Skip to main content

डाल रस्सम

डाल रस्सम

Published on बुधवार, 13/02/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्यः तुर डाळ - १/२ वाटी मुग डाळ - १/२ वाटी टोमॅटो - १ कडिपत्ता - ४-५ पाने धणे - १/२ चमचा जिरे - १/२ चमचा काळी मिरी - १/२ चमचा मोहरी - १ चमचा हिंग - १/२ चमचा चिंचेचा कोळ - १ चमचा हळद - १/४ चमचा लाल तिखट - १ चमचा तेल / तुप - १ चमचा कोथिंबीर सजावटीसाठी मिठ चवीनुसार पाकॄ: १. तुर डाळ व मुग डाळ धुवुन, १/२ तास भिजवुन ठेवावी. २. कुकर मधे भिजवलेली डाळ व चिरलेला टोमॅटो लावुन, ४-५ शिट्ट्या होऊ द्याव्या. ३. कुकर झाल्यावर, डाळ व टोमॅटो mash करावे. त्यात २ कप पाणी टाकुन mix करुन १/२ तास बाजुला ठेवावे. त्यामुळे डाळ खाली बसुन, रस्सम साठी डाळीचे पाणी मिळेल. ४. तव्यावर जिरे, धणे व काळे मिरे भाजुन, त्याची पुड करुन घ्यावी. ५. कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी, कडिपत्ता, हिंग, हळद, लाल तिखट व भाजुन केलेली पुड टाकुन परतुन घ्यावे. त्यात डाळीचे पाणी ओतावे. ६. पाण्याला उकळी आल्यावर त्यात चिंचेचा कोळ व चवीनुसार मिठ टाकुन ३-४ मिनिटे उकळु द्यावे. ७. कोथिंबीरने सजवुन गरमा गरम रस्सम पिण्यासाठी तयार आहे. ८. रस्स्म तुम्ही साध्या भातासोबत खाऊ शकता किंवा सुप म्हणुनही पिऊ शकता. ९. आवडत असल्यास तुम्ही रस्समला वरुन परत मोहरी व कडिपत्त्याची फोडणी देऊ शकता. gj ih

याद्या 45223
प्रतिक्रिया 30

रस्सम मध्ये हळद नको (मला तरी आवडत नाही). (ताज्या दळलेल्या) काळीमिरीचा झणका आणि कोथिंबीरीचा स्वाद, टोमॅटो-चिंचेचा आंबटपणा म्हणजे अगदी रस्समचा प्राण म्हणायला हरकत नाही. ताज्या मेदूवड्यांवर गरमागरम रस्सम ओतून खाण्यात जाम मजा येते.

पाकृ छान फोटोही झकास. दोन शंका आहेत - १) तयार रसम पावडर वापरली तर वरीलपैकी कोणते मसाल्याचे पदार्थ वगळावे लागतील? २) रसम करून झाल्यानंतर उरलेल्या डाळीचे काय करता येईल?

In reply to by सुनील

धन्यवाद पाकृ आवडल्याबद्दल. मी रस्सम पावडर कधी वापरली नहिये. पण बहुतेक ती वापरल्यास जिरे, धणे आणि काळि मिरीची पुड वगळावी लागेल. आणि उरलेल्या डाळीचा दाल्-फ्राय करु शकता... किंवा त्यातच मिठ,लाल तिखट,गरम मसाला व गव्हाचे पीठ टाकुन त्याची कणिक मळायची. त्याचे पराठे करायचे.. हे डाल पराठे पण मस्त लागतात.

In reply to by गणपा

आता बल्लवाचार्यांचीच ब्र्ह्मानंदी टाळी लागते. मग आम्ही तर काय? मस्त आणि एकदम शिंपल पाकृ बद्दल मॄणालिनीतै तुमचे आभार. :) फोटोतले प्रेझेंटेशन विशेषच आवडले. एकदम टेम्प्टींग.

लई भारी धागा अन रस्सम, अशा पातळश्या रसमात १०-१२ इडल्या टाकाव्यात अन ते खात खिडकीत बसावं, ते खाउन झाल्यावर खिडकीतुन खाली पडलो तरी बेहत्तर.

रस्सम तर भारीच आहे, शिवाय दाल-पराठा हा प्रकार खासच.