coffee, एकच ice-cream, एकच sweetcorn दोघामध्ये खायचंय..
कधी तिची scooty , कधी माझी pulser , कधीतरी सुसाट पन्हाळ्याला जायचंय..
रात्र- रात्र तिच्या आठवणीत जागणं....
massages, chatting, आणि गप्पा मारत बसणं..
च्यायला एवढे subject कुठून आणतात ?.. study करायचाय
आणि साला त्या चंद्रात दिसतं तरी काय.. हे मला बघायचंय..
मित्रांनो.. मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय
वासू- सपना माफिक वाळू वर नाव कोरणं....
maddy माफिक तिच्या घराबाहेर चक्करा मारणं..
मनाचं हूर- हूरणं आणि दिलाचं धड-धडणं... FEEL करायचंय..
मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय
म्हणे, पाऊस सुद्धा प्रेमातला थोडा HATAKE असतो..
आठवणींचा एक मोर मनात थुई- थुई नाचतो..
shared छत्रीतली मजा कशी येते बघायचीय..
आणी पावसात एकदा सोबत तिच्या चिंब-चिंब भिजायचंय
तिच्या सौंदर्यावर एकदा, मग कविता करायचीय..
मुलायम केसांशी तिच्या लाडे-लाडे खेळायचंय..
गहिऱ्या त्या डोळ्यात LOST व्हायचंय..
नाजूकसं एक फुल त्या फुलाला gift द्यायचंय..
म्हणे corner seat movie ची मजाच बहुत खूब असते..
कडाक्याच्या थंडीत देखील मिळवायला एक ऊब असते.
Barefoot- hand in hand, किनाऱ्या वर चालायचंय..
तीच्या आठवणीत लाजत लाजत love-letter लिहायचंय
मित्रांनो.. मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय
खरच.. प्रेमात धड-पडायचंय
--------------------------------------------
-S.Y.G.-
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
पडा! आम्च काही म्हणन नाही.
पडा! आम्च काही म्हणन नाही.
आत्मुस जरा नजर ठेवा, आज ना उद्या तुम्हाकडेच येतील अस दिसतय.
हि माझ्यसाठी धोक्यची सुचना
In reply to पडा! आम्च काही म्हणन नाही. by स्पंदना
हि माझ्यसाठी धोक्यची सुचना आहे का आत्म्यास आमंत्रण??
धड-पडायच हा श्लेष आवडला.
धड-पडायच हा श्लेष आवडला.
धन्स.
In reply to धड-पडायच हा श्लेष आवडला. by यशोधरा
धन्स.
छान
छान जमलीय कवीता, खरं म्हणजे प्रेमात धड-पडायंच हे खुपच छान!
चांगली लिहली आहे कविता.
चांगली लिहली आहे कविता.
चांगलंय.
धडपडू नका. धडपणे पडा.
शंका !!
अहो massage सोबत message पण करत जा !!!!! ;)
त्यांनाmassage
In reply to शंका !! by वाह्यात कार्ट
त्यांना
massage
मध्ये आंनद मिळतो ना ,ते कशाला message करतील
sorry फॉर चुकुन केलेली
In reply to त्यांनाmassage by श्री गावसेना प्रमुख
:D
sorry फॉर चुकुन केलेली मिश्टेक..
मसाज हां??
बेटा, मन मे लड्डू फुंटा?
दादा कित्ती कित्ती छान कविता
दादा कित्ती कित्ती छान कविता केलीयेस रे :)
:P :D
पूजाक्का...
In reply to दादा कित्ती कित्ती छान कविता by जेनी...
:P पूजाक्का मी तुझा खूप खूप आभारी आहे गं.. :P
उत्त्तम !
अतिशय छान ! आवडलंय काव्य ! टिपलेले सूक्ष्म बारकावे विशेष !
भले !
अवश्य पडा ! धडपणे पडण्यासाठी शुभेच्छा !
चला और एक बकरा हलाल होने..
चला और एक बकरा हलाल होने.. :D
massage(मसाज) नाही रे
massage(मसाज) नाही रे message !!!!:-D
खो खो हसत सुटलो ते वाचून....मग नॉर्मल ला आल्यावर कविता वाचली ...
छान केलीयस ...
____________________________________________________________